जयदेव जयदेव जय शरद मूर्ती!!
Pravin Wankhade 16 Mar 2022 6:24 am 550
विनायक ढेरे
जयदेव जयदेव जय शरद मूर्ती
तुमची धरली मी संगत खोटी !!धृ.!!
आपण बदल्यांत खाल्ले कोट्यान कोटी
पण मज एकट्यास ईडी कोठडी
पापात घेई ना कुणी वाटा करी
खायला मात्र सगळे हात पुढे करी
मज मिळे शिक्षा ईडी कोठडी
तुम्ही घरी लोळा मऊ गाद्यांच्या वरी
लोक तुम्हा शरद चांदणे म्हणती
परी चटके आमुच्या बुडाला बसती
एकदा येऊन पाहा ईडी कोठडी
फरसबंदी गार आत वाजे थंडी
अनिल म्हणे आता थांबा दाखवतो
घेऊन सगळ्यांना मी पण बुडतो
(व्यंगचित्रे : सुमंत बिवलकर)
Satire marathi poem on Anil Deshmukh and Sharad Pawar