- बांगलादेशी आगडोंबात वंगबंधू म्युजियम + इंदिरा गांधी कल्चरल सेंटर आगीत खाक!! मोहम्मद युनूस म्हणतात, हा तर “दुसरा मुक्ती संग्राम”!!
बांगलादेशातील आरक्षण विरोधी आंदोलनाला वेगवेगळ्या टप्प्यांवर जे हिंसक वळण लागले, ते आवरण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्या हिंसाचाराचे मोहम्मद युनूस यांच्यासारख्या नोबेल पुरस्कार विजेत्या अर्थशास्त्रज्ञाने बांगलादेशाचा “दुसरा मुक्ती संग्राम” म्हणून वर्णन केले. जमाते इस्लामीच्या हिंसाचाराचे त्यांनी समर्थन केले. या तथाकथित दुसऱ्या मुक्ती संग्रामात वंगबंधू म्युजियम आणि इंदिरा गांधी इंडियन कल्चरल सेंटर आगीत खाक झाले. प्रतिकात्मक अर्थाने हा खरंच बांगलादेशाच्या 100 % इस्लामी राजवट आणायचा मुक्ती संग्राम ठरला. Nobel laureate Mohammed yunus supports vandalism as second mukti sangram
मोहम्मद युनूस हे जरी नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ असले, तरी त्यांचे आणि शेख हसीना यांचे कधीच पटले नाही. मोहम्मद युनूस यांना शेख हसीना यांची धर्मनिरपेक्ष राजवट मान्य नव्हती. त्यांचा ग्रामीण बँकेचा प्रयोग आंतरराष्ट्रीय पातळीवर वाखाणला गेला असला, तरी तो प्रयोग संपूर्ण निर्दोष होता, असे मानण्यास वाव नव्हता. कारण मोहम्मद युनूस यांनी वाटलेली कोट्यवधींची छोटी कर्जे बुडाली होती. खुद्द मोहम्मद युनूस यांच्यावर आर्थिक घोटाळ्याच्या शेकडो केसेस आहेत. यात 8 मिलियन टका मनी लॉन्ड्रीगच्या केसचाही समावेश आहे. मोहम्मद युनूस यांनी सगळे आरोप आणि केसेस खोडून काढल्या असल्या तरी त्यांची कुठल्याही केसमधून निर्दोष सुटका झालेली नाही. त्यामुळे मोहम्मद युनूस आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले असले तरी बांगलादेशात ते पूर्ण निष्कलंक म्हणून कधीच गणले गेले नव्हते.
हेच मोहम्मद युनूस बांगलादेशच्या सिव्हिल सोसायटीचे देखील नेते आहेत. शेख हसीना या लोकशाहीच्या मार्गाने हुकूमशहा बनल्याचा आरोप त्यांनी केला. त्यात तथ्य नाही असे समजायचे कारण नाही, पण मोहम्मद युनूस शेख हसीना यांच्या हुकूमशाहीला विरोध करून ज्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार होणार आहेत, ते सरकार तर थेट जमाते इस्लामी आणि बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या हस्तकांचे आणि बांगलादेशी लष्कराच्या नियंत्रणाखालचे सरकार असणार आहे.
शेख हसीना यांची राजवट हुकूमशाहीची होती, तरी विद्यार्थी आंदोलनाला पाकिस्तान, अमेरिका आणि चीन यांनी खतपाणी घालण्यापूर्वी बांगलादेशात शांतता होती. बांगलादेशाची अर्थव्यवस्था स्थिर होती. विद्यार्थी आंदोलनात जमाते इस्लामी आणि बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे हस्तक घुसल्यावर बांगलादेशात अराजक माजले. विद्यार्थी आंदोलनाच्या आवरणाखाली प्रचंड हिंसाचाराचा आगडोंब उसळला.
27 जिल्ह्यात हिंदूंवर हल्ले
या आगडोंबात 27 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर हल्ले झाले. मंदिरे, घरे, दुकाने भस्मसात झाली. हिंदूंवर निर्वासित होण्याची पाळी आली. 1970 च्या दशकात पूर्व पाकिस्तानातल्या हिंदूंवर असेच निर्वासित होण्याची पाळी आली होती, पण ती पश्चिम पाकिस्तानने आणली होती. आता तर बांगलादेशी जमाते इस्लामीच्या गुंड म्होरक्यांनी स्वतंत्र बांगलादेशात हिंसाचार माजवून हिंदू समाजावर निर्वासित होण्याची पाळी आणली आहे आणि नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस त्याचाच “दुसरा मुक्ती संग्राम” म्हणून उदोउदो करीत आहेत.
-खऱ्या मुक्ती संग्रामाची प्रतिके आगीत खाक
बांगलादेशाच्या पहिल्या मुक्ती संग्रामात तिथले हिंदू देखील बंगाली मुस्लिमांच्या खांद्याला खांदा लावून लढले होते. वंगबंधू शेख मूजिबूर रहमान यांनी इंदिरा गांधी यांच्या कणखर साथीमुळे पाकिस्तान पासून मुक्ती मिळवली होती. वंगबंधू म्युजियम आणि इंदिरा गांधी इंडियन कल्चरल सेंटर ही त्या मुक्ती संग्रामाची प्रतिके होती. मोहम्मद युनूस यांनी गौरविलेल्या दुसऱ्या मुक्ती संग्रामात ती आगडोंबात खाक झाली. मोहम्मद युनूस यांना आणि त्यांच्या नोबेल लॉबीला नेमके हेच अपेक्षित असेलही, पण हा खरा मुक्ती संग्राम नव्हे, कारण वंगबंधू शेख मूजिबूर रहमान आणि इंदिरा गांधी यांनी जमाते इस्लामी संघटनेच्या हातात देण्यासाठी स्वतंत्र बांगलादेशाची निर्मित केली नव्हती. नंतरच्या राज्यकर्त्यांनी बांगलादेशाची वाट लावली. त्या वाट लावण्याचे मोहम्मद युनूस समर्थक झालेत.
वास्तविक मोहम्मद युनूस यांनी स्वतंत्र बांगलादेश निर्मितीचे सगळे “लाभ” घेतले. स्वतःचा विकास आणि प्रतिमा निर्मिती करून घेतली. पण शेख हसीना यांच्याशी त्यांचे अनेक मुद्द्यांवर फाटले. त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झाले. त्यावेळी त्यांना शेख हसीना या वंगबंधूंचा वारसा चालवत नाहीत. त्यांनी वंगबंधूंच्या वारशाला हरताळ फासल्याचा “साक्षात्कार” झाला. आता बांगलादेशातल्या आगडोंबात वंगबंधू म्युजियम आणि इंदिरा गांधी इंडियन कल्चरल सेंटर खाक झाले, तेव्हा वंगबंधूंचा कुठला वारसा मोहम्मद युनूस किंवा जमाते इस्लामी यांनी पुढे चालवला??
भारतावर आरोप करताना मोहम्मद युनूस यांना “सार्क”ची आठवण झाली, ज्यात पाकिस्तान सामील होता, ती संघटना मोहम्मद युनूस यांना हवी आहे. यातच त्यांचे हेतू समजले. दुसऱ्या मुक्ती संग्रामाचे नोबेल प्रलाप उघड्यावर येऊन पडले!!
Nobel laureate Mohammed yunus supports vandalism as second mukti sangram
महत्वाच्या बातम्या
- Jammu and Kashmir : ‘जम्मू-काश्मीरमध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार’ केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती!
- West Bengal : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेत पहिल्यांदाच भाजप आणि तृणमूलचे झाले एकमत
- Raj Thackeray : राज ठाकरेंनी बोलायची तयारी दाखवली तरी मराठा आंदोलकांचा राडा; मनोज जरांगेंच्या नावाने घोषणा!!
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार, दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला!