Thursday, 1 May 2025
  • Download App
    विज्ञानाची गुपिते : रात्रीच्या झगमगाट निसर्गातील जीवनचक्रासाठी बनतोय घातक । Secrets of Science: Night glow is becoming dangerous for the life cycle of nature

    विज्ञानाची गुपिते : रात्रीच्या झगमगाट निसर्गातील जीवनचक्रासाठी बनतोय घातक

    चमचमते समुद्रकिनारे आणि विविध अत्याधुनिक प्रकाशाने झळाळून निघणाऱ्या शहरांची छायाचित्रं प्रेक्षणीय असतात. मात्र हा प्रकाश माणसाच्या आरोग्याला घातक आहे. अवकाशातून काढलेल्या पृथ्वीच्या नवीन छायाचित्रांनुसार, प्रकाश प्रदूषणाचा अतिरेक होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे रात्रीचा नैसर्गिक प्रकाश हरवत चालल्याचं सिद्ध झालं आहे. प्रकाश प्रदूषणामुळे बहुतांशी देशांमध्ये झाडं, वनस्पती, वेली, प्राणी, पक्षी, वन्यजीव ही परिसंस्था आणि मानवजातीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत आहे. प्रत्येक देशातलं प्रकाश प्रदूषणाचं प्रमाण वेगवेगळं आहे. अमेरिका आणि स्पेन या देशांमधलं प्रकाश प्रदूषणाचं प्रमाण स्थिर आहे. मात्र दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशियातल्या अनेक देशांमध्ये प्रकाश प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढते आहे. युद्धग्रस्त सीरिया आणि येमेन या देशांमध्ये कृत्रिम प्रकाशाचं आक्रमण कमी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. Secrets of Science: Night glow is becoming dangerous for the life cycle of nature

    अमेरिकन मेडिकल असोसिएशनने अतिप्रकाशमान, चुकीची संरचना असणारं एलईडी लायटिंग पर्यावरणासाठी घातक असल्याचं जाहीर केलं. झोप येण्यासाठी मेंदूत स्रवणाऱ्या मेलाटोनिन या संप्रेरकावर निळ्या प्रकाशाचा परिणाम होत असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं. कृत्रिम प्रकाश परागीभवनाच्या प्रक्रियेकरता प्रतिकूल ठरत असल्याचं सिद्ध झालं आहे. निशाचर कीटक परागीकरण्याच्या प्रक्रियेत मदत करतात, पण या कीटकांना कृत्रिम प्रकाश अडथळा ठरतो.

    कृत्रिम प्रकाश असणाऱ्या परिसरातील झाडांची फळ आणि बीजधारण प्रक्रिया नैसर्गिक प्रकाशात वाढणाऱ्या झाडांच्या तुलनेत एक आठवडा लवकर होते, असं संशोधनानुसार स्पष्ट झालं आहे. कृत्रिम प्रकाशामुळे रात्री स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. कृत्रिम प्रकाश अर्थात प्रकाश प्रदूषणाचा सभोवतालच्या पर्यावरणावर दूरगामी परिणाम होतो. माणसं पाहू शकतात असा निळाशार प्रकाश सॅटेलाइट पूर्णत: टिपू शकत नाही. हाच निळा प्रकाश प्रदूषणात भर घालतो आणि वातावरण प्रकाशमान करतो.

    माणसं कृत्रिम प्रकाशाचा थररुपी पट्टा स्वत:वर ओढवून घेत आहेत. आकाशातले ताऱ्यांचं विश्व दिसू शकेल असं रात्रीचं निरभ्र आकाश सापडणं दुरापास्त झालं आहे. शहरांमधला झगमगाट आपण कमी करू शकतो आणि यामुळे दृश्यमानतेची पातळी कमी होण्याची काहीही शक्यता नाही. कारण माणसाच्या डोळ्याचं काम विरोधाभासी प्रतिमांच्या माध्यमातून चालतं. त्याला अतिरिक्त प्रकाशाची गरज नसते. दिखाऊपणासाठी वापरण्यात येणारा झगमगाट कमी केल्यास मानवजातीचं भलं होऊ शकते. तसं झालं तर ऊर्जासंवर्धनही होऊ शकेल.

    Secrets of Science: Night glow is becoming dangerous for the life cycle of nature

    Related posts

    Caste census : काँग्रेसने राहुलच्या यशाचे ढोल पिटले तरी प्रत्यक्षात मोदींचे “कमंडल” राजकारण यशस्वी, “मंडल” राजकारणात एन्ट्री!!

    मोदी तिकडे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायच्या बेतात; पवार इकडे दहशतवाद्यांच्या धर्मांधतेच्या चिखलात!!

    RSS chief Mohan Bhagwat प्रचंड राजकीय धकाधकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मोदींच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा, पण नेमके गूढ काय??