नाशिक : युरोपीय देशांनी इराणच्या युद्धात अमेरिकेला साथ दिली नाही म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो संघटनेतल्या देशांवर आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षांवर जोरदार आगपाखड केली, पण त्याच वेळी अमेरिकेचा अंकित देश पाकिस्तानने इस्लामिक नाटो बनवायचा डाव खेळला.
NATO सदस्य देश अमेरिकेचे मांडलिक
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच NATO नाटो ही प्रामुख्याने उत्तर गोलार्धातल्या युरोपीय देशांची संघटना बनविली. ती स्वतःच्या वर्चस्वाखाली राखण्यासाठी अमेरिकेने सगळ्या युरोपीय देशांना लष्करी सामग्रीची मदत केली. या मदतीच्याबद्दल अमेरिकेने युरोपीय देशांकडून राजकीय पाठिंब्याची किंमत वसूल केली. अमेरिकेने कुठल्याही भागात युद्ध केले की नाटो देशांचे सैन्य वापरले. अगदी इराक आणि अफगाणिस्तान युद्धात सुद्धा अमेरिकेने नाटो सदस्य देशांना त्यांचे सैन्य युद्धात उतरविणे भाग पाडले.
अमेरिकेची दादागिरी असह्य
अमेरिकेने प्रत्येक वेळी नाटो सदस्य देशांवर दादागिरी केली, पण ती दादागिरी इराण युद्धाच्या वेळेला असह्य झाल्याने नाटो सदस्य देशांनी अमेरिकेच्या युद्धखोरीविषयी उदासीनता अमेरिकेला अपेक्षित अशी मदतच केली नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो सदस्य देशांविरुद्ध जोरदार आगपाखड केली. इराण युद्धानंतर तुमच्याकडे पाहून घेऊ, अशी दमबाची केली. पण नाटो सदस्य राष्ट्रांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दमबाजीला कुठलीही भीक घातली नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो करारच मोडायची धमकी दिली.
– पाकिस्तानचा “डाव”
या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे मांडलिक राष्ट्र असलेल्या पाकिस्तानने इस्लामिक नाटो संघटना बनवायचा डाव खेळला. इराण विरुद्ध अमेरिका युद्धात इराणने आखाती देशांमध्ये अमेरिकन तळांवर हल्ले केले. त्यावेळी आखाती देशांना वाचवण्यासाठी पाकिस्तान पुढे सरकला नाही. सौदी अरेबिया, कतार, बहारीन या देशांचे नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई पाकिस्तानने दिली नाही.
– पहिल्याच बैठकीत पाकिस्तान फेल
पण त्या ऐवजी इस्लामिक नाटो संघटना बनवायचा आव आणला. त्यासाठी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी पुढाकार घेऊन पाकिस्तान, सौदी अरेबिया तुर्कस्तान आणि इजिप्त या चार देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची रियाध मध्ये बैठक घेतली त्या बैठकीतच त्यांनी इस्लामिक नाटो बनवायचा प्रस्ताव मांडला. अर्थात इस्लामिक नाटो संघटना बनवताना कुठलाही देश त्या कराराला बांधील नसेल, तो कुणालाही संरक्षणाची हमी देणार नाही किंवा कोणाच्याही युद्धात तो परस्पर उतरणार नाही, असे या बैठकीत बोलले गेले. त्यामुळे पाकिस्तानच्या डावावर पहिल्याच बैठकीत पाणी फेरले गेले. कारण ही इस्लामिक नाटो संघटना भारताविरुद्ध वापरायचा खरा डाव होता, तो इस्लामी देशांनीच सुरुवातीच्याच बैठकीत उधळून लावला.
US-led NATO alliance fails in the war with Iran.
महत्वाच्या बातम्या
- Al-Aqsa Mosque : 60 वर्षांत पहिल्यांदाच अल-अक्सा मशीद ईदमध्ये बंद; इराणमध्ये बाजार ओस पडले
- अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनीच पाडली त्यांच्या पक्षात फुट; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे टार्गेटवर!!
- Airlines : सीटवर अतिरिक्त शुल्क न आकारण्यावर विमान कंपन्यांचा विरोध; म्हटले- विमान भाडे वाढवावे लागेल