नाशिक : एकनाथ शिंदे गट गुवाहाटीतून गोव्याकडे रवाना झाला असला तरी गुवाहाटीतल्या हॉटेल रेडिसन मधल्या अनेक रसाभरीत कहाण्या आजही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. गुवाहाटीतल्या हॉटेल रेडिसन मधील गुलाबराव पाटलांचे भाषण सोशल मीडियावर भलतेच गाजले. वेळ येईल तेव्हा संजय राऊतांना चुना लावून दाखवू हे त्यांचे वक्तव्य सोशल मीडियावर सुपरहिट ठरले. त्याआधी शहाजीबापू पाटलांचे काय डोंगार, काय झाडी, काय हाटील एकदम ओक्के!!, हा डायलॉग गाजला!! Shahaji bapu patil told the story of sharad Pawar destroyed political family of maharashtra
आता शहाजीबापू पाटलांचे पुढचे भाषण देखील सोशल मीडियावर गाजत आहे. शहाजीबापू पाटील यांनी आपल्या भाषणात शरद पवारांनी एक – एक करून पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय घराणी कशी संपवली याची उदाहरणासकट यादीच वाचून दाखवली. ज्यांनी-ज्यांनी शरद पवारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला किंवा ज्यांना शरद पवारांनी जवळ घेतले ते सगळे संपले, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
वसंतदादा पाटलांनी सगळ्यांना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायला सांगितले. पण शरद पवारांनी वसंतदादांचे घराणी संपवले. इतकेच नाही तर आज कुठे आहे वसंतदादांचे घराणे??, कुठे आहे प्रतापराव भोसले यांचे घराणे??, कुठे आहे श्रीपतराव बोंद्रे यांचे घराणे?? कलाप्पा आवाडे यांचे घराणे?? आणि कुठे आहे सोलापूरच्या नामदेवराव जगताप यांचे घराणे??, असे एकापाठोपाठ एक सवाल शहाजीबापू पाटलांनी डागले.
– विलासराव सुशील कुमार निघाले हुशार
त्याच वेळी त्यांनी विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय हुशारीचा ही दाखला दिला. शरद पवारांची कुटीलनीती ओळखून विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे हे त्यांच्यापासून वेळीच पळून दूर गेले म्हणून ते वाचले, असे सांगताच रेडिसन मधल्या हॉल मध्ये आमदारांमध्ये हशा पिकला. शहाजी बापू पाटील यांनी एकनाथ शिंदेंना साहेब कोणताही निर्णय घ्या. पण शरद पवारांना जवळ करू नका, असे सांगताच आमदारांमध्ये एकदम हास्यकल्लोळ उडाला आणि एकनाथ शिंदेही बरोबर आहे, असे म्हणत शहाजीबापू पाटलांना दुजोरा देताना दिसले!!
शहाजी बापू पाटलांनी एक प्रकारे महाराष्ट्राचा राजकीय इतिहासच शिवसेनेच्या सगळ्या आमदारांसमोर उलगडून दाखवला आणि वर उल्लेख केलेल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मातब्बर राजकीय घराण्यांची नावे घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना गंभीर इशारा देऊन टाकला. शरद पवारांची कुटीलनीती प्रत्येक राजकीय घराणे संपवण्याचीच आहे. त्यामुळे तुम्ही सावध रहा असाच सूचक इशारा त्यांनी ठाकरे परिवाराला दिल्याचे दिसले.
शहाजीबापू पाटलांचा “काय डोंगार, काय झाडी, काय हाटील, एकदम ओक्के”, हा डायलॉग जेवढा गाजला तसेच त्यांचे “राजकीय घराणी संपवणाऱ्या पवारांची कहाणी” हे भाषण देखील सोशल मीडियावर जोरदार गाजताना दिसत आहे.
Shahaji bapu patil told the story of sharad Pawar destroyed political family of maharashtra
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत चार मजली इमारत कोसळली : 18 ठार, 15 जणांना वाचवलं, ढिगाऱ्याखाली आणखी अडकल्याची भीती
- 30 वर्षीय आकाश अंबानी करणार जिओचे नेतृत्व : 65 वर्षीय मुकेश यांचा संचालकपदाचा राजीनामा, रिलायन्समध्ये ठरला उत्तराधिकारी
- ADR Election Watch Report : राज्यसभेतील 31 टक्के खासदारांविरुद्ध फौजदारी खटले, 87 टक्के कोट्यधीश, वाचा सविस्तर…
- राज्यपालांचे पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले; ठाकरे – पवार सरकारची 30 जूनला विधानसभेत अग्निपरीक्षा!!