• Download App
    अरुणाचल की नागालँडच्या आमदारांच्या भेटीगाठी??; राष्ट्रवादीची बनवाबनवी, एकमेकांनाच उघडे पाडी!! NCP's both factions mudd sludgging on each other!!

    अरुणाचल की नागालँडच्या आमदारांच्या भेटीगाठी??; राष्ट्रवादीची बनवाबनवी, एकमेकांनाच उघडे पाडी!!

    नाशिक : अरुणाचल की नागालँडच्या आमदारांच्या भेटीगाठी??; राष्ट्रवादीची बनवाबनवी, एकमेकांनाच उघड पाडी!! असं म्हणायची वेळ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परस्परविरोधी दाव्यांमुळे आली आहे. NCP’s both factions mudd sludgging on each other!!

    जिथे शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, किंवा सुप्रिया सुळे राजकीय दृष्ट्या फिरकलेही नव्हते, त्या राज्यांमधली ही बातमी आहे. अजित पवारांना काल महाराष्ट्राबाहेरचे काही आमदार येऊन भेटले. त्यावरून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुणाचल प्रदेश मधले आमदार येऊन भेटले, असे ट्विट अजित पवारांनी केले. त्यामुळे प्रसार माध्यमांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशात विस्तार झाल्याच्या बातम्या दिल्या. अर्थातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद महाराष्ट्राबाहेर पसरल्याचा आभास निर्माण झाला.

    पण त्यावरून चिडलेल्या जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचणारे ट्विट केले. ज्या अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसने गेली विधानसभा निवडणूक लढवलीच नव्हती, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आलेच कसे??, असा खोचक सवाल जयंत पाटलांनी आपल्या ट्विटमधून केला. जयंत पाटील एवढाच खोचक सवाल करून फक्त थांबले नाहीत, तर त्यांनी त्यापुढे जाऊन महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये जेवढा फरक आहे, तेवढाच अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या दोन राज्यांमध्ये फरक आहे. आमदार भेटलेच असतील, तर ते नागालँडचे असतील आणि अजितदादांनी अरुणाचल प्रदेशचे आमदार भेटले असे लिहिले असेल. पण कदाचित त्यामागे “अदृश्य शक्ती” असेल. पण आता अजितदादांनी भाजप सारखे ते ट्विट डिलीट न करता चूक कबूल करावी, असा टोमणा जयंत पाटलांनी हाणला.

    पण राष्ट्रवादी काँग्रेसची बनवाबनवी आणि एकमेकांची कपडे फाडी!!, ही त्यापलीकडची आहे. मूळात राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रातल्या साडेतीन जिल्ह्यांमधला पक्ष आहे. भले शरद पवारांनी “महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नाही”, “महाराष्ट्र स्वाभिमानी आहे”, वगैरे कितीही बाता मारल्या, तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना काँग्रेस पक्ष फोडूनच झाली आहे आणि काँग्रेसच्या सत्तेच्या वळचणीला बसूनच पवारांनी स्व पक्षाचे भरणपोषण केले आहे.

    शरद पवार किंवा त्यांचे फुटलेले किंवा न फुटलेले चेले कधीच आपापला उपप्रदेश, गाव, शहर ओलांडून कुठे राजकीय मोहीम जिंकायला बाहेर पडलेले नाहीत. किंबहुना स्वतः शरद पवारच राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राची किंवा साडेतीन जिल्ह्यांची सीमा ओलांडू शकले नाहीत. पवार आणि त्यांच्या चेल्यांनी केलेच असेल तर ते फार तर “राजकीय पर्यटन” म्हणता येईल, त्या पलीकडे काही नाही.

    राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना शरद पवार किंवा अजित पवार, जयंत पाटील किंवा सुप्रिया सुळे कधी आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यांमध्ये आमदार निवडून आणण्यासाठी तळ ठोकून बसले होते किंवा गेला बाजार प्रचाराला गेले होते?? त्यांच्या प्रचारामुळे असे दुसऱ्या राज्यांमध्ये आमदार तरी किती निवडून आलेत??, हा कळीचा सवाल आहे. नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 7 आमदार निवडून आले, ते तिथले “स्वबळा”चे आणि फक्त राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह घेतलेले आमदार होते आणि आहेत. चिन्ह देण्या-घेण्या पलीकडे त्यांचा राष्ट्रवादीशी बिलकुलच संबंध जोडण्याचे कारण नाही. कारण राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिले नसते आणि दुसऱ्या कुठल्या पक्षाने तिकीट दिले असते, तरी ते निवडूनच आले असते. कारण ते खरे “स्वबळा”चे आमदार आहेत, “पवारबळाचे” नव्हेत!!

    कारण शरद पवार वेगळा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जेवढे उमेदवार जाहीर करायचे, त्यापेक्षा जास्त संख्येने ते स्टार प्रचारकांची यादी जाहीर करायचे. उमेदवार कमी आणि स्टार प्रचारक जास्त!! अशी राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था असायची. त्यामुळे अजित पवारांना भेटलेले आमदार अरुणाचल प्रदेश मधले असोत किंवा नागालँड मधले असोत, मूळात ते ना अजित पवारांच्या ताकदीने निवडून आलेत, ना शरद पवारांच्या ताकदीने!! ते तिथले स्थानिक ताकद राखून असलेले आमदार आहेत आणि केवळ पक्षाचे चिन्ह हवे, ते काँग्रेस किंवा अन्य प्रादेशिक पक्षांकडून किंवा भाजपकडून मिळाले नाही, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह घेतलेले ते आमदार असावेत. त्यापलीकडे त्या आमदारांशी ना शरद पवारांचा संबंध आहे, ना अजित पवारांचा. पण त्यातून अजित पवारांचे ट्विट आणि त्यावर जयंत पाटलांचे वरकडी करणारे ट्विट ही राष्ट्रवादीची बनवाबनवीची आणि एकमेकांची कपडे फाडीची स्टोरी रंगली आहे!!

    NCP’s both factions mudd sludgging on each other!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!