• Download App
    land jihad लँड जिहाद रोखण्यासाठी सुरू झालाय नवा "मुळशी पॅटर्न"; गावागावांमध्ये ठराव करून मुस्लिम समुदाय नियंत्रण समिती स्थापन!!

    लँड जिहाद रोखण्यासाठी सुरू झालाय नवा “मुळशी पॅटर्न”; गावागावांमध्ये ठराव करून मुस्लिम समुदाय नियंत्रण समिती स्थापन!!

    नाशिक : गुंठामंत्री आणि हुंडाबळी यामुळे मुळशी नावाचे गाव फार बदनाम झाले. जमिनीतले घोटाळे आणि गैरव्यवहार म्हणजे “मुळशी पॅटर्न”, जमीन हडपण्यासाठी आणि हुंड्यासाठी बळी घेणे म्हणजे “मुळशी पॅटर्न”, अशी नवी व्याख्या रुजली. पण त्या पलीकडे जाऊन आता एक नवा सकारात्मक “मुळशी पॅटर्न” उदयाला आलाय, तो म्हणजे गावागावांमध्ये निर्माण झालेला लँड जिहादचा धोका ओळखून त्यावर मात करण्यासाठी मुस्लिम समुदाय नियंत्रण समितीची स्थापना करण्याचा हा नवा “मुळशी पॅटर्न” समोर आलाय.

    धर्मांधांना रोखण्यासाठी आपल्या गावातही हवा हा “मुळशी पॅटर्न”, अशी भावना तयार व्हायला लागली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात अलीकडेच जे घडते आहे, ते केवळ स्थानिक घटना न राहता, एक व्यापक हिंदू जागृतीचे उदाहरण ठरू लागले आहे. जून २०२५ मध्ये मुळशी तालुक्यातील भुकूम ग्रामसभेने हिंदू समाजाच्या धार्मिक अस्मिता, सांस्कृतिक पवित्रता आणि स्थानिक सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण ठराव संमत केला.

    – नेरे दत्तवाडी, घोटवडे, पिरंगूट, वाडकी

    या ठरावाअंतर्गत मुस्लिम समुदाय नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली असून, स्थानिक वगळून बाहेरगावाहून येणाऱ्या मुस्लिम व्यक्तींना नेरे दत्तवाडी, घोटवडे, पिरंगुट, वाडकी आणि लवळे या गावांमध्ये प्रवेश करायला प्रतिबंध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीचे मुख्य उद्देश ग्रामदेवता आणि देवस्थानांची पवित्रता अबाधित राखणे, तसेच बाह्य व्यक्तींकडून होणाऱ्या सुरक्षेच्या आणि धार्मिक विघटनाच्या संभाव्य धोक्यांना प्रतिबंध घालणे असा आहे. ग्रामविकासाच्या नावाखाली चालणाऱ्या लँड जिहादसारख्या कारवायांना आळा घालण्यासाठी ही समिती ग्रामस्थांना मार्गदर्शन करत आहे. पौड, घोटवडे, पिरंगूट सारख्या गावांमध्ये जिहादी इस्लामिस्टांनी घुसून काही विघटनकारी उपक्रम केले. सोशल मीडियातून जिहादी कन्टेन्ट पसरविले. पोलिसांनी यांची वेळीच दखल घेऊन कारवाई केली. त्यामुळे परिसरातील सर्व गावांनी मुस्लिम समुदाय नियंत्रण समिती मार्फत काम सुरू केलेय.

    बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या घुसखोर ही आता केवळ मुंबई, पुणे, नाशिक किंवा अन्य मोठ्या शहरांमधील समस्या राहिली नसून हे घुसखोर वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या मार्गांनी छोट्या मोठ्या गावांमध्ये घुसलेत. तिथे आता लव्ह जिहाद, व्यवसाय जिहाद, लॅंड जिहाद या मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्यात. हिंदू देवस्थाने, श्रद्धास्थाने देखील त्याला अपवाद राहिली नाहीत. बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी अनेक पवित्र देवस्थानांना विळखा घातलाय. तिथे व्यवसाय जिहाद सुरू केलाय. या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे जिहाद रोखण्यासाठी नवा “मुळशी पॅटर्न” उदयाला आलाय.

    New “Mulshi Pattern” launched to prevent land jihad

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    निशिकांत दुबे यांनी दिली उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराची यादी; पण “नॅचरल करप्ट पार्टीच्या” सोबतीची कुणी घ्यायची जबाबदारी??

    Raheel Khan : राहील खानच्या वर्तनाचा मनसेकडून निषेध, पक्षाचा कोणताही संबंध नाही; पोलिस कारवाईची मागणी

    विरोधी पक्षनेते पदासाठी संख्याबळ तोकडे, म्हणून महाविकास आघाडीचे नेते सरन्यायाधीशांकडे धावले!!