लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांकडून जी वक्तव्य येत आहेत, ती राजकीय वास्तवाला धरून असण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या शीर्षकाप्रमाणे, आकड्यांचे जंजाळ, स्थायिक रेटचे “डेकोरेशन”; ठाकरे – पवार – काँग्रेसच्या दंडांमध्ये फुगले “स्व”बळ!!, असेच आहे. कारण अगदी शरद पवार यांच्यासारखे मुरलेले नेते सुद्धा आकड्यांच्या जंजाळात अडकून स्ट्राईक रेटच्या बळावर स्वतःच्या पक्षाच्या दंडात फुगलेल्या बेटकुळ्या दाखवू लागले आहेत. Sanjay Raut exposed sharad pawar’s claim of big strike rate in loksabha elections
पण अगदी पवारांचे म्हणणे खरे मानून आकड्यांच्या जंजाळाचा आणि स्ट्राईक रेटचाच हिशेब लावायचा झाला, तर ज्या शरद पवारांनी महाराष्ट्रात 48 पैकी 10 जागा लढवून त्यापैकी 8 जागा जिंकून 80 % टप्पा गाठला, त्याचा जसाच्या तसा हिशोब लावायचा म्हटला, तर शरद पवारांच्या पक्षाने 500 जागा लढविल्या असत्या, तर त्यांना 400 जागा मिळाल्या असत्या असे म्हणण्यासारखे आहे!!… पण असे बोलून किंवा लिहून पवारांच्या पक्षाच्या यशाचे कितीही “डेकोरेशन” केले, तरी ते वास्तव आहे का??, याचा विचार केल्यानंतर पवारांनी पक्षाच्या दंडात फुगवलेल्या बेटकुळीची हवा सुटते!!
तशीच “हवा” ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनांच्या दंडांमध्ये शिरलेली दिसते. दोन्ही शिवसेना आमने – सामने उभ्या ठाकल्यानंतर त्यांना अनुक्रमे 9 आणि 7 जागा मिळाल्या. त्यामुळे दोघांची बेरीज 16 झाली आणि त्यांच्या मतांच्या टक्केवारीची बेरीज 27.5 % झाली, जी भाजप पेक्षा 1.5 % नी जास्त आहे, असा शोध काही माध्यमवीरांनी लावला. आता जर ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेना एक होऊन लढले असत्या, तर त्यांना वर उल्लेख केलेली टक्केवारीची आकडेवारी गाठता आली असती का??, असा सवाल आहे. याचे उत्तर अर्थातच नकारार्थी आहे. कारण कुठल्याही मतांची आकडे ही पक्षाच्या स्वबळाच्या ताकदीवर आणि युती किंवा आघाडीवरच अवलंबून असते आणि लोकसभेचाच विचार करायचा झाला, तर आघाडीमध्ये 14 खासदार मिळवून काँग्रेसने पवार + ठाकरेंवर कुरघोडी केली आहे.
किंबहुना कुठल्याही मतदानाची टक्केवारीची आकडेवारी बेरजेत, गुणाकारात किंवा भागाकारात मोजणे याच्या इतके फसवे गणित नसते. कारण शेवटी कुठलेही मतदान अशा टक्केवारी मध्ये होत नसते. मतदान झाल्यानंतर ते टक्केवारी मध्ये मोजले जाते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी मोजणे हे फार तर राजकीय पोस्टमार्टेम म्हणता येईल. पण त्यावर आधारित कुठल्याही निवडणुकीचे आकडेवारीचे भवितव्य मांडणे फारच “मर्यादित चाणक्य बुद्धी”चे लक्षण ठरेल.
पण महाविकास आघाडीतले सगळेच घटक पक्ष लोकसभा निवडणुकीतल्या अनपेक्षित यशाने एवढे फुगले आहेत की, त्यांना आपल्याकडे आलेले खासदारांचे आकडे आणि मिळालेली मतांची टक्केवारी “मॅग्निफाईंग ग्लास” मधून बघण्याची ओढ लागली आणि त्यामुळेच पवारांसारख्या मुरलेल्या नेत्याने आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे म्हणून आम्हाला आता विधानसभेत जास्त जागा हव्या असे म्हटले आहे.
परंतु त्यांचेच पट्टशिष्य असलेल्या संजय राऊत यांनी पवारांची स्ट्राईक रेटची हवा एका झटक्यात काढून टाकली. पवारांचा स्ट्राईक रेट एका लोकसभा निवडणुकीत चांगला आहे हे खरे, पण याचा अर्थ असा नव्हे की, त्यांनी लगेच विधानसभेत जास्त जागा लढवाव्यात. प्रत्यक्षात शिवसेनेचाही स्ट्राईक रेट चांगलाच आहे. कारण शिवसेनेला महाराष्ट्रात सर्वाधिक टार्गेट केले गेले, तरी शिवसेनेने झुंज देऊन 9 जागा आणल्या. मुंबईतल्या 2 जागा फार कमी फरकाने गेल्या कारण भाजपने जिथे घात केला, असा दावा संजय राऊत यांनी केला. पण ज्या स्ट्राईक रेटच्या बळावर पवार हे ठाकरे आणि काँग्रेसवर कुरघोडी करू पाहत होते, त्या पवारांना त्यांच्याच पट्टशिष्याने स्ट्राईक रेटचाच हवाला देऊन एका झटक्यात जमिनीवर आणले.
तसाही वर उल्लेख केल्याप्रमाणे स्ट्राईक रेटच्या आधारे किंवा टक्केवारीच्या आधारे आणि अगदी मिळालेल्या जागांच्या आधारे कुठल्याही निवडणुकीचे भवितव्य वर्तविणे, हे पोस्ट मार्टेमच्या आधारे “नवीन बाळ” कसे जन्माला येईल??, असे म्हणण्यासारखे आहे. त्यामध्ये फारसा तथ्यांश नसतो. फार तर पक्षाच्या ताकदीचा विशिष्ट आधार या पलीकडे स्ट्राईक रेट किंवा टक्केवारी ज्यांना महत्त्व नसते, हीच यातली अधोरेखित होणारी वस्तुस्थिती आहे!!
Sanjay Raut exposed sharad pawar’s claim of big strike rate in loksabha elections
महत्वाच्या बातम्या
- Pune Porsche Accident: अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना सत्र न्यायालयातून जामीन
- बंगाल मधून काँग्रेस संपवून ममता केरळच्या वायनाडमध्ये प्रियांका गांधींचा प्रचार करायला तयार!!
- जरांगे – ओबीसी नेते समोरासमोर बसून आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा, ओबीसी विकासासाठी उपसमिती; शिंदे – फडणवीस सरकारची भूमिका!!
- मराठा विरुद्ध ओबीसी महाराष्ट्रात जातिवाद भडकावून पोळी भाजण्याची खेळी नेमकी कुणाची??