• Download App
    गध्दे पंचविशीकडे जाताना चाललेली चाचपणी...!!|NCP 22 nd birthday; still in search of political destiny and aspiring Chief Ministership without absolute majority

    गध्दे पंचविशीकडे जाताना चाललेली चाचपणी…!!

    राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बातम्या पेरून चाचपणी सुरू आहे… आपल्या खऱ्याखुऱ्या पसंतीचा मुख्यमंत्री गादीवर बसविण्याची चाचपणी… पण बातम्या पेराव्या लागतात. चाचपणी करावी लागते याचा अर्थच पक्षबांधणी करण्यात कुठेतरी खोट राहिली आहे. कारण प्रादेशिक पक्षांच्या स्थापनेनंतर त्यांच्या नेत्यांना पूर्ण बहुमतासह सरकार स्थापनेची संधी मिळाल्याचा अनेक राज्यांचा इतिहास सांगतो. पण मग महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांच्या “राष्ट्रीय उंची”च्या नेत्यांना हा इतिहास महाराष्ट्रात का निर्माण  करता आला नाही…??NCP 22 nd birthday; still in search of political destiny and aspiring Chief Ministership without absolute majority


    भारतात कोणत्याही नेत्याने वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून प्रादेशिक पक्ष स्थापन केल्यानंतर साधारण ५ ते १० वर्षांमध्ये त्याने आपल्या राज्यात पूर्ण बहुमतासह सरकार बनविल्याचा इतिहास आहे. तामिळनाडू, आसाम, ओडिशा, आंध्र, तेलंगण, बिहार, उत्तर प्रदेश ही त्याची १९८० ते १९९० च्या दशकातली ठळक उदाहरणे आहेत.

    त्याच्याही आधी १९५० ते १९६० च्या दशकात तामिळनाडूमध्ये हा पराक्रम द्रविड मुन्नेत्र कळघमने करून दाखविला आहे. पण महाराष्ट्रात दोन प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना एकछत्री अंमल गाजवण्याची तर इच्छा होती, मात्र पूर्ण बहुमतासह ती कधीही साध्य करता आलेली नाही. यातल्या एका पक्षाने पन्नाशी ओलांडली तर दुसरा पक्ष दोन – तीन वर्षांमध्ये गध्दे पंचविशीत प्रवेश करेल.



    हे दोन्ही पक्ष अखंड महाराष्ट्राच्या २८८ सदस्यांच्या विधानसभेत ५० ते ६० आमदारांच्या आकड्यांमध्येच वर्षानुवर्षे खेळत आलेत. त्यांचे नेते खूप मोठे म्हणून गणले गेले. काहींनी तर आपली हवा तर राष्ट्रीय नेतृत्वाच्या उंचीपर्यंत केली. पण या नेत्यांना स्वतःच्या पक्षाला विधानसभेत पूर्ण बहुमत मिळविण्याच वकूब कधीही दाखविता आलेला नाही. त्यांचा पक्ष कधी विधानसभेत तिहेरी आकडा पार करू शकलेला नाही. तो पार करता आला १९९० च्या दशकात फक्त अखंड काँग्रेसला आणि २०१४ नंतर भाजपलाच.

    शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही विधानसभेतला तिहेरी आकडा पार करता आलेला नाही. किंबहुना त्याच्या जवळपासही पोहोचता आलेले नाही. तरीही त्या पक्षाचे दोन्ही सर्वोच्च नेते स्वतःला महाराष्ट्रव्यापी नेतृत्व म्हणवून घेत होते आणि आहेत.

    आजही शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस २२ वा वाढदिवस साजरा करते आहे, तेव्हा शरद पवार स्वप्न पाहात आहेत, ते राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्याच्या गादीवर बसविण्याचे… आणि ते देखील दुसऱ्या कोणत्या तरी पक्षाच्या पाठिंब्यावर. बाहेरून किंवा आतून पाठिंब्यावर… आजही जेव्हा पक्ष ऐन तारूण्यात आलाय,

    तेव्हाही स्वतःच्या इच्छेचा आणि स्वतःच्या पक्षाच्या बहुमताच्या जोरावर पवारांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री बसवता आलेला नाही. गेल्या ५० – ५५ वर्षांच्या शिवसेनेच्या इतिहासात ३ मुख्यमंत्री झाले. पण पवारांना राष्ट्रवादीचा एकही मुख्यमंत्री करता आलेला नाही.

    राष्ट्रवादीचा २२ वा वर्धापनदिन साजरा करीत असताना पवारांना आपल्या खऱ्याखुऱ्या पसंतीचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या गादीवर बसविण्यासाठी इकडून – तिकडून आणि कोणाच्या तरी आडून बातम्या सोडाव्या किंवा पेराव्या लागत आहेत. या बातम्यांमधून आपल्या वैयक्तिक पसंतीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात चालेल का…?? याची चाचपणी करावी लागत आहे…

    यातच राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनची राजकीय खोट लक्षात येते… कारण अशी चाचपणी त्याच नेत्याला करावी लागते, की ज्याला आपल्या स्वतःच्या निवडीविषयी खात्री नसते. किंवा समोरून छातीठोकपणे नाव जाहीर करून जनतेचा संपूर्ण बहुमताचा पाठिंबा मिळवून आपल्या पसंतीचा मुख्यमंत्री बसविण्याची हिंमत नसते. त्या नेत्यालाच अशा इकडून – तिकडून किंवा वरून – खालून बातम्या सोडून आणि बातम्या पेरून चाचपणी करावी लागते.

    आपण आपल्या पसंतीच्या मुख्यमंत्र्यांला महाराष्ट्राच्या गादीवर बसविले, तर इतर पक्ष त्याला पाठिंबा देतील ना… तो पाठिंबा ते किती दिवस देतील… त्याला इकडून – तिकडून किंवा अगदी आपल्याच घरातून दगाफटका तर होणार नाही ना… ही भीती खऱ्या अर्थाने पवारांना भेडसावते आहे.

    कारण स्वतः पवारांचा ५० वर्षांच्या संसदीय राजकारणाचा राजकीय इतिहास असा दगाफटका करण्याचा राहिला आहे. सध्याचे महाराष्ट्रातले सरकार तर त्या दगाफटका करण्याच्या मनोवृत्तीचाच तर परिपाक आहे. आणि हा दगाफटका पवारांनी थेट महाराष्ट्रातल्या जनतेला केला आहे.

    पवारांनी २०१९ पर्यंत आपल्या राजकीय मित्रांना किंवा विरोधकांना दगाफटका केला होता. त्यासाठी त्यांनी विश्वासघाताचे आरोप झेलले. पण २०१९ मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेलाच दगाफटका केला. ज्या महायुतीला जनतेने पूर्ण बहुमत दिले, ती महायुती फोडून सध्याचे सरकार बनविले. या इतिहासाला मराठी मीडिया पवारांची मुत्सद्देगिरी म्हणतो.

    आज राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापनदिनी पवार जेव्हा आपल्या कन्येला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसविण्याचे स्वप्न पाहतात, तेव्हा हा दगाफटक्याचा इतिहास तर त्यांच्या डोळ्यासमोरून तरळून जात नसेल ना… कारण शेवटी जे पेरलेले असते, तेच शेवटी उगवते…

    हे कदाचित मराठी मीडियाला माहिती नसेल. पण स्वतः शेतकरी असलेल्या पवारांना तर चांगलेच माहिती आहे ना…!!  भीती त्याचीच वाटतेय… म्हणून बातम्या पेरून चाचपणी करावी लागतेय…!! ही राष्ट्रवादीच्या स्थापनेची फलश्रूती आहे…!!

    NCP 22 nd birthday; still in search of political destiny and aspiring Chief Ministership without absolute majority

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!

    Sangram thopte संग्राम थोपटेंना काँग्रेसने दिले तोकडे बळ, पवारांनी नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!!