आपण जीवनातील विविध क्षेत्रांत यशस्वी होऊ शकतो मग ते तुमची नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध,एखादी परीक्षा अथवा एखादा स्वप्नवत जॉब मिळवणे यापैकी काहीही असू शकते. कुणासाठी यशस्वी होणे म्हणजे अध्यात्मात उच्च शिखर गाठणे असु शकते तर कुणासाठी ते आरोग्यदायी जीवनशैली जगु शकणे असु शकते. महान शिल्पकार मायकेल अँजेलो म्हणाला होता, नेहमी मोठा विचार करा. Think big first in life, work on it
मायकेल अँजेलोच्या चौदाव्या शतकातील कलाकृती आजही जगाला प्रेरणा देतात. अँजेलोने कलाकार बनण्याचे स्वप्न पाहिले नसते तर जग त्याच्या अनेक महान कलाकृतींना मुकले असते. अर्थात, बहुतांश लोक आपली स्वप्ने बाजूला ठेऊन काहीतरी सोपे आणि व्यवहार्य असे काम करण्यात धन्यता मानतात. आपली महत्वाकांक्षा विसरून अल्पसंतुष्ट वृत्तीचा स्वीकार कराल तर यशस्वी होणे हे केवळ स्वप्नच बनून राहील. मोठा विचार करा, त्यावर कार्य करा.
अनेक संकटे येतील परंतु त्या विचाराशी प्रामाणिक रहा. यश हे तुमचेच असेल. जीवनात यशस्वी होण्याासाठी प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने धडपड सुरु असते. मात्र अनेकदा छोट्या-मोठ्या गोष्टी त्रासदायक ठरतात. अशावेळी काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. योग्य प्रमाणात तसेच संतुलित आहार घ्यायला हवा. दररोज व्यायाम करा. याने तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनता. भौतिक सुखापेक्षा आपले अंतर्मन कसे आनंदी राहील याचा विचार करा. चांगल्या संगतीत राहा. तसेच नवनवीन गोष्टी शिकत राहा.