• Download App
    गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचे "शहीदीकरण"; समाजवादी पार्टी करतेय मुस्लिम ध्रुवीकरण!! Samajwadi party trying to impose martyrdom on gangster mukhtar Ansari to polarise muslim vote bank

    गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचे “शहीदीकरण”; समाजवादी पार्टी करतेय मुस्लिम ध्रुवीकरण!!

    उत्तर प्रदेशात गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचे शहीदीकरण करून समाजवादी पार्टी करतेय मुस्लिम ध्रुवीकरण!!, असला प्रकार सुरू आहे. गँगस्टर मुख्तार अन्सारीचा बांद्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला बांदा जेलमधून सरकारी रुग्णालयात आणल्यावर 9 डॉक्टरांनी त्याच्यावर उपचारांचा प्रयत्न केला. परंतु ते उपचार यशस्वी ठरू शकले नाहीत. त्याआधीच मुख्तारचा मृत्यू झाला होता. Samajwadi party trying to impose martyrdom on gangster mukhtar Ansari to polarise muslim vote bank

    मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाला म्हणजे कोणा स्वातंत्र्यसैनिकाचा किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात 1927 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असणाऱ्या त्याचे आजोबा डॉ. मुख्तार अहमद अन्सारी यांचा मृत्यू नव्हे, तर तो एका गँगस्टरचा मृत्यू आहे, ही बाब विसरून चालणार नाही. डॉ. मुख्तार अहमद अन्सारी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. पण त्यांचेच नाव धारण करणारा त्यांचा हा नातू 14 हत्या, 22 गंभीर गुन्हे करणारा गुन्हेगार होता. तो गँगस्टर, गुंड – माफिया राजकीय नेता होता. तो वेगवेगळ्या पक्षातून पाच वेळा आमदार आणि खासदार झाला होता, पण म्हणून त्याचे गंभीर गुन्हे लपून राहिले नव्हते, तर ते न्यायव्यवस्थेच्या स्कॅनर खाली आले होते आणि त्याला तब्बल 20 वर्षांची शिक्षा देखील झाली होती.

    पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचे सुरुवातीलाच त्याच्या गँगस्टर परिवाराने राजकीय भांडवलीकरण केले. त्याचा मुलगा भाऊ, आणि पुतण्या यांनी उत्तर प्रदेश सरकारवर मुख्तारवर विषप्रयोग केल्याचे आरोप केले. त्यासाठी त्यांनी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला, पण हे फक्त केवळ परिवारापुरते मर्यादित राहिले नाही, तर समाजवादी पार्टीने मुख्तारच्या मृत्यूचे निमित्त साधून मुस्लिम ध्रुवीकरण सुरू केले.

    अखिलेश यादवांची चलाखी

    समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एक भले मोठे ट्विट लिहून उत्तर प्रदेश सरकारला लोकांच्या जीविताचे कोठेच नीट रक्षण करता येत नाही, असा आरोप करून योगी आदित्यनाथ सरकारच्या राजीनामा मागितला. मुख्तारच्या मृत्यूचे “शहीदीकरण” केले. अखिलेश यादव यांनी ट्विटमध्ये जे मुद्दे उपस्थित केले, ते चलाखी दाखवणारे आहेत. उत्तर प्रदेशातील नागरिकांचा किंवा कैद्याचा पोलीस ठाण्यातील कोठडीत, जेलमध्ये, आपापसातल्या मारामाऱ्यांमध्ये किंवा जेलमध्येच आजारी पडल्यामुळे, आरोपीला जेलमधून न्यायालयात नेताना, न्यायालयातून हॉस्पिटलमध्ये नेताना, हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान किंवा खोटी चकमक दाखवून, खोटा अपघात अथवा दुर्घटना दाखवून, खोटी आत्महत्या दाखवून मृत्यू होत आहेत. हा उत्तर प्रदेशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर मामला आहे. या सर्व गंभीर प्रकरणांची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून उच्चस्तरीय चौकशी व्हावी. जे सरकार उत्तर प्रदेशच्या नागरिकांच्या जीविताचे रक्षण करू शकत नाही, त्या सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. अखिलेश यादव यांच्या मागणीतला “चमत्कार” असा की मूळात जेलमध्ये किंवा पोलीस ठाण्यात कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला सहज उचलले आणि मारून टाकले असे घडत नाही. अखिलेश यादव यांनी मृत्यूचे वर्णन करताना जे सगळे शब्दप्रयोग वापरले, ते उत्तर प्रदेशातल्या गुंड – माफिया गॅंगस्टर, चोर, उच्चके यांच्यासाठी सहानुभूती म्हणून वापरले आहेत. पोलीस कोठडीत तुरुंगात किंवा तुरुंगातून हॉस्पिटलमध्ये नेताना कुठल्या सज्जन सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झालेला नाही, तर मृत्यू झालाच असेल, तर तो गुंड – माफिया, गँगस्टर किंवा चोर याचा झाला आहे, हे अखिलेश यादव विसरले आणि त्या सर्वांना एकाच तागडीत तोलत त्यांना उत्तर प्रदेशातल्या “सन्मान्य नागरिकांचा” “दर्जा” देऊन मोकळे झाले.

    मुख्तार अन्सारीला विषप्रयोग झाला. त्याला रोज जेवणातून थोडे थोडे विष दिले जात होते. त्याला मारून टाकण्याचाच जेल प्रशासनाचा डाव होता, असा आरोप मुख्तारचा भाऊ खासदार अफजल अन्सारी यांनी केलाच होता. त्याला अन्सारीचा पुतण्या आमदार शोएब अन्सारी यांनीही दुजोरा दिला होता. मुख्तारच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी अन्सारी कुटुंबीयांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेच आहेत. पण त्याआधी उत्तर प्रदेश सरकारने या सगळ्या प्रकरणाची मुळात उच्चस्तरीय चौकशी देखील सुरू केली आहे.

    पण समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मात्र या सगळ्या प्रकरणाला संपूर्ण राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा बनवत मुस्लिम ध्रुवीकरण चालविले आहे. मुख्तार अन्सारीच्या परिवाराचा दबदबा असणाऱ्या बांदा, मऊ, वाराणसी, गाजीपुर या पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम ध्रुवीकरण व्हावे आणि लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा व्हावा, असा अखिलेश यादव यांचा प्रयत्न आहे. यासाठीच मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचे “शहीदीकरण” करून त्याला पोलिसी अत्याचारांचा बळी ठरवण्याचा डाव रचला गेला आहे. अखिलेश यादव यांचे लांबलचक ट्विट हे त्यांच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजनीतीचे निदर्शक आहे.

    Samajwadi party trying to impose martyrdom on gangster mukhtar Ansari to polarise muslim vote bank

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य