• Download App
    संभाजीनगर : पत्नीच्या वाढदिवशी भोंग्याच्या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षकालाच अडकवले!!। Sambhajinagar: Police caught Sub-Inspector in Bhonga's crime on his wife's birthday !!

    संभाजीनगर : पत्नीच्या वाढदिवशी भोंग्याच्या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षकालाच अडकवले!!

    विशेेष प्रतिनिधी

    संभाजीनगर : ठाकरे – पवार सरकारने मशिदींवरचे भोंगे हटवायचे की नाही, याचा निर्णय केंद्र सरकारवर ढकलल्यानंतर संभाजीनगरात भोंग्यांवरून पहिला गुन्हा दाखल झाला आहे, तो देखील पोलीस निरीक्षकावर!! Sambhajinagar: Police caught Sub-Inspector in Bhonga’s crime on his wife’s birthday !!

    सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भोंग्यांवरून दोन समाजात तेढ निर्माण करणारी घटना घडविल्याच्या आरोपाखाली रेल्वे पोलीस उपनिरिक्षक किशोर गुंडाप्पा मलकूनाईक यांच्या विरोधात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी मशिदीकडे भोंग्यावर तोंड वरून त्यावर गाणे वाजवल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती हाती आली आहे.

    3 मे पूर्वी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यात यावेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंगे अधिकृत घेण्यासंदर्भातील आदेश जारी केले होते. त्यानंतरही सातारा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याचे दिसून येत आहे.

    काय घडली घटना?

    नुकत्याच घडलेल्या या घटनेत प्राथमिक स्तरावर हाती आलेल्या माहितीनुसार, सातारा पोलीस स्टेशन हद्दीतील मशिदीकडे भोंग्याचे तोंड करून किशोर मलकुनाईक यांनी गाणे वाजवल्याचा आरोप केला. यामुळे काही नागरिकांनी वाद घालून तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी किशोर गुंडापा मलकूनाईक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

    Sambhajinagar: Police caught Sub-Inspector in Bhonga’s crime on his wife’s birthday !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??