• Download App
    पवारांची "पॉवरफुल खेळी"; महाविकास आघाडीत मारल्या "गुढ गाठी"; कोल्हापूरची जागा उतरवली काँग्रेसच्या गळी!! Sharad pawar convinces shehu maharaj to contest loksabha election on Congress ticket

    पवारांची “पॉवरफुल खेळी”; महाविकास आघाडीत मारल्या “गुढ गाठी”; कोल्हापूरची जागा उतरवली काँग्रेसच्या गळी!!

    नाशिक : 84 वर्षांचे “तरुण योद्धा” शरद पवार “पॉवरफुल खेळी” करण्यात तरबेज आहेत. विशेषत: आपल्याला अडचणीच्या ठरणाऱ्या गोष्टी इतरांच्या गळी उतरवण्यात तर, त्यांचा हातही कुणी धरू शकत नाही, याचा प्रत्यय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत नुकताच आला. Sharad pawar convinces shehu maharaj to contest loksabha election on Congress ticket

    शरद पवारांनी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांची नुकतीच भेट घेतली आणि त्यांना महाविकास आघाडीतर्फे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी राजी केले. म्हणजे तशा बातमी आल्या. अर्थातच त्यामुळे शाहू महाराज हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणार अशा अटकळी बांधल्या गेल्या, पण प्रत्यक्षात शरद पवारांनी कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडून दिली. त्यामुळे आता शाहू महाराज लढलेच, तर ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवतील… आणि हीच ती नेमकी पवारांची “पॉवरफुल खेळी” आहे!!

    कारण पवारांना कोल्हापूरच्या जागेबाबत स्व पक्षातून कुठलीच “रिस्क” घ्यायची नाही. कोल्हापूरमध्ये छत्रपती संभाजी राजे यांना 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उतरवून पवारांनी तिथे पराभव चाखला होता. पण 2014 मध्ये त्यांनी धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आणले. पण तो विजय निसटताच ठरला होता. पण नंतर धनंजय महाडिकही पवारांना सोडून भाजपच्या गोटात दाखल झाले आणि राज्यसभेचे खासदार बनले.

    दरम्यानच्या काळात संभाजी राजे यांची राष्ट्रपती नियुक्त उमेदवारीची खासदारकी संपून ते पुन्हा खासदार होण्यासाठी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागायला गेले, तेव्हा पवारांनी त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे “धाडले.” उद्धव ठाकरे यांनी संभाजी राजेंना शिवबंधन बांधण्याची अट घालून उमेदवारी देऊ केली. पण संभाजी राजेंनी ते शिवबंधन नाकारली. त्यामुळे त्यांना खासदारकी मिळू शकली नाही.

    आता धनंजय महाडिक यांच्यासारखा तगडा गडी भाजपच्या गोटात आहे. हसन मुश्रीफ हे देखील अजित पवारांबरोबर जाऊन भाजपच्याच गोटात येऊन दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पवारांची कोल्हापूर मतदारसंघातली मूलभूत ताकद फार घटली आहे. अशावेळी खुद्द संभाजी राजेच त्यांच्या स्वराज्य पक्षाच्या स्वतंत्र चिन्हावर महाविकास आघाडीत येऊन निवडणूक लढवण्याच्या बेतात असतानाच पवारांनी “पॉवरफुल खेळी” करत संभाजी राजेंचे वडील शाहू महाराज यांचे नाव पुढे केल्याने छत्रपतींच्या कुटुंबात फूट पडते की काय, अशी शक्यता निर्माण झाली. संभाजी राजे अचानक सोशल मीडियातून दूर गेले. पवारांची “पॉवरफुल खेळी” छत्रपतींच्या घराण्यात फूट पाडण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा कोल्हापूरमध्ये सुरू झाली.

    पण इतकेच करून पवार थांबले नाहीत. पवारांनी शाहू महाराजांना जरी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास राजी केले असले, तरी ते स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर नव्हे, तर ते काँग्रेसच्या तिकिटावर. म्हणजेच पवारांना आपल्या चॉईसचे उमेदवार म्हणून शाहू महाराज हवेत, पण ते स्वतःच्या पक्षाचे उमेदवार नकोत. कारण त्यांना कोल्हापूर मतदारसंघात अपयश आले, तर तो “ठपका” पवारांना स्वतःच्या पक्षावर घ्यावा लागेल आणि या भीतीनेच त्यांनी शाहू महाराजांना काँग्रेसच्या गोटात धाडल्याचे कोल्हापुरात बोलले जात आहे.

    यासाठी पवारांनी सतेज पाटलांचे “कार्ड” “ऍक्टिव्हेट” केले आणि महाविकास आघाडीत कोल्हापूरची जागा काँग्रेसच्या गळी उतरवण्याची व्यवस्था केली, असे मानले जात आहे. ते काहीही असले तरी पवारांच्या या “पॉवरफुल खेळीने” कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात “गुढ गाठ” मारली गेली आहे आणि त्यामुळे गुंता अधिक वाढला आहे, हे मात्र निश्चित!!

    Sharad pawar convinces shehu maharaj to contest loksabha election on Congress ticket

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!