• Download App
    पोस्टरवरचे "भावी मुख्यमंत्री" रोहित पवारांना मतदारसंघच गमावण्याचा धोका; कर्जत जामखेडमध्ये "सांगली" घडविण्याचा काँग्रेसचा इशारा!! Rohit pawar in trouble, Congress claims his karjat jamkhed assembly constituency

    पोस्टरवरचे “भावी मुख्यमंत्री” रोहित पवारांना मतदारसंघच गमावण्याचा धोका; कर्जत जामखेडमध्ये “सांगली” घडविण्याचा काँग्रेसचा इशारा!!

    नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि त्यांचे नातू रोहित पवारांच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे नाव भल्या मोठ्या पोस्टर्सवर “भावी मुख्यमंत्री” म्हणून लिहून ती पोस्टर्स महामार्गांवर झळकवली होती, पण पोस्टर्सवरच्या या “भावी मुख्यमंत्र्यांना” ते पद मिळायचे तर सोडाच, पण विधानसभेचा मतदारसंघ गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण कर्जत जामखेड मतदारसंघावर आता काँग्रेसने थेट दावा ठोकला आहे. Rohit pawar in trouble, Congress claims his karjat jamkhed assembly constituency

    रोहित पवारांचा कर्जत जामखेडशी काहीही संबंध नाही. त्यांनी बारामतीला निघून जावे आणि कर्जत जामखेडची जागा, जी मूळातच काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, ती महाविकास आघाडीने काँग्रेसला परत करावी, अशी एकमुखी मागणी कर्जत तालुक्यातल्या काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन केली. केवळ अशी मागणी करून काँग्रेसचे नेते थांबले नाहीत, तर त्यांनी कर्जत जामखेड जागा महाविकास आघाडीने काँग्रेसला सोडली नाही, तर तिथे सांगली लोकसभा मतदारसंघासारखी बंडखोरी करून रोहित पवारांना पाडायचा इशारा दिला.

    सांगली लोकसभा मतदारसंघ वसंतदादा पाटलांचा बालेकिल्ला होता. त्यामुळे तिथे त्यांच्या वारसदारांनी महाविकास आघाडीत आपला दावा ठोकला होता, पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ती जागा हट्टाने खेचून घेऊन तिथे लोकसभेसाठी आपला उमेदवार उभा केला. त्यामुळे वसंतदादांचे नातू विशाल पाटलांनी बंडखोरी केली. ते अपक्ष उभे राहिले आणि त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजेच शिवसेनेचे उमेदवार पहिलवान चंद्रहार पाटील यांचा पराभव करत सांगलीची जागा महाविकास आघाडीकडून खेचून घेतली. महाविकास आघाडी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत जामखेडवर रोहित पवारांची उमेदवारी लादली, तर त्यांचा देखील असाच पराभव करण्याचा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी दिला आहे.

    रोहित पवार 2019 मध्ये कर्जत जामखेड मध्ये आले. त्यावेळी अखंड राष्ट्रवादी काँग्रेस असताना अजित पवारांनी त्यांना तिथून उमेदवारी देऊन निवडून आणले. परंतु, नंतरच्या काळात बऱ्याच घडामोडी घडून अजित पवार आणि शरद पवार वायले झाले. रोहित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राहून ते त्यांच्या महत्त्वाकांक्षा फुलवत राहिले. फक्त पहिल्याच टर्मचे आमदार असून देखील ते लहान तोंडी मोठा घास घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापासून अनेकांना विविध धोरणांवर उपदेश करत राहिले. इतकेच काय पण ते अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही दमबाजी करत राहिले. त्यामुळे अजितदादा रोहित पवारांवर चिडून आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन त्या मतदारसंघावर ठोकणे याला वेगळे महत्त्व आहे.

    कर्जत जामखेड मतदार संघ हा मूळात काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. त्यात तथ्य आहे. कारण आबासाहेब निंबाळकर, निकाळजे गुरुजी, विठ्ठलराव भैलुमे हे काँग्रेसच्या तिकिटावर तिथून निवडून गेले. त्यामुळे 5 टर्म तिथे काँग्रेसचा आमदार राहिला. 2019 पूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर तिथून अनेकांनी निवडणूक लढवली. 2019 मध्ये तडजोडीमध्ये रोहित पवारांसाठी काँग्रेसने तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. परंतु, रोहित पवारांनी आमदार झाल्यानंतर मित्रपक्ष काँग्रेसकडे कायम दुर्लक्ष केले, असा आरोप काँग्रेसचे कर्जत तालुका अध्यक्ष शहाजीराजे भोसले आणि ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे यांनी केला. अर्थातच त्यामुळे काँग्रेसचा रोहित पवारांवरचा राग संपूर्ण मतदारसंघात उफाळून आला आहे.

    आता तर राष्ट्रवादी दुभंगली आहे. काँग्रेसनेही रोहित पवारांचे काम करायचे नाही, असे ठरवले तर फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहण्याची शक्यता आहे. त्यातही महायुतीतून अजित पवार कर्जत जामखेड मधून ताकदवान उमेदवार देण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पोस्टर्सवरच्या “भावी मुख्यमंत्र्यांना” ते पद मिळायचे तर सोडाच, विधानसभेचा मतदारसंघच गमावण्याचा धोका उत्पन्न झाला आहे.

    Rohit pawar in trouble, Congress claims his karjat jamkhed assembly constituency

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस