• Download App
    Raj thackeray राज ठाकरे यांचे नशीब फळफळले, शरद पवारांच्याही वाट्याला न आलेले "लाभ" वाट्याला आले!!

    Raj thackeray राज ठाकरे यांचे नशीब फळफळले, शरद पवारांच्याही वाट्याला न आलेले “लाभ” वाट्याला आले!!

    Raj thackeray मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नशीब फळफळले, पवारांच्याही वाट्याला न आलेले “लाभ” त्यांच्या वाट्याला आले!! बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ राहिलेल्या दोन व्यक्तींनी राज ठाकरे यांची तुलना थेट दोन राष्ट्रीय नेत्यांशी केली, जी कधी शरद पवारांच्या वाट्यालाही आली नव्हती. Raj thackeray

    मग भले बाळासाहेबांच्या जवळच्या एका व्यक्तीने राज ठाकरेंवर टीका करताना त्यांची तुलना राष्ट्रीय नेत्याशी केली असेल किंवा बाळासाहेबांच्या जवळच्या दुसऱ्या व्यक्तीने स्तुती करताना त्यांची तुलना दुसऱ्या राष्ट्रीय नेत्याशी केली असेल, पण यानिमित्ताने राज ठाकरे यांचे नशीब फळफळले ही वस्तुस्थिती मात्र या निमित्ताने समोर आली. Raj thackeray

    मोरारजींशी तुलना

    बाळासाहेबांनी सामनाच्या कार्यकारी संपादक पदी नेमलेले संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याशी केली. मोरारजी देसाई यांना एकाच वेळी महाराष्ट्राचे आणि गुजरातचे नेतृत्व करायचे होते. त्यामुळे त्यांचा संयुक्त महाराष्ट्राला विरोध होता. पण मोरारजींना महाराष्ट्राने कधी स्वीकारले नाही. आज राज ठाकरेंना देखील मोदी प्रेमामुळे एकाच वेळी गुजरात आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करायचे आहे, पण त्यांच्या शब्दांना महाराष्ट्रात किंमत नाही. कारण महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार लढत आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला. Raj thackeray

    हा दावा करताना संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर शरसंधान जरूर साधले, पण त्यांची तुलना अशा माजी पंतप्रधानाशी केली, ज्यांनी इंदिरा राजवटीचा पाडाव करून पंतप्रधान पद पटकावले होते. मोरारजींशी राज ठाकरेंची तुलना होणे हे राज ठाकरेंचे नशीब फळफळल्यासारखेच आहे. हे “भाग्य” राऊत यांनी शरद पवारांच्याही वाट्याला येऊ दिलेले नाही.


    Shivani wadettiwar वडेट्टीवारांच्या लेकीच्या तोंडून भरसभेत शिव्या, लाइट गेल्याने म्हणाल्या – हे भो##चे जीवनात अंधार पेरत आहेत


    विजयाराजेंशी तुलना

    दुसरीकडे भाऊ तोरसेकरांनी राज ठाकरेंची तुलना विजयाराजे शिंदे यांच्याशी केली. विजयाराजे शिंदे यांनी भाजपला शून्यातून उभे करताना अपरिमित कष्ट घेतले, पण आपल्या वारसदाराला पुढे येण्यासाठी त्यांनाच संघर्ष करायला लावला. विजयाराजेंनी चांदीच्या थाळीतून कुठला सोपा मतदारसंघ आपल्या वारसदारांसाठी परोसला नाही. त्यामुळे पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कन्या वसुंधरा राजे यांना अपयश आले, पण नंतर मात्र त्यांनी कर्तृत्व सिद्ध करून राजस्थानचे मुख्यमंत्रीपद दोनदा पटकावले. यामागे विजयाराजे शिंदे यांनी त्यांच्या मुलांना कसे वाढविले, आव्हानांचा सामना करायला कसे शिकविले, याचे बहारदार वर्णन भाऊ तोरसेकरांनी केले.

    त्याचवेळी राज ठाकरेंनी देखील अमित ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत उभे करताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी किंवा भाजपशी हातमिळवणी केली नाही. दोघांपुढे तडजोडीचा प्रस्ताव मांडला नाही. उलट अमित ठाकरेंना संघर्ष करूनच निवडून यायला विधानसभा निवडणुकीत उभे केले. त्यामुळे अमित ठाकरे यांचे राजकीय भवितव्य वसुंधरा राजे यांच्यासारखेच उज्ज्वल आहे, असा दावा भाऊ तोरसेकरांनी केला.

    संजय राऊत काय किंवा भाऊ तोरसेकर काय एकेकाळी बाळासाहेबांच्या खूप जवळचे पत्रकार होते. ते दोघेही अभिमानाने हे नेहमी सांगत असतात. पण आज दोघेही परस्पर विरोधी भूमिकेमध्ये एकमेकांसमोर उभे आहेत. या परस्पर विरोधात असलेल्या पत्रकारांनी राज ठाकरेंची तुलना एकाच दिवशी मोरारजी देसाई आणि विजयाराजे शिंदे यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांची केली. भाऊंनी देखील हे “भाग्य” शरद पवारांच्या वाट्याला येऊ दिलेले नाही. त्यामुळे हे देखील राज ठाकरे यांचे नशीब फळफळल्यासारखेच झाले आहे.

    जखमी वाघाचे वर्णन, पण…!!

    तिसरीकडे लोकमत मध्ये लेख लिहून जेष्ठ पत्रकार प्रभू चावलांनी शरद पवारांची तुलना जखमी वाघाशी केली. जखमी वाघ कायम धोकादायक असतो, असे शिकारी सांगतात, असे लिहून शरद पवारांची स्तुती केली. शरद पवार कसे लढवय्ये आहेत, ते पुन्हा एकदा स्वतःचा पक्ष कसा शून्यातून उभा करत आहेत, महाराष्ट्राच्या जनतेशी त्यांची नाळ कशी जुळलेली आहे, याचे सगळे बहारदार वर्णन प्रभू चावलांनी त्या लेखामध्ये केले आहे. परंतु, सगळ्यात शेवटी शरद पवार हे रास्त राष्ट्रीय प्रतिमा असलेले एकमेव प्रादेशिक सरदार आहेत. परवा परवा पर्यंत पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले शरद पवार आज अखेरच्या काळात आपली छोटीशी जहागिरी अबाधित राखण्याच्या प्रयत्नांमध्ये गुंतून पडले आहेत, असे लिहिले आहे… शेवटी विंचवाचे विष त्याच्या शेपटीत असते, हेच प्रभू चावलांनी डंख मारून दाखवून दिले आहे!!

    Raj thackeray compared with morarji desai and Vijayaraje shinde

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा