नाशिक : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, असे जाहीर रित्या सांगून उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची कोंडी केली. मात्र ही कोंडी हे दोन्हीही घटक फोडू शकले नाहीत. कारण आजच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात शरद पवार किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचे टाळले. Uddhav thackeray exposed sharad pawar and Congress over CM post
महाविकास आघाडीच्या या घडामोडींवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून उद्धव ठाकरेंचे तारे जमीन पर आणले. उद्धव ठाकरेंच्या मागणीला पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाव दिला नाही म्हणून आशिष शेलार यांना आनंद झाला. उद्धव ठाकरे स्वतःच कशी एका जुन्या घटनेची कबुली देऊन बसले याचे वर्णन आशिष शेलार यांनी केले. ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री हे भाजप – शिवसेनेच्या युतीचे सूत्र होते. परंतु, आता ते उद्धव ठाकरेंना मान्य नाही. पण उद्धव ठाकरे ते खरे बोलून गेले. उद्धव ठाकरेंनी भाजपकडे मुख्यमंत्री पद मागितले होते आणि भाजपने त्यांना तसे आश्वासन दिले होते हे सगळे कपोल कल्पितच होते याची कबुली उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे दिल्याचा आनंद आशिष शेलार यांनी व्यक्त केला. त्यात तथ्य जरूर आहे. पण ते तेवढेच तथ्य नाही. त्या पलीकडे देखील एक वेगळे राजकीय तथ्य त्यात दडले आहे.
कारण भाजपचे आमदार आशिष शेलार त्यांच्या राजकीय हिशेबानुसार टीका टिप्पणी करतात. ते ठाकरेंवर जेवढी चढाई करतात, तेवढी चढाई ते पवारांवर कधी करत नाहीत. क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि बाकीच्या काही गोष्टी हा पवार आणि शेलार यांच्या मधला समान दुवा असल्याने पवारांवर टीका करण्यापासून ते बचावात्मक पवित्रा घेतात.
पवारांची मध्यस्थी ठाकरे – काँग्रेसने धुडकावली
आत्तासुद्धा उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांपुढे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री जाहीर करण्याची मागणी करून त्यांची कोंडी केली. यात ठाकरे गटाने स्वतःची मागणी लपवलेली नाही. उलट पवारांना वगळून उद्धव ठाकरेंनी थेट सोनिया गांधींची संधान साधले आणि थेट काँग्रेस हायकमांड कडून काही विशिष्ट आश्वासन घेतलेह एरवी ठाकरेंना काँग्रेसशी संपर्क साधायला पवारांची मध्यस्थी लागत असे. किंबहुना 2019 मध्ये ठाकरे आणि काँग्रेस हे जुगाड पवारांनीच पुढाकार घेऊन जुळवून आणले होते. परंतु आता ठाकरे आणि काँग्रेस यांना एकमेकांच्या संपर्कासाठी पवार नावाचे मध्यस्थ लागत नाहीत हे उद्धव ठाकरेंनी सिद्ध केले.
उद्धव ठाकरेंनी आजच्या जाहीर मेळाव्यात महाविकास आघाडीचा चेहरा तुम्ही जाहीर करा त्याला मी पाठिंबा देतो असे सरळ सरळ आव्हान दिले होते. परंतु पवार आणि काँग्रेस नेत्यांनी हे आव्हान स्वीकारणे टाळले. वास्तविक पवारांनी त्यांच्या मनातले मुख्यमंत्री पदाचे नाव त्या क्षणी जाहीर केले असते, तर उद्धव ठाकरेंना तिथल्या तिथे पाठिंबाही कदाचित द्यावा लागला असता. किंवा काँग्रेस नेत्यांनी एक – दोन नावे समोर केली असती, तर उद्धव ठाकरेंना जाहीर रित्या माघार घेणेही कठीण झाले असते.
परंतु पवार आणि काँग्रेस यांचे ठाकरेंचे आव्हान स्वीकारण्याचे धैर्य देखील झाले नाही. पवारांना आपल्या मनातले मुख्यमंत्री पदाचे नाव महाविकास आघाडीच्या मेळाव्यात घेता देखील आले नाही, मग ते प्रस्थापित करणे तर दूरच राहो!!
अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या आजच्या मेळाव्यात भले आशिष शेलार यांच्या मते उद्धव ठाकरेंचे तारे जमीन पर आले असतीलही, पण मग बाकीच्यांचे तारे काय वरच राहिलेत का??, हा सवाल या निमित्ताने तयार झाला आणि बाकीच्यांचेही तारे तितकेच खाली आलेत, हे त्याचे खरे उत्तर उद्धव ठाकरेंच्या भाषणातून आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून मिळाले. किंबहुना आशिष शेलार यांच्या क्रिकेट गुरूंचे तारे तर जमिनीवरनं कधी वरचं जाऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती देखील समोर आली.
Uddhav thackeray exposed sharad pawar and Congress over CM post
महत्वाच्या बातम्या
- Ajit pawar : पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट; शिरणार का पुन्हा काकांच्या पुठ्ठ्यात??; की ते सत्तेची वळचण बदलण्याच्या बेतात??
- Chief Justice Chandrachud : बांगलादेशातील संकटावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- IMA strike : 17 ऑगस्ट रोजी देशभरात IMAचा संप ; म्हणाले ”रुग्णालयांना ‘सेफ झोन’ घोषित करा”
- प्रशांत किशोर यांनी जेडीयू आणि आरजेडीवर साधला निशाणा!