• Download App
    आता तुमचा मोबाईल होणार अवघ्या ३० सेकंदात चार्ज। Now your mobile will be charged in just 30 seconds

    आता तुमचा मोबाईल होणार अवघ्या ३० सेकंदात चार्ज

    सध्याच्या काळात सारे जग मोबाईलच्या रुपाने प्रत्येकाच्या हाती आले आहेच त्याहीपेक्षा त्यावर विसंबले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आता मोबाईल गाणी ऐकणे, व्हीडीओ पाहणे तसेच सोशल मिडीयासाठीच जास्त वापरला जात आहे. दिवसभरात किमान आठ ते दहा तास लोक स्मार्ट फोन वापरतात. याचा सर्वाधिक परिणाम होतो तो मोबाईलच्या बॅटरीवर. स्मार्टफोनवरील विविध अँप्सच्या आणि इंटरनेटच्या वापरामुळे दिवसभरातच मोबाईलची बॅटरी कमी होऊ लागते. बॅटरीची समस्या मात्र आजही कायम आहे. Now your mobile will be charged in just 30 seconds

    या समस्येवर एका इस्त्रायली कंपनीने उपाय शोधून काढला आहे. या कंपनीने स्टोरडॉट नावाचे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल केवळ तीस सेंकदात चार्ज करु शकता. स्टोरडॉटमध्ये क्रिस्टलच्या आकाराचे नॅनोडॉटस आहेत. ज्यामुळे मोबाईलची बॅटरी कमी वेळात चार्ज होण्यास मदत होते. सध्या या चार्जरचा आकार लॅपटॉप इतका आहे. मात्र त्याचा आकार कमी करण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहेत. सध्या मोबाईलमध्ये असलेल्या बॅटरीज या लिथीयमपासून बनविलेल्या असतात. कोणताही मोबाईल पूर्ण चार्ज करण्यासाठी किमान तास ते दीड तास लागतो.
    अनेकांना दिवसातून दोन ते तीनदा मोबाईल चार्ज करावा लागतो. किंवा सोबत सतत चार्जर किंवा पावर बॅंक बरोबर ठेवावी लागते. अशांसाठी हे नवे संशोधन फारच फायदेशीर ठरणार आहे. पण या चार्जरचा आकार फार मोठा आहे. तो छोटा करण्यात यश आल्यास त्याचा वापर व प्रसार जगभर वेगाने होईल.

    Now your mobile will be charged in just 30 seconds

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!