तंत्रज्ञानाने आयुष्यावर आणि फोनच्या बॅटरीने माणसाच्या मूडवर नियंत्रण मिळवले आहे. लोकांचा मेंदू फोनच्या बॅटरीप्रमाणेच काम करतो. लंडन विद्यापीठाचे विपणन संशोधक थॉमस रॉबिन्सन आणि फिनलंडच्या अल्टो विद्यापीठाच्या एका संशोधनातून हे समोर आले आहे. संशोधनानुसार, ज्या लोकांच्या फोनची बॅटरी नेहमीच चार्ज असते ते आपल्या ऊर्जेचा वापर दीर्घ काळ करतात. तसेच जे लोक फोनच्या बॅटरीकडे लक्ष देत नाहीत किंवा सतत त्यांच्या फोनची बॅटरी कमी राहते ते आयुष्यात डळमळीत असतात. लोक बॅटरीद्वारे ठरवताहेत प्रवासाचा वेळ.The secret of science: Mobile charging affects your mood
संशोधकांनी लंडनच्या २३ वर्षांवरील लोकांवर संशोधन केले आहे. ते दररोज कुठेतरी जाण्यासाठी ६०-१८० मिनिटांचा वेळ घेतात. जर ते आपल्या इच्छित स्थळापासून १० किलोमीटर दूर आहेत किंवा रस्त्यात १० थांबे आहेत, तेव्हा ते याची तुलना बॅटरीसोबत करतात. जसे फोनमध्ये बॅटरी ५० टक्के असेल तर किती वेळ इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी आणि बॅटरी फुल करण्यासाठी लागेल. बॅटरीची कमी होत असलेली पॉवर त्यांना वेळेआधी फोन चार्ज करण्यासाठी प्रेरित करते. उदाहरणार्थ कमी होत जाणारी फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी लोक जिथे अधिक वेगाने बॅटरी चार्ज करता येईल, अशा ठिकाणी लवकरात लवकर जाणे पसंत करतात.
फोनची बॅटरी कमी होत चालली की तरुण मुले त्रस्त व्हायला लागतात. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार बॅटरीच्या चार्जिंगचा स्तर युवकांचा मूड मोठ्या प्रमाणात प्रभावित करत करत आहे. चार्ज झाल्यास सकारात्मकतेची जाणीव होते. ज्यांचा मोबाइल फोन फुल चार्ज होतो त्यांच्यात सकारात्मकतेची जाणीव व्हायला लागते आणि फुल बॅटरीसोबत कुठेही जाता येऊ शकते, असा ते विचार करतात. या बाबी संशोधनातून समोर आल्या आहेत. दुसरीकडे अर्धी किंवा त्यापेक्षा कमी बॅटरी असणाऱ्यांमध्ये नकारात्मकता वाढते. संशोधनात सहभागी युवकांना विचारण्यात आले की, दिवस मावळताना त्यांना आपल्या फोनचा बॅटरी आयकॉन पाहताना कसे वाटते? यावर मुले म्हणाली, फुल बॅटरी पाहणे सुखद वाटते आणि ५० टक्के बॅटरी असल्याचे बघितले की, चिंता वाटते. तसेच ३० टक्क्यांपर्यंत बॅटरी पोहोचल्यास ही चिंता आणखीच वाढत जाते.