माणूस जितका संयमी आणि शांत असतो तितकाच तो जास्त प्रभावी असतो. शांत स्वभाव आणि संयमामुळे तुम्ही योग्य विचार करू शकता. ज्याच्या मनात विचारांचा गोंधळ असतो अथवा जी व्यक्ती रागीट, चिडचिड करणारी असते ती वेळ पडल्यावर योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही. त्यामुळे करिअरमध्ये उच्च शिखर गाठण्यासाठी तुम्हाला संयमाचा नक्कीच फायदा होऊ शकतो. काही लोकांना त्यांचे मनातील सर्व विचार लोकांना सांगण्याची सवय असते. मात्र काही गोष्टी सर्वांना सांगणं मुळीच गरजेचं नसतं कारण काही गोष्टी चुकीच्या ठिकाणी बोलण्यामुळे तुमची लोकप्रतिष्ठा खराब होऊ शकते. यासाठी तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट जगाला सांगण्याचा प्रयत्न करू नका. The more restrained and calm a person is, the more effective he becomes
जसं तुम्हाला इतरांकडून कौतुक हवं असतं तसं इतरांनाही कौतुक आवडत असतं. यासाठी इतरांच्या यशाबद्दल त्याचं मनापासून कौतुक करा. समजा तुमच्या प्रतिस्पर्धीला जरी एखादं यश मिळालं तरी त्याचं मनापासून कौतुक करा. कारण त्यामुळे त्याच्या मनात तुमच्या बद्दल नकळत निर्माण झालेला कटूपणा कमी होऊ शकतो. तुमच्या वागण्याकडे नेहमीच इतरांचे लक्ष असते. त्यामुळे जेव्हा इतरांना मान देऊन अथवा आदरपूर्वक बोलता तेव्हा त्यातून तुमच्या संस्कारांचे दर्शन घडत असते. माणसाचे संस्कार त्याच्या आचणातून दिसततो असतात. इतरांशी आदराने बोलण्याने नकळत तुमचे व्यक्तिमत्व घडत जाते. तुम्ही जे विचार करता त्याचा प्रभाव तुमच्या आचरणातून दिसत असतो. जी माणसे सकारात्मक आणि व्यापक विचार करतात ती नेहमीच इतरांना हवी हवीशी वाटतात. अशा लोकांशी बोलणे नेहमीच उत्साहवर्धक असते. यासाठी स्वतःला सकारात्मक आणि प्रभावी विचार करण्याची सवय लावा.