Tuesday, 6 May 2025
  • Download App
    विज्ञानाची डेस्टीनेशन्स : ह्रदय सांभाळण्यासाठी कमीत कमी बसा । Science Destinations: At least sit down to take care of the heart

    विज्ञानाची डेस्टीनेशन्स : ह्रदय सांभाळण्यासाठी कमीत कमी बसा

    गेल्या काही वर्षांत जगभरात ह्रदविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. चुकीच्या जीवनशैली, मानसिक ताणतणाव, धावपळ आदींमुळे हा विकार होण्याची शक्यता बळावते. त्याचप्रमाणे नवनव्या गृहोपयोगी वस्तूंमुळे लोकांचे घरात काम करण्याचे प्रमाण खूप कमी होत आहे. त्याचा परिणाम एकूणच जीवनशैलीवर होत आहे. पूर्वी साठीच्या वयात डोकावणारा हृदयरोग आता चाळिशीच्या घरातील व्यक्तीपर्यंत पोहोचला आहे. हृदयरोगाची कारणे शोधण्याचे प्रयत्न जगभरात सुरू आहेत. त्यातून नवनवी महितीदेखील पुढे येत आहे. त्यानुसार तुम्ही अधिक काळ एकाच ठिकाणी बसत असल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो असे एका नव्या संशोधनात समोर आले आहे. Science Destinations: At least sit down to take care of the heart

    हृदयविकाराचा झटका टाळायचा असल्यास दोन पद्धतींचा वापर करणे गरजेचे असल्याचे संशोधकांचे मत बनले आहे. त्यात बसण्याचे प्रमाण कमी करणे आणि शारीरिक व्यायाम वाढवणे आवश्यक आहे. सारखे बसून काम करण्याचा आणि हृदयविकाराच्या झटक्याचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे अधिकाधिक कार्यक्षम राहा, कमीत कमी बसा, असा सल्ला अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी दिला आहे. या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी शास्त्रज्ञांनी ४५ ते ६९ वयोगटातील तब्बर ९० हजार पुरुषांची तपासणी केली. या संशोधनात व्यक्तीच्या शारीरिक ऊर्जेचा अभ्यास करण्यात आला. शारीरिक व्यायाम न करणाऱ्या ५२ टक्क्यांहून अधिक व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा दोष आढळला.

    आठ वर्षे सतत संशोधन केल्यानंतर हे निष्कर्ष मिळाले आहेत. कामाव्यतिरिक्त पुरुष हे पाच हून अधिक तास दिवसातून बसत असतात. त्यामुळे त्यांच्यात हृदयविकाराचे प्रमाण ३४ टक्क्याहून अधिक आढळले. हे संशोधन कामाव्यतिरिक्त बसणाऱ्या व्यक्तींसाठी करण्यात आले. या अभ्यासाला अमेरिकन हार्ट असोसिएशनने अर्थसाहाय्य केले. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी आठवड्यातून किमान दिडशे मिनिटे एरोबिक्स करण्याची शिफारस शास्त्रज्ञांनी केली आहे. त्याचप्रमाणे शक्य तितके चालणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

    Science Destinations: At least sit down to take care of the heart

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    सत्काराकडे पाठ फिरवून 5 माजी मुख्यमंत्र्यांकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीचा “करेक्ट साईज कार्यक्रम”; एक विद्यमान आणि दोनच माजी मुख्यमंत्री हजर!!

    Icon News Hub