Friday, 2 May 2025
  • Download App
    Sanjay Raut ED : सोमय्या - फडणवीसांवर आगपाखड करून ईडी कारवाई टळेल??; संजय राऊत कोर्टात का नाही आव्हान देत?? । Sanjay Raut ED: Somaiya - ED action will be avoided by setting fire to Fadnavis ??; Why Sanjay Raut is not challenging in court ??

    Sanjay Raut ED : सोमय्या – फडणवीसांवर आगपाखड करून ईडी कारवाई टळेल??; संजय राऊत कोर्टात का नाही आव्हान देत??

    मुंबईच्या गोरेगावातील पत्राचाळ 1034 रुपयांच्या घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांची 11.15 कोटी रुपयांची संपत्ती सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्त केली. त्यावरून संतप्त होऊन संजय राऊत गेले दोन दिवस पत्रकार परिषदांमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार तोफा डागत आहेत. एवढेच काय पण शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या संदर्भात रदबदली करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली. Sanjay Raut ED: Somaiya – ED action will be avoided by setting fire to Fadnavis ??; Why Sanjay Raut is not challenging in court ??

    – शक्तिप्रदर्शनाची तयारी

    आज संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील हल्लाबोल केला. संजय राऊत हे आज नवी दिल्लीहून मुंबईत परतणार आहेत. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी ढोल – ताशा – लेझीम अशी जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी देखील चालवली आहे.

    पण हे सगळे करत असताना संजय राऊत हे फक्त कोर्टाबाहेरच सगळ्या गोष्टी करत आहेत. आपली संपत्ती जप्त करण्याच्या विरोधात तसेच ईडी कारवाईविरोधात संजय राऊत हे कोर्टात का जात नाहीत…?? आपली संपत्ती कोर्टामार्फत का सोडून घेऊ शकत नाहीत…?? हा कळीचा सवाल तयार झाला आहे.



    संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे सकाळी 9.00 वाजता आज देखील पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या देशद्रोही आहेत. आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात सोमय्या पिता-पुत्रांना तुरूंगात जावेच लागेल. देवेंद्र फडणवीसांनी सोमय्या यांची पाठराखण करू नये. सोमय्या यांची पाठराखण केल्यामुळे डॉ. हेडगेवार, गोळवळकर गुरुजी यांच्या आत्म्याला किती क्लेश होत असतील, अशी वेगवेगळी वक्तव्य केली आहेत. त्यांच्या वक्तव्यांना मराठी प्रसार माध्यमांनी जोरदार प्रसिद्धी देखील दिली आहे. पण हे सगळे फक्त आणि फक्त नवी दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानी आपल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत करताना दिसत आहेत.

    – राऊत यांची संपत्ती कोर्ट सोडवेल??

    प्रत्यक्षात ईडीने या पत्राचाळ घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत यांच्यावर संपत्ती जप्तीची कारवाई केली आहे. त्या कारवाई विषयी संजय राऊत बोलत नाही किंवा बोलले तर फक्त ते किरीट सोमय्या यांच्यावर तोफा डागतात. किरीट सोमय्या यांची प्रकरणे बाहेर काढतात. पण किरीट सोमय्या यांची प्रकरणे बाहेर काढून आणि त्यात ते जरी दोषी आढळले तर त्यांच्यावर देखील कारवाई होईल हे घडून देखील मूळात संजय राऊत यांची ईडीने जप्त केलेली संपत्ती पत्रकार परिषदा घेऊन आणि सोमय्या यांच्यावर तोफा डागून कोर्ट सोडवणार आहे का…?? संजय राऊत आपली संपत्ती सोडवण्यासाठी कोर्टात का जात नाहीत…?? शरद पवार यांच्यामार्फत पंतप्रधान पर्यंत जाण्याची त्यांची तयारी आहे कोण कोर्टामध्ये मात्र ते जात नाहीत…!! यात ईडीच्या कारवाईचे वेगळे इंगित दडले आहे का…?? हा कळीचा सवाल तयार झाला आहे.

    Sanjay Raut ED : Somaiya – ED action will be avoided by setting fire to Fadnavis ??; Why Sanjay Raut is not challenging in court ??

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Prakash Ambedkar भाजप पासून सावध राहायचा शिंदे + अजितदादांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; पण खुद्द त्यांच्या वंचित आघाडीची अवस्था काय??

    Caste census : काँग्रेसने राहुलच्या यशाचे ढोल पिटले तरी प्रत्यक्षात मोदींचे “कमंडल” राजकारण यशस्वी, “मंडल” राजकारणात एन्ट्री!!

    मोदी तिकडे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायच्या बेतात; पवार इकडे दहशतवाद्यांच्या धर्मांधतेच्या चिखलात!!