Wednesday, 7 May 2025
  • Download App
    आता चक्क कुत्र्याच्या विष्ठेपासूनही होईल वीजनिर्मिती। Now even electricity can be generated from dog feces

    आता चक्क कुत्र्याच्या विष्ठेपासूनही होईल वीजनिर्मिती

    अनेकदा सकाळी फिरायला बाहेर पडल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास होतो तो रस्त्यात ठिकठिकाणी असलेल्या कुत्र्याच्या विष्ठेचा. यामुळे अनेक जण त्रस्त होतात. मात्र यावर ब्रिटनमध्ये फार वेगळा व कल्पप पर्याय शोधून काढण्यात आलेला आहे. त्यासाठी खास संशोधनच करण्यात आले आहे. ब्रिटनमधे कुत्र्याच्या विष्ठेपासून वीजनिर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. या विजेवर रस्त्यावरचे दिवे प्रकाशमान होतात. यासाठी कुत्र्याच्या मालकांना त्यांच्या कुत्र्याची विष्ठा रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या वॉशिंग मशिनच्या आकाराच्या उपकरणात टाकावी लागते. Now even electricity can be generated from dog feces

    हे मशिन दिव्यांना जोडलेले असून, मशिनमधील सूक्ष्मजीवाणू विष्ठेचे विघटन करून मिथेनची निर्मिती करतात. यापासून शेतकऱ्यांना खतही मिळणार आहे. मिथेनपासून दिवे प्रकाशमान होतात. या अनऍरोबिक डायजेस्टरमध्ये दहा बॅगेइतकी कुत्र्याची विष्ठा जमा झाल्यास त्यातून दोन तास दिवे चालू शकेल एवढी वीज तयार होते, असा दावा निर्मात्यांनी केला आहे. ब्रायन हार्पर यांना तीन वर्षांपूर्वी ही कल्पना सुचली. वॉर्सेस्टरशिअरच्या मालवर्न भागात त्यांनी आपला हा नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. अशा प्रकारे चालणारे दिवे पाहून लोकांना आश्चार्य वाटते आणि कुत्र्याच्या विष्ठेलाही मूल्य आहे, हे यातून त्यांना पटू शकते. यामुळे रस्त्यावर इतस्ततः पडणारी कुत्र्याची घाण डायजेस्टरमध्येच टाकली जाईल, आणी रस्ते स्वच्छ राहतील असे निर्मात्यांचे मत आहे. त्याचप्रमाणे लोकांनाही त्रास होणार नाही.

    Now even electricity can be generated from dog feces

    Related posts

    Operation sindoor : भारताने हल्ले थांबविले तर तणाव कमी करू; पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ असे का म्हणाले असतील??

    पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात घुसून 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले; Operation sindoor ही तर सुरुवात, अजून बरेच काही बाकी!!

    हे घ्या नीट समजावून, Mock drill म्हणजे नागरी संरक्षणाचा सराव, युद्धाची घोषणा नव्हे!!