• Download App
    आता टीव्हीचीही घालता येणार घडी|Now you can also watch TV

    आता टीव्हीचीही घालता येणार घडी

    गेल्या काही वर्षांत माहिती तंत्रज्ञान इतके वेगाने व झपाट्याने बदलत आहे की बोलता योस नाही. त्यामुळे अगदी सामान्यांच्या घरातदेखील अनेक आधुनिक इलेक्ट्रीक वस्तू सहज दिसत आहे. ब्लॅक व्हाईट टीव्ही जावून रंगीत टीव्ही येण्यास बराच मोठा कलावधी गेला. मात्र गेल्या पाच – दहा वर्षांत भितीवर लावता येणारे एलसीडी टीव्ही आले. त्याची जागा काहीच वर्षांत एलईडी टीव्हीने घेतली. त्यापाठोपाठ कर्व्ह टीव्ही आले. आता तर टीव्हीवरच संगणकदेखील वापरता येतो. असाच प्रकार मोबाईलचा म्हणता येईल.Now you can also watch TV

    गेल्या वीस वर्षात केवळ बोलता येणारा मोबाईल कधी स्मार्ट झाला हे कळलेदेखील नाही. त्यात आता नव्या तंत्रज्ञानाची भर पडली असून आता चक्क आता तुमच्या लाडक्या मोबाइल व टीव्हीची चक्क घडी घालता येणार आहे. आहे की नाही कमाल. शास्त्रज्ञांनी नवीन लवचिक आणि पारदर्शक गोल्ड नॅनोमेश इलेक्ट्रोड्स तयार केले आहेत. संशोधकांनी पारदर्शक, लवचिक आणि चांगल्या प्रकारे वहन करू शकणारे मटेरियल तयार केले आहे.

    यातील महत्त्वाची बाब म्हणजे हे मटेरियल अतिशय जास्त प्रमाणात ताणले जाऊ शकते. यातील इंडियम आक्साइड मास्क लेयर आणि सिलिकान आक्साइड सॅक्रिफिशीअल लेअरमुळे या इलेक्ट्रोड्सला मोठा आधार मिळतो. घडी करता येण्याजोगा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या संशोधनाचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे नजीकच्या काळात कागदाप्रमाणे किंवा रुमालाप्रमाणे घडी घालता येणारे फोन आपल्या हातात आले तर नवल वाटून घ्यायचे काही कारण राहणार नाही.

    अत्यंत लवचिक असलेल्या या इलेक्ट्रोड्सची वीजवाहक क्षमता चांगली आहे. याचा वापर जैववैद्यकीय यंत्रातही चांगल्या प्रकारे होऊ शकतो असे ह्युस्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे.हे इलेक्ट्रोड्स लिथोग्राफी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवले जातात. सोन्याच्या नॅनो वायर्सनी नॅनोमेशचे नेटवर्क जोडले गेले आहे. यातून विजेचे वहन चांगल्या प्रकारे होते. या नॅनोमॅशचे सहजपणे आक्सिडीकरण होत नाही. त्यामुळे त्यांची वाहकता चांगल्या प्रकारे टिकून राहते.

    चांदीच्या आणि तांब्याच्या तारांमध्ये आक्सिडीकरणाचा गुणधर्म असल्याने त्यांच्या वाहकतेवर परिणाम होत असतो. त्यामुळे येत्या काही दिवसात आपल्या आजूबाजूला किंवा घरात घडी घालून कपडे जसे ठेवतो त्याप्रमाणे टीव्ही देखील येतील अशा आशा बाळगण्यास काहीच हरकत नाही.

    Now you can also watch TV

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!