आपण सारेच या केसांच्या बाबतीत खूप विचार करीत असतो. केस नीट छान असावेत हे आपल्यातल्या प्रत्येकाला वाटत असते. कारण चांगले केस असतात त्यांचे व्यक्तिमत्व खुलून दिसते. सुंदर भांग पाडला तर लहान मुलेदेखील अधिक गोंडस दिसतात. महिलांमध्ये तर केसांच्या विविध रचना करण्याची क्रेजच असते. सुंदर केसांत फुलांचा गजरा माळणे हा महिलांचा आवडता छंद असतो. The secret of science: why blood does not come when hair is cut
अलीकडे पुरुषदेखील केसांच्या रचनेकडे अधिक गांभीर्याने पहात असल्याचे जाणवते. ज्यांच्या डोक्यावर विरळ केस आहेत त्यांना कायम आपल्या डोक्यावर कमी केस असल्याची भावना त्रास देत असते. असा हा केसांचा महीमा आहे. प्रत्येकाला आपले केस काळे व दाट असावेत असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र काही जणांचे केस पांढरे होतात. केसांचा रंग व वृद्धत्व यांचे काही नाते आहे का. म्हटले तर त्यात थोडे तथ्य आहे. वयाच्या चाळीशीनंतर केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढते. केसांना काळा रंग असतो तो केसात असलेल्या काळ्या रंगाच्या मॅलेनिन मुळे. हे मॅलेनिन त्वचेखाली असलेले मॅलॅनोसाईट नावाचे कोष तयार करतात.
काही कारणांनी, वयोमानामुळे मॅलॅनोसाईट तयार करणारे हे कोष मृत होतात आणि त्यांचे काम थांबते. अर्थातच नवीन तयार होणाऱ्या केसांना मॅलॅनिनचा पुरवठा होत नाही त्यामुळे केस पांढरे दिसायला सुरूवात होते. कुणाचे केस रेशमासारखे मउ असतात तर कुणाचे कुरळे अगदीच स्प्रिंगप्रमाणे. प्रत्येक माणसाचे केस वेगवेगळे असतात. खरं वैज्ञानिक परिभाषेत सांगायचे झाल्यास केस हा शरीराचा निर्जिव भाग आहे. केसांच्या मुळापाशी रक्त असते मात्र केसांमध्ये कधीही रक्त नसते. त्यामुळे केस कापले तर त्यातून रक्त येत नाही. केसाला चिमटा काढा, केस कापा, पिळा आपल्याला वेदना होत नाही. यातून रक्तही येत नाही. याचे कारण म्हणजे केसांतील पेशी या मृत असतात. म्हणूनच आपले केस ताठ उभे राहू शकत नाहीत.