नाशिक : सुपाऱ्या, नारळ, शेण, बांगड्या फेका, बाळासाहेबांच्या वारसांचा तिहेरी तिढा; काँग्रेस – राष्ट्रवादीत एकमेकांच्या जागा खेचा!!, यात आता महाराष्ट्राचे राजकारण अडकले आहे. Shivsena and MNS agitation against each others
दोन शिवसेना आणि मनसे हे तिन्ही पक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच वारसा सांगत राजकारण करतात, पण ते एकमेकांविरोधात. उद्धव आणि राज ठाकरे या दोन भावांच्या राजकीय वादात शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक लढतात. पूर्वी ते एकमेकांची डोकी फोडत असत. आता ते सुपाऱ्या, नारळ, शेण आणि बांगड्या या निरुपद्रवी वस्तू एकमेकांना फेकून मारतात. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात आंदोलन केल्याचा राजकीय कंडू शमतो. त्याच्या माध्यमांमध्ये मोठमोठ्या बातम्या येतात, पण या आंदोलनातून किमान एकमेकांची डोकी तरी फुटत नाहीत.
“माफक” आंदोलन
शिवसैनिकांनी बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर सुपऱ्या फेकल्या म्हणून मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर ठाण्यात नारळ, शेण आणि बांगड्या फेकून मारले. दोन्ही बाजूंनी एकमेकांना मर्द असाल तर समोर या वगैरे धमक्या देऊन झाल्या. कोल्हापुरात मनसैनिकांनी शिवसेनेच्या पाटीला काळे फासले. बातम्या येण्याएवढे हे “माफक” आंदोलन नक्की झाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यात कुठलाच सहभाग नोंदवला नाही, पण ॲक्शनला रिएक्शन येणारच एवढी “माफक” प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी व्यक्त करून आपण महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेची दखल घेतो एवढेच दाखवून दिले. त्यामुळे बाळासाहेबांच्या वारसांच्या आंदोलनातून फारसे काही घडले नाही.
मुसलमानांच्या एकाच वेळेच्या मतांची किंमत समजली का उद्धव बाबू?
मुस्लिम आंदोलनावर “ब्र” नाही
मुसलमानांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त एकदाच मतदान केले, तर त्याची 6 महिने उलटण्याच्या आत मुसलमानाने किंमत मागितली. शिवसेनेचे 9 खासदार वक्फ बोर्ड विधेयकाच्या विरोधात उभे राहिले नाहीत. आमच्या मतांमुळे ते निवडून आले होते. उद्धव ठाकरे तुम्ही उत्तर द्या, असे सांगत मुसलमानांनी मातोश्री समोर आंदोलन केले. पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी या आंदोलनाबद्दल तोंडातून “ब्र” काढला नाही. ते आणि त्यांचे शिवसैनिक फक्त मनसे आणि राज ठाकरे यांना शाब्दिक झोडपण्याची हिंमत दाखवू शकले.
काँग्रेस – राष्ट्रवादीत खेचाखेच
एकीकडे बाळासाहेबांच्या वारसांचा असा तिहेरी तिढ्याचा लढा सुरू असताना दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्या जुळवा जुळवीचे राजकारण सुरू होते. पवार काल संजय काकडे आणि बच्चू कडू यांना भेटले. पप्पू कलानी काँग्रेसच्या कार्यालयात गेले. यातून बेरजेचे राजकारण साधले गेले असे वाटत असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात विधानसभा मतदारसंघांची खेचाखेच सुरू झाली. नगर जिल्ह्यातले काँग्रेस नेते पवारांना भेटले आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या नगर आणि श्रीगोंदे या दोन जागा काँग्रेस साठी मागितल्या.
रोहित पवारांना विरोध
नगर जिल्ह्यातल्याच पवारांच्या नातवाच्या म्हणजे रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघावर तर काँग्रेसने जाहीर दावा ठोकून रोहित पवारांना बारामतीला हाकलण्याची तयारी चालविली.
विधानसभेच्या जागा खेचण्यात काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहून अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नगर जिल्ह्यातला बदला पुण्यात घ्यायचे ठरवून काँग्रेसच्या हक्काच्या मतदारसंघावर दावा ठोकला. यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवारांचीच भेट घेऊन त्यांना काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी साकडे घातले. काँग्रेस नेते आबा बागूल यांनी पवारांना भेटून पर्वती मतदारसंघ काँग्रेस साठी सोडायची मागणी केली होती. त्यावर कडी म्हणून उदय प्रमोद महाले आणि नीलेश निकम यांनी शिवाजीनगर आणि पुणे कँन्टोन्मेट मतदारसंघांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेससाठी केली. यासाठी या कार्यकर्त्यांनी पवारांचीच भेट घेतली. यातून काँग्रेस – राष्ट्रवादीत खेचाखेचीची तीव्रता समजून आली.
Shivsena and MNS agitation against each others
महत्वाच्या बातम्या
- Waqf Bill : 99 % जमीन गुंडांच्या ताब्यात; मध्य प्रदेश वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचा घणाघात; संघाला मशिदी ताब्यात घ्यायच्यात; ओवैसींचा कांगावा!!
- India hockey Team : भारताच्या खात्यात आणखी एक पदक, स्पेनला हरवून हॉकीमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक पटकावले
- Eknath Shinde : बांगलादेश हिंसाचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा!
- Vinesh Phogat : विनेश फोगटला अजूनही जिंकू शकते रौप्यपदक?, CAS लवकरच निर्णय देणार!