• Download App
    Secrets of Science: Twelve thousand species of ants around the world, the queen ant lives up to 30 years

    विज्ञानाची गुपिते : जगभरात मुंग्यांच्या बारा हजार प्रजाती, राणी मुंगी जगते तब्बल ३० वर्षापर्यंत

    इवलीशी मुंगी, पण या मुंगीबद्दल आपल्याला काही गोष्टी माहितीच नसतात. या मुंग्यांचे विश्व फार भारी आहे. अनेकदा ती मुंगी आपल्या तोंडात पांढरं काही तरी घेऊन जाताना दिसते. मग आपल्याला कोणी वडिलधाऱ्याने सांगितलं असेल की ती तिची अंडी आहेत. मुंगी हा असा प्राणी आहे जो जगभरात सर्वत्र आढळतो. अंटार्क्टिका आणि काही मोजक्या बर्फाळ प्रदेशाला सोडून पृथ्वीवर सर्वत्र मिळणारा जीव म्हणजे मुंगी. जगभरात मुंग्यांच्या तब्बल १२००० जाती आहेत. ०.०३ इंच पासून ते २ इंच पर्यंतच्या या मुंग्या विविध आकारांत दिसून येतात. सर्व मुंग्यांना जन्म देणारी राणी मुंगी ही ३० वर्षापर्यंत जगते. हे आयुष्य़ इतर मुंग्यांपेक्षा १०० पटीने जास्त आहे. Secrets of Science: Twelve thousand species of ants around the world, the queen ant lives up to 30 years

    मुंग्यांच्या सर्वात मोठ्या वसाहतीला सुपरकॉलनीज म्हणतात. हे मोठे वारूळ तब्बल ३७०० मैल लांब असू शकते. यात जवळ जवळ एक अब्ज मुंग्या राहू शकतात. ओहायो विद्यापीठाने केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की मुंगी आपल्या वजनाच्या फक्त ५० पट नव्हे तर ५००० पट एवढे जास्त वजन वाहून नेवू शकते. मुंग्या फक्त ओझे उचलण्यात सक्षम नसतात, तर त्या चांगल्या धावपटू्सुद्धा असतात. त्या प्रत्येक सेकंदाला तीन इंच एवढं धावू शकतात. माणूस जर या वेगाने पळू लागला तर तो ताशी ५५ किलोमीटर एवढ्या वेगाने धावू शकेल. बुलेट ऍंटच्या चाव्यास सर्वात वेदनादायी मानले जाते, तर जॅक जम्पर या जातीतील मुंगीचं चावणं हे अत्यंत घातक ठरू शकतं. जगभरात मुंग्या या लाल आणि काळ्या रंगात असतात. पण काही ठिकाणी हिरव्या रंगाच्या सुद्धा असतात.

    Secrets of Science : Twelve thousand species of ants around the world, the queen ant lives up to 30 years

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??