• Download App
    लाईफ स्किल्स : यशासाठी आधी ध्येय ठरवा आणि आपल्या ध्येयावर ठाम रहा Set goals for success and stick to your goals

    लाईफ स्किल्स : यशासाठी आधी ध्येय ठरवा आणि आपल्या ध्येयावर ठाम रहा

    कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायेच असल्याच सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित करायला पाहिजे. त्यानंतर आपले ध्येय हेच आपले जग होऊन जायला पाहिजे. कोणतेही आणि कितीही मोठे यश असू दे, त्याचा आरंभ बिंदू म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे याचा स्पष्ट निर्णय. ज्या क्षणी तुम्ही तुमचे ध्येय निश्चिित करून ते कागदावर लिहून घेता त्या क्षणी तुम्ही एक वेगळेपणा अनुभवता. Set goals for success and stick to your goals

    स्वतःवर स्वतःचे नियंत्रण असल्याची जाणीव होते. ही जाणीव सर्वोत्तम कामगिरी करण्याकरिता अत्यंत आवश्यक आहे. ध्येय न ठरवता उगाचच रस्ता जातोय म्हणून त्या रस्त्याने चालत राहणे हे मूर्खपणाचे आहे. हा रस्ता कुठे चाललाय हे तेव्हाच कळणार जेव्हा आपणाला आपले इच्छित ध्येय माहिती असेल.

    खूप वेळेला असे दिसून येते की आपण केलेले संकल्प हे केवळ स्वप्नवत राहतात. आपण ते पूर्ण करण्यासाठी निश्चकयी नसतो. आपण केलेले संकल्प आपण नेहमी व्यक्त केले पाहिजेत. नेमक्या शब्दांत त्यांची मांडणी करून स्पष्टपणे लिहून ठेवले पाहिजेत. त्या दृष्टीने प्रयत्न करून नेमक्या एवढ्या एवढ्या दिवसात मला संकल्प पूर्ण करायचे आहेत, असे ठरवले पाहिजे.

    संभ्रमात न राहता आपल्या कृतींना निश्चिरत दिशा देऊन वेळेचा व आपल्या शक्तीमचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. आपण निश्चिषत केलेल्या ध्येयावर ठामपणे राहणे व त्याचे टप्पे तयार करून एक एक पायरी चढून जाणे महत्त्वाचे ठरते. तेव्हाच ठरवलेले ध्येय आपल्याला अशक्य वाटणार नाही. उलट ते आपल्या आवाक्यात असल्यासारखे वाटून सकारात्मकता तयार होईल. या सकारात्मक विचारांतून न थांबता अविरतपणे त्याच्यावर काम करत राहिले पाहिजे.

    आपल्याला काय मिळवायचे आहे, याचे भान असणे आवश्यक आहे. कृती केल्याशिवाय ध्येयप्राप्ती अशक्य आहे. तुम्ही कितीही चांगली योजना बनवलीत पण कार्यच केलं नाही तर काहीही निष्पन्न होणार नाही. यश प्राप्तीसाठी आवश्यकता आहे ती पहिल्या पावलाची. एकदा का गती प्राप्त झाली की आपोआपच पाहिल्या क्रियेमधूनच दुसरी मोठी क्रिया निर्माण होते. परंतु, यासाठी चालढकल करण्याची सवय सोडून लहानशी का होईना पण कृती करायला हवी.

    Set goals for success and stick to your goals

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!

    Sangram thopte संग्राम थोपटेंना काँग्रेसने दिले तोकडे बळ, पवारांनी नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!!