विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांनी जर उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदात खोडा घातला तर ठाकरे तरी कशाला सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पाठिंबा देतील??, असे संकेत दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्या तोंडून नव्हे, तर खुद्द आदित्य ठाकरेंच्या तोंडून मिळाले. Uddhav Thackeray
एबीपी माझाच्या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरेंची मुलाखत झाली. त्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होऊ शकतात का??, असा सवाल पत्रकारांनी विचारला त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्री झाली की नाही, हा विषय महत्त्वाचा नाही. तो राजकारणाचा एक भाग आहे. त्यापेक्षा महाराष्ट्रातील कायदा सुद्धा सुधारणे आवश्यक आहे, असे मोघम उत्तर दिले. ज्या आदित्य ठाकरे यांचे सुप्रिया सुळे यांनी विधिमंडळाच्या दरवाज्यात उभे राहून, मिठी मारून 2019 मध्ये स्वागत केले होते, त्या आदित्य ठाकरेंनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री पदाचा प्रश्न मोघम उत्तर देऊन उडवून लावला. यातच सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री पदाचे वेगळे संकेत मिळाले.
त्या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या पहिल्या एकत्रित जाहीर मेळाव्यात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा. मी त्या चेहऱ्याला पाठिंबा देतो, असे उघडपणे शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना सांगितले होते. पण त्यावेळी पवारांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या मागणीला पाठिंबा तर दिला नाहीच, पण वाटाण्याच्या अक्षता लावून ते मोकळे झाले. एक प्रकारे पवारांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीत खोडा घातला.
आता जर पवारांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदात खोडा घातला होता, तर ठाकरे तरी पवारांच्या “मनातल्या मुख्यमंत्री” म्हणजेच सुप्रिया सुळेंना त्या पदावर बसवण्यासाठी का पाठिंबा देतील??, असा सवाल तयार झाला आणि त्याचे संकेतच आदित्य ठाकरे यांच्या मोघम उत्तरातून मिळाले.
Uddhav Thackeray might not support supriya sule for chief ministership
महत्वाच्या बातम्या