अरविंद केजरीवाल, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, पृथ्वीराज चव्हाण हे चार नेते वेगवेगळ्या पक्षांचे असले तरी त्यांच्यात एक “कॉमन फॅक्टर” आहे, तो म्हणजे हे “पुरोगामी” नेते आहेत आणि या “पुरोगामी” नेत्यांचा ज्योतिष शास्त्राला ठाम विरोध आहे, पण एकीकडे ज्योतिष शास्त्राला असा ठाम विरोध करताना हे राजकीय पोपट स्वतःचा पक्ष सोडून इतरांची “भविष्यवाणी” करायला मात्र पुढे आले आहेत. Progressive leaders oppose astrology, but they come forward to tell the future of others
अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने संपूर्ण देशभरात 40 पेक्षा कमी उमेदवार उभे केले आहेत. दिल्ली आणि पंजाब सोडून केजरीवालांचा अन्यथा प्रभाव नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी फक्त 10 जागा लढवत आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने आपल्या आघाडीत सामावून घेतले नाही त्यामुळे आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे 27 जागांवर निवडणूक लढवत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेस या सगळ्यांमध्ये मोठा पक्ष असली तरी देशामध्ये उमेदवार उभे करण्यामध्ये काँग्रेसने 350 एवढा आकडाही गाठलेला नाही.
पण हे सगळे नेते भाजप विषयीची राजकीय भविष्यवाणी करायला मागे न राहता जोरकस पुढे आले आहेत. भाजपचे सरकार कसे बनणार नाही, भाजप 400 च्या आत कसा अडकून पडेल, किंबहुना भाजपला 220 ते 240 जागा कशा मिळतील, याची भाकिते या सगळ्या नेत्यांनी वर्तवली. त्यापलीकडे जाऊन अरविंद केजरीवालांनी दिल्ली आणि पंजाब मध्ये आम आदमी पार्टीला नेमक्या किती जागा मिळतील, हे सांगितले नाही. पण भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनले तरी ते पुढील वर्षी 17 सप्टेंबरला निवृत्त होतील. ते अमित शाह यांना पंतप्रधान करतील आणि योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करतील ही भविष्यवाणी करायला अरविंद केजरीवाल विसरले नाहीत!!
शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात 48 पैकी फक्त 10 जागा लढवतो आहे. पवारांनी महाराष्ट्रात 50 सभा घेतल्या. त्यापैकी 35 ते 40 सहभाग यांनी बारामती, माढा आणि सोलापूर याच मतदारसंघांमध्ये घेतल्या उरलेल्या 8 – 19 सभा त्यांनी अन्यत्र घेतल्या, पण आपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरलो. आपल्याला निवडणुकीचा “ट्रेंड” कळतो. महाराष्ट्रात भाजप विरोधात वातावरण आहे आणि देशातही तसेच वातावरण आहे भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, अशी भविष्यवाणी पवारांनी केली. पण पवारांच्या भविष्यवाणी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील. यात राष्ट्रवादी काँग्रेसला 10 पैकी 8 – 9 जागा, काँग्रेसला 10 – 12 जागा आणि उरलेल्या जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतील अशी उपभविष्यवाणी आहे.
पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हेच शरद पवार नाशिक मधल्या पत्रकार परिषदेत मात्र इतिहासात रमले होते. मोदींची राजकीय भविष्यवाणी नकारात्मक रंगवताना त्यांनी आपण मोदींना कशी मदत केली, मोदींना आपण इस्रायल दौऱ्यावर कसे घेऊन गेलो, तिथली शेती त्यांना कशी दाखवली, याचे रंगवून सकारात्मक वर्णन केले.
राजकीय भविष्यवेत्यांच्या रांगेत प्रकाश आंबेडकर यांचाही नंबर लागतो. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी 27 जागांवर निवडणूक लढवत असली, तरी त्यांनी देखील मोदींच्या पराभवाचे भाकीत केले. पण त्या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे + मोदी निवडणूक निकालानंतर एकत्र येतील, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बनतील, अशी भविष्यवाणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीचा 27 जागांवर महाविकास आघाडीला फटका बसेल हे भविष्य मात्र प्रकाश आंबेडकरांनी वर्तविले नाही. “अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे”, “तशी त्या ठिकाणची वस्तुस्थिती आहे”, अशा भाषेत आंबेडकरांनी अनेकदा इतरांचे भविष्य सांगितले, पण वंचित बहुजन आघाडीला नेमक्या किती जागा मिळतील??, हे मात्र गुलदस्त्यात ठेवले.
पृथ्वीराज चव्हाण यांची राजकीय भविष्यवाणी प्रकाश आंबेडकरांचा राजकीय भूतकाळ ओळखण्यात गेली. प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा समोर आल्याने महाविकास आघाडीलाच लोक मतदान करतील, अशी भविष्यवाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यांनी देखील महाविकास आघाडीचा आकडा 35 आणि महायुतीचा आकडा 15 – 16 असाच सांगितला. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी आता पोपट घेऊन भविष्य सांगायला बसावे, असा टोमणा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी हाणला.
अर्थात उमेश पाटील यांनी सांगितले म्हणून यापैकी पृथ्वीराज चव्हाण किंवा कुठलेही नेते पोपट घेऊन “भविष्यवाणी” करायला बसणार नाहीत, मात्र आपले सोडून इतरांचे “भविष्य” वर्तवण्याखेरीज स्वस्थही बसवणार नाही.