• Download App
    जगभरात मुंग्यांच्या १२००० प्रजाती, राणी मुंगी जगते चक्क तीस वर्षे There are 12,000 species of ants in the world, and the queen ant lives for about 30 years

    जगभरात मुंग्यांच्या १२००० प्रजाती, राणी मुंगी जगते चक्क तीस वर्षे

    इवलीशी मुंगी, पण या मुंगीबद्दल आपल्याला काही गोष्टी माहितीच नसतात. या मुंग्यांचे विश्व फार भारी आहे. अनेकदा ती मुंगी आपल्या तोंडात पांढरं काही तरी घेऊन जाताना दिसते. मग आपल्याला कोणी वडिलधाऱ्याने सांगितलं असेल की ती तिची अंडी आहेत. मुंगी हा असा प्राणी आहे जो जगभरात सर्वत्र आढळतो. There are 12,000 species of ants in the world, and the queen ant lives for about 30 years

    अंटार्क्टिका आणि काही मोजक्या बर्फाळ प्रदेशाला सोडून पृथ्वीवर सर्वत्र मिळणारा जीव म्हणजे मुंगी. जगभरात मुंग्यांच्या तब्बल १२००० जाती आहेत. ०.०३ इंच पासून ते २ इंच पर्यंतच्या या मुंग्या विविध आकारांत दिसून येतात. सर्व मुंग्यांना जन्म देणारी राणी मुंगी ही ३० वर्षापर्यंत जगते.

    हे आयुष्य़ इतर मुंग्यांपेक्षा १०० पटीने जास्त आहे. मुंग्यांच्या सर्वात मोठ्या वसाहतीला सुपरकॉलनीज म्हणतात. हे मोठे वारूळ तब्बल ३७०० मैल लांब असू शकते. यात जवळ जवळ एक अब्ज मुंग्या राहू शकतात. ओहायो विद्यापीठाने केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की मुंगी आपल्या वजनाच्या फक्त ५० पट नव्हे तर ५००० पट एवढे जास्त वजन वाहून नेवू शकते. मुंग्या फक्त ओझे उचलण्यात सक्षम नसतात, तर त्या चांगल्या धावपटू्सुद्धा असतात. त्या प्रत्येक सेकंदाला तीन इंच एवढं धावू शकतात. माणूस जर या वेगाने पळू लागला तर तो ताशी ५५ किलोमीटर एवढ्या वेगाने धावू शकेल.

    बुलेट ऍंटच्या चाव्यास सर्वात वेदनादायी मानले जाते, तर जॅक जम्पर या जातीतील मुंगीचं चावणं हे अत्यंत घातक ठरू शकतं. जगभरात मुंग्या या लाल आणि काळ्या रंगात असतात. पण काही ठिकाणी हिरव्या रंगाच्या सुद्धा असतात.

    There are 12,000 species of ants in the world, and the queen ant lives for about 30 years

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!