• Download App
    पवारच खेळवताहेत, हा अनेकांचा समज, पण राजच्या टार्गेटवर पवारांचे मराठा - मुस्लीम कॉम्बिनेशन!! Raj Thackeray targeted sharad pawar and NCPs maratha - muslim combination

    Raj Thackeray : पवारच खेळवताहेत, हा अनेकांचा समज, पण राजच्या टार्गेटवर पवारांचे मराठा – मुस्लीम कॉम्बिनेशन!!

    मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगरची धरून फक्त तीनच सभा महाराष्ट्रात झाल्या आहेत, पण गुढीपाडव्यापासून अक्षयतृतीतयेपर्यंत महिना उलटून गेला, तरी राज ठाकरे आणि त्यांचे भोंगेच महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत आणि इथून पुढे त्यांच्यावरची चर्चा कमी होण्याऐवजी वाढण्याचीच चिन्हे आहेत. Raj Thackeray targeted sharad pawar and NCPs maratha – muslim combination

    त्याला कारणही स्वतः राज ठाकरे हेच आहेत. राज ठाकरे यांची वक्तव्ये, त्यांचे परिणाम यांचा विचार करून काही विश्लेषकांनी असा निष्कर्ष काढला की शरद पवार हेच राज ठाकरे यांना खेळवत आहेत. म्हणजे राज ठाकरे जे बोलताहेत, जे मुद्दे मांडत आहेत, ते अंतिमतः पवारांच्या राजकीय पथ्यावर पडतील, असा काही विश्लेषकांचा निष्कर्ष आहे. हरकत नाही. हे विश्लेषक त्यांच्या विशिष्ट लॉजिकमधून ते बोलत आहेत.

    -मुख्यमंत्र्यांवर टीका नाही

    पण राज ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या भाषणातून एक वेगळाच मुद्दा समोर आला आहे, तो म्हणजे राज ठाकरे या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर एकही शब्द उच्चारला नाही की त्यांच्यावर किंवा शिवसेनेवर टीका केली नाही. उत्तर प्रदेशात जर मशिदींवरचे भोंगे उतरू शकतात, तर महाराष्ट्रात का नाही, हा रोकडा सवाल त्यांनी सरकारला उद्देशून केला. पण त्यांनी गेल्या दोन सभांच्या वेळी केली तशी शिवसेनेवर टीका केली नाही. त्यांनी आपले टार्गेट शरद पवार आणि राष्ट्रवादी हेच ठेवले. विशेषतः शरद पवार. सुप्रिया सुळे वगळता त्यांनी राष्ट्रवादीच्या बाकीच्या नेत्यांची नावेही घेतली नाहीत.

    राज ठाकरे यांच्या या भाषणाचा आणि उध्दव ठाकरेंना वगळून फक्त शरद पवारांना टार्गेट करण्याचा नेमका अर्थ काय काढायचा…?? शरद पवार आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते एकमेकांना टार्गेट करून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी स्वतःला आणून ठेवताहेत, हा काढायचा…?? की आणखी काही…??

    -काँग्रेसच्या व्होट बँकेचे नुकसान

    बाकी काही असो… राज ठाकरे यांनी शरद पवारांचे या पुढच्या निवडणूकीचे टार्गेट ओळखून त्याच्यावर प्रहार केला आहे, हे नक्की…!! पवारांना २०२४ च्या निवडणूकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात मराठा – मुस्लीम कॉम्बिनेशन चालवायचे आहे…!! मग हिंदुत्वाची व्होट बँक कुठेही सरको…!! मराठा आणि मुस्लीम व्होट बँक त्यांना राष्ट्रवादीच्या बाजूने झुकवून एकाच वेळी काँग्रेस आणि काही प्रमाणात शिवसेनेचे त्यांना नुकसान करायचे आहे…!! मराठा – मुस्लीम कॉम्बिनेशनमधून त्यांना राष्ट्रवादीला शिवसेना आणि काँग्रेस यांच्यापेक्षा बऱ्याच जागा जास्त मिळवायच्या आहेत…!! म्हणजे निदान त्यांचा हा डावपेच आहे…!! आता तो यशस्वी किती होईल, हा भाग अलहिदा…!! पण पवार हा डाव तर खेळत आहेत.

    -राजसभेचा चढता क्रम

    सध्या शिवसेना आणि काँग्रेस हे पवारांचे मित्र पक्ष असल्याने पवारांचा मराठा – मुस्लीम कॉम्बिनेशनचा डाव ओळखून पवारांना थेट टार्गेट करू शकत नाहीत कारण सध्या तरी ते एकत्र सत्तेवर आहेत. पण राज ठाकरे यांच्यावर तसे काही बंधन नाही म्हणून त्यांनी मुक्तपणे पवारांच्या मराठा – मुस्लीम कॉम्बिनेशनवर प्रहार केले आहेत. गुढीपाडवा मेळावा – ठाण्याची उत्तर सभा आणि संभाजीनगरची सभा यातला हा चढत्या क्रमाचा कॉमन फॅक्टर आहे…!!

    त्यामुळे राज ठाकरे यांचा नेमका किती फायदा होईल माहिती नाही. पण सतत मराठा – मुस्लीम कॉम्बिनेशनवर प्रहार करीत राहिल्याने हे कॉम्बिनेशन परिपक्व होऊन त्याचा भरपूर लाभ राष्ट्रवादीला मिळण्याइतपत प्रभावी राहणार नाही, असा राज ठाकरे यांचा होरा असावा.

    -फडणवीसांनी ओळखला पवारांचा डाव

    देवेंद्र फडणवीसांनी देखील आज इफ्तार पार्ट्या झोडून समाजाचे प्रश्न सुटणार आहेत का…??, असा शेलका सवाल टाकून पवारांच्या मराठा – मुस्लीम कॉम्बिनेशनलाच टार्गेट केले आहे. याचा अर्थ फडणवीसांनी पवारांचा डाव ओळखून त्यातली हवा काढून घ्यायला सुरवात केली आहे का…??

    पवारांचे मराठा – मुस्लीम कॉम्बिनेश २०२४ वेगळे वाटले, तरी जेम्स लेन हा मुद्दा घिसापिटा आहे…!! त्याचा खरंच किती फायदा राष्ट्रवादीला होईल…??, या विषयी खरंच शंका आहे.

    -मुख्यमंत्र्यांचा धूर्तपणाचा इशारा, पण कोणाला…??

    या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच सकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लोकसत्तेच्या मुलाखतील बाळासाहेब भोळे होते. मी भोळा नाही. मी भाजपशी धूर्तपणे वागलो, अशी जी कबूली दिली आहे… त्या कबूलीचा पवारांच्या मराठा – मुस्लीम कॉम्बिनेशनशी संबंध आहे का… आपण भाजपशी धूर्तपणे वागलो असे सांगून आपण पवारांशी देखील धूर्तपणाने वागू शकतो, असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पवारांना दिला आहे का…?? विचार करण्यासारखी बाब आहे…!!

    Raj Thackeray targeted sharad pawar and NCPs maratha – muslim combination

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस