नाशिक : मराठा विरुद्ध ओबीसी महाराष्ट्रात जातिवाद भडकावून पोळी भाजण्याची खेळी नेमकी कुणाची??, असा सवाल महाराष्ट्राची जनता सोशल मीडियातून विचारत आहे. NCP leaders behind casteist agitations in maharashtra
एकीकडे मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन त्यांची आक्रमक भाषा, 9 मंत्री पाडण्याची आणि छगन भुजबळांचे करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन, त्यांची मनोज जरांगे यांच्यावर आगपाखड यातून महाराष्ट्रात जातीवाद भडकवण्याचा डाव समोर येत आहे.
लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनामध्ये छगन भुजबळ आहेत त्यांचे करियर उद्ध्वस्त केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. महाराष्ट्र सरकार मधले 9 मंत्र्यांना निवडणुकीत पाडीन. मराठ्यांचे 127 मतदार संघाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तिथे मराठे उभे करून प्रसंगी बाकीच्या जातींची मदत घेऊन आणि शिंदे – फडणवीस सरकारला धडा शिकवू, अशी धमकी मनोज जरांगे यांनी दिली. त्यापलीकडे जाऊन ओबीसी समाज गेल्या 70 वर्षांमध्ये खोटे आरक्षण खातो आहे. 14 % आरक्षण मिळाले असताना ते 16 % आणि 27 % वर कसे गेले?? आम्ही मंडल आयोगालाच आव्हान देऊ, अशी भाषाही मनोज जरांगे यांनी वापरली.
त्यामुळे लक्ष्मण हाके संतापले. मनोज जरांगे यांना आरक्षणातले 0.0% नॉलेज आहे त्यांची आपल्यासमोर बोलायचे लायकी नाही. खोटं बोलून त्यांनी 54 लाख मराठ्यांच्या ओबीसी नोंदी केल्या त्या रद्द करा. मनोज जरांगे 70 वर्षांची भाषा करतात. मूळात 28 वर्षांपूर्वी मंडल आयोग लागू झाला. त्यातून ओबीसींना आरक्षण मिळाले, पण बजेट मधून त्यांच्या साठी कधीच भरीव तरतुदी झाल्या नाहीत आणि आज मनोज जरांगे छगन भुजबळांचे करियर संपवायची भाषा करत आहेत. तेवढी त्यांची लायकी नाही, असे प्रत्युत्तर लक्ष्मण हाके यांनी दिले.
जरांगे विरुद्ध हाके या लढाईत महाराष्ट्रातल्या गावांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी फूट पडली. शिंदे – फडणवीस सरकारची कोंडी झाली, पण मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनामागे हात असल्याचे ज्यांच्यावर संशय आणि आरोप आहेत, ते शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोन्ही नेते मात्र राष्ट्रवादीच्याच राजकीय मनोवृत्तीचे नेते आहेत.
मनोज जरांगे यांची सगळी भाषा ही पवारांच्याच राष्ट्रवादीची असल्याचे समोर आले. मनोज जरांगे सुरुवातीलाच आंदोलन करत असताना पवारांकडून ऊर्जा मिळते, असे म्हणाले होते. त्याचवेळी मनोज जरांगे यांच्या पाठीशी शरद पवार असल्याचा उघड खुलासा झाला होता. जरांगे यांच्या समर्थकांनी बाकी सगळ्या नेत्यांना गावबंदी केली होती, पण पवार समर्थकांना, रोहित पवारांना तरी गाव बंदी लागू झाली नव्हती. छगन भुजबळ यांनी त्याविरुद्ध आवाज उठवल्यानंतर मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा सामना महाराष्ट्रात रंगला होता. तो आता मनोज जरांगे विरुद्ध लक्ष्मण हाके असा रंगला आहे.
मनोज जरांगे फक्त एका जातीची भाषा बोलतात, पण छगन भुजबळ, मुंडे बंधू – भगिनी, विजय वडेट्टीवार वगैरे नेते महाराष्ट्रातल्या 492 जातींची भाषा बोलतात, असा पलटवार लक्ष्मण हाके यांनी केला. यातून त्यांनी छगन भुजबळांचे केलेले समर्थन लपले नाही, पण महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण वाचवा आंदोलन असो की मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन असो, या दोन्ही मागे राष्ट्रवादी नावाची “कुटील बुद्धी” आहे हे मात्र या निमित्ताने उघड झाले!!
NCP leaders behind casteist agitations in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- योग दिन 2024: भारतासह जगभरात योग दिवस साजरा करण्यास सुरुवात!
- सभासद शेतीच्या कामात व्यस्त, महाराष्ट्रात 8305 सहकारी संस्थांची निवडणूक लांबणीवर!!
- पंतप्रधान मोदींनी श्रीनगरमध्ये केला योगाभ्यास; म्हणाले, आता जगाचे…
- योगाने जग व्यापले, अमेरिकेतही योग दिनाचा उत्साह; न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये हजारो लोकांनी केला योगा