• Download App
    मेंदूचा शोध व बोध : मेंदूद्वारे शरीराच्या सर्व हालचालींवर नियंत्रणे, तोच शरीराचा खरा ड्रायव्हर। The brain controls all the movements of the body, the real driver of the body

    मेंदूचा शोध व बोध : मेंदूद्वारे शरीराच्या सर्व हालचालींवर नियंत्रणे, तोच शरीराचा खरा ड्रायव्हर

    मेंदूद्वारे शरीराच्या सर्व हालचाली घडून येतात आणि नियंत्रित होतात. जसे चालणे, बोलणे आणि हातपायांच्या हालचाली. हालचालींसाठी मेंदूपासून चेतापेशींमार्फत निघालेले आवेग हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रेरक चेताकडे वाहून नेले जातात. तसेच डोळे, तोंड, चेहरा यांच्या हालचाली थेट मेंदूपासून निघालेल्या कर्पर चेता नियंत्रित करतात. प्रेरक बाह्यांग शरीराच्या सर्व हालचालींचे उगमकेंद्र असून त्यात शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या हालचालींची क्षेत्रे असतात. प्रेरक बाह्यांगापासून निघालेले आवेग बाह्यांग मेरु चेता मार्गातून मस्तिष्क पुच्छात येतात. हे आवेग एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे विद्युत संदेशाच्या स्वरूपात जातात. The brain controls all the movements of the body, the real driver of the body

    मस्तिष्क पुच्छातील चेतापेशींपासून मेरुरज्जूतील प्रेरक चेतापेशींद्वारे आवेग स्नायूंपर्यंत येतात. प्रेरक चेतापेशी आणि स्नायूतंतू यांच्या संपर्कस्थानी चेतापेशी ॲसिटिलकोलीन हे रसायन स्रवते. त्याद्वारे आवेग स्नायूतंतूंकडे पोहोचतात आणि स्नायूंचे आकुंचन घडवून आणतात. या आकुंचनाच्या परिणामी शरीराच्या हालचाली घडतात अनुमस्तिष्क आणि तल गंडिका स्नायूंच्या गुंतागुंतीच्या हालचालींमध्ये समन्वय राखतात. संवेदी चेतासंस्था ही चेतासंस्थेचा एक भाग असून तिच्याद्वारे संवेदी माहितीचे ग्रहण आणि संस्करण केले जाते.

    ही माहिती कर्पर चेतांमधून तसेच मेरुरज्जूच्या चेता मार्गामधून येते. दृष्टी, गंध, श्रवण, स्पर्श, रुची आणि तोल असे खास संवेद ओळखण्याचे आणि त्यांपासून मिळालेल्या माहितीच्या संस्करणाचे कार्य मेंदू करतो. मेंदूमध्ये धमन्यांच्या जाळ्याप्रमाणे शीरांचेही जाळे असते. मेंदूच्या वेगवेगळ्या भागातील ऑक्सिजनविरहीत रक्त शीरांच्या जाळ्यांतून दृढ आवरणातील शीरानालांमध्ये वाहून नेले जाते आणि या नालांतून आंतरिक शीरांमार्फत कवटीबाहेर नेले जाते. मेंदूमध्ये मोठ्या धमन्यांकडून आलेले रक्त केशवाहिन्यांकडे येते. परंतु मेंदूतील केशवाहिन्यांच्या भित्तिकेतील पेशी एकमेकांना घट्ट चिकटून असल्यामुळे जीवाणूंसारखे सूक्ष्मजीव आणि मोठ्या आकाराचे रेणू अडवले जाऊन मस्तिष्कमेरु द्रवात मिसळू शकत नाही. या संरचनेला मस्तिष्क रक्त रोध म्हणतात. या संरचनेतून ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइड हे वायू, पाणी, ग्लुकोजचे रेणू आरपार जातात. मस्तिष्क रक्त रोधामुळे मेंदूला रक्तातील पोषक घटकांचा पुरवठा होतो. त्याचबरोबर मेंदूचे अनेक संक्रामणांपासून रक्षण होते.

    The brain controls all the movements of the body, the real driver of the body

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!