• Download App
    चीनमध्ये केवळ महिलांच्या भाषेचा होतोय पुर्नजन्मOnly women's language is being reborn in China

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : चीनमध्ये केवळ महिलांच्या भाषेचा होतोय पुर्नजन्म

    भाषा हे संपर्काचे सर्वांत मोठे साधन मानले जाते, मात्र एखाद्या समाजातील विशिष्ट वर्गातील महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेल्यास त्यांनी एकमेकांशी संपर्क साधायचा तरी कसा? चीनमधील हुनान प्रांतातील महिलांपुढे हीच समस्या होती व त्याचे उत्तर त्यांनी आपली स्वतःची भाषा आणि तिची लिपी विकसीत करून शोधले.Only women’s language is being reborn in China

    गेल्या काही दशकांत मृत झालेली नुशू या भाषेचे आता पुनर्उज्जीवन होते आहे. हुनान हा चीनमधील ८० टक्के डोंगराळ भाग असलेला दुर्गम परिसर. येथेच नुशू ही जगातील फक्त महिलाच वापरत असलेली भाषा जन्मली. नुशू या चीनी शब्दाचा अर्थच महिलांची लिपी आहे. भाषातज्ज्ञांच्या मते, या भाषेचा जन्म सॉंग काळात (इ.स. ९६० ते १२७९) झाला असावा.

    महिलांना शिक्षण नाकारलेल्या या काळात ही भाषा आईकडून मुलीकडे व एकमेकींच्या मैत्रिणीकडे जात विकसीत होत गेली. या अशिक्षित महिला भाषेची लिपी पाहून, ती गिरवत भाषा शिकल्या व ती आजपर्यंत टिकून राहिली. बाहेरच्या जगाला या भाषेची ओळख झाली १९८०मध्ये.

    पुवेई हे छोटे गाव आता या भाषेच्या पुनर्उत्थानाच्या कामात अग्रेसर आहे. तज्ज्ञांना १९८० मध्ये २०० वस्तीच्या पुवेई गावात ही भाषा लिहू शकणाऱ्या तिघी जणी सापडल्या. नुशू ही बोली भाषा असून, ती डावीकडून उजवीकडे वाचतात. ही भाषा जिआंगयॉंग प्रांतातील चार स्थानिक बोलीभाषांच्या संगमातून बनली आहे. तिची लिपी चिनी भाषेच्या लिपीपासून प्रेरणा घेऊनच बनली आहे,

    मात्र ती अधिक लांबलचक, धाग्यासारखे स्ट्रोक्स असलेली व खालच्या बाजूला फर्राटे ओढलेली दिसते. मैत्रिणीला भेट दिलेले रुमाल, हेअरबॅंड, हातपंखे आणि कमरेच्या पट्ट्यांवर नुशूमधील मैत्रीचे संदेश महिला एकमेकींना पाठवत. चीनच्या ग्रामीण संस्कृती महिलांना आपले दुःख, कष्ट, शेतीतील अडचणी सांगण्यास परवानगी नव्हती व नुशूने या कठीण काळात महिलांसाठी मैत्रिणी बनवण्याचे व दुःख सांगण्याचे माध्यम म्हणून काम केले. लोकांना ही भाषा शिकायला आवडते, कारण ही त्यांची एकमेवाद्वितीय अशी संस्कृती आहे.

    २००३ मध्ये त्यांनी नुशूचे भाषांतर करून पहिला शब्दकोश तयार केला. आता प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत पुवेईमधील संग्रहालयात नुशूचे वर्ग चालतात. ही भाषा लिहायला, उच्चारायला अवघड आहे. मात्र, आता ती व्यवहारात आणि पर्यटनाला चालना देण्यासाठीही वापरली जाते आहे.

    Only women’s language is being reborn in China

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!