विविध प्रयोगांसाठी शास्त्रज्ञांना कमी वेळेत उणे 271 अंश सेल्सिअस तापमानाची आवशक्यता असते. पुन्हा तीच प्रक्रिया उलट गतीने होत वातावरणातील तापमानपण हवे असते. यासाठी अमेरिकेतील कंपनीने अल्ट्रा-लो तापमान मिळवण्यात यश आले आहे. ज्यामध्ये 100 मिलीमीटर आकाराच्या पदार्थाचे तापमान अर्ध्या तासात 1.75 केल्विनपर्यंत पोहचते. बाजारात आजवरची उपलब्ध सर्वांत अत्याधुनिक आणि इतक्या कमी तपमानाला जाणारी ही एकमेव प्रणाली असल्याचे संशोधकांचे मत आहे. Success for American researchers in achieving ultra-low temperatures
प्रणालीचे नाव त्यांनी ड्राय आईस 1.5के 100एमएम असे ठेवले आहे. पशुवैद्यकाकडे तुम्ही नायट्रोजन पाहिला असेल. हा नायट्रोजन द्रव स्वरूपात असतो. त्याचे तापमान तब्बल उणे 195 अंश सेल्सिअस असते. तसेच अग्निबाण किंवा प्रयोगशाळांमध्ये द्रवरूप हेलिअम वापरला जातो. त्याचे तापमान उणे 269 अंश सेल्सिअस असते! ब्रह्मांडातील सर्वात कमी म्हणजेच उणे 272 अंश सेल्सिअस तापमान बुमरॅन्ग नेब्युलाचे आहे. तर परिपूर्ण शून्य तापमान हे उणे 273.15 अंश सेल्सिअस आहे. त्यालाच आपण शून्य केल्विन असेही म्हणतो. याच्या खाली पारा उतरू शकत नाही.
या अवस्थेला अणूंची हालचाल पूर्ण बंद होते. कोणत्याही सजीव अथवा निर्जीव पदार्थात अणूंच्या हालचालींमुळे उष्णता तयार होते. जशी अणुंची हालचाल कमी होईल तसे त्या पदार्थाचे तापमान परिपूर्ण शुन्याकडे जाते. प्रणाली विकसित करताना भोवतीची सूक्ष्म कंपने पदार्थापर्यंत पोहचू नये म्हणून शास्त्रज्ञांनी विशेष काळजी घेतली आहे. तापमान जसे कमी होत जाते, तशी पदार्थाची वाहकताही वाढते.
त्याला आपण सुपरकंडक्टिविटी असे म्हणतो. तापमान परिपूर्ण शुन्याकडे जात असताना पदार्थांच्या विद्यूतचुंबकीय गुणधर्मामुळे निर्माण होणारी जटिलताही हाताळावी लागते. पदार्थातील अतिसंवाहकता, परिपूर्ण शून्य तापमान, विद्यूतचुंबकीय बदल आदी मूलभूत संशोधनासाठी ही प्रणाली निश्चिातच उपयोगी पडणार आहे.
पण त्याचबरोबर याद्वारे होणारी संशोधने उपयोजित विज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवतील. जगातील विविध प्रयोगशाळांत शास्त्रज्ञांना याचा आगामी काळात मोठ्या प्रमाणात उपयोग होईल असे मानले जाते. सध्या हे संशोधन प्राथमिक टप्प्यावर आहे. पण आगामी काळात त्यावर सखोल प्रयोग केले जाणार आहेत.
Success for American researchers in achieving ultra-low temperatures
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळेना, केंद्राकडून आणि उत्तर प्रदेशात पत्रकारांना आर्थिक मदत देणे सुरूही
- नवीन पटनाईक यांनी ओडिशाची ओळख बदलली, सर्वाधिक गरीब राज्य ते संकटाशी यशस्वी मुकाबला, आता आपत्तीशी लढण्यासाठी घर घर योध्दा
- लॉकडाऊन सदृश्य निर्बंध पुन्हा वाढविले; मात्र पॉझिटिव्हिटी दर कमी असल्यास दुकानांच्या वेळा दुपारी दोनपर्यंत
- केंद्र सरकार जुलैअखेरपर्यंत २० ते २५ कोटी कोविड प्रतिबंधक लसीचे डोस मिळविणार; दरमहा संख्येत वाढही करणार
- कोविडच्या तिसऱ्या लाटेलाही तोंड देण्यास देश सज्ज; सार्वत्रिक लसीकरणाची योजना वास्तवात आणू; विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचा निर्वाळा