नवरात्र …नऊ दिवस… नऊ शक्तीरूपे…जागर स्त्री शक्तीचा ..स्त्रीच का? कारण स्त्रीच आहे सतत उत्पन्न होणारी ऊर्जा.. प्रवाही चैतन्य.. सहज सहवासाने निर्माण होणारे शुभतत्व….! navratri special shardiya navratra articles
नवरात्राच्या नऊ दिवसांत आपण या स्त्रीशक्तीला अनुक्रमे वंदन करतो. अनेक रूपे या स्त्री तत्त्वाची…प्रातिनिधिक स्वरूपात असलेली मुखत्वे माता शैलीपुत्री…माता ब्रह्मचारिणी.. माता चंद्रघंटा…माता कुष्मांडा… स्कंददमाता…माता कात्यायनी ..माता कालरात्री… माता महागौरी आणि सिद्धीदात्री…
प्रत्येक रूप अनोखे …प्रत्येक रूपाचे महत्त्व आगळेवेगळे… फक्त ते डोळसपणे बघायला हवे… मूळात नवरात्र हा शब्द सिद्धीचे प्रतीक आहे, हे समजून घ्यायला हवे. हिंदुधर्मातील काही विशिष्ट सण हे संध्याकाळी, रात्री साजरे केले जातात…जसे दिवाळी, शिवरात्र आणि नवरात्र …संधिकाली साजरा करण्याचा उद्देशाने नऊ दिवस आणि नऊ रात्र हा उत्सव केला जातो.. वर्षांतून दोन वेळा मुख्य नवरात्र दर सहा महिन्यांनी साजरे करतात.. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते महानवमी या पवित्र कालावधीत एक नवरात्र साजरे केले जाते, तसेच त्यानंतरचे नवरात्र अश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते नवमी या पर्वकाळात संपन्न होते.
देवी भागवत पुराणानुसार, तर वर्षात चार नवरात्र साजरी केली जातात… चैत्र आणि अश्विन या दोन नवरात्रांसारखीच दोन गुप्त नवरात्री देखील साजऱ्या केल्या जातात. ज्याचे विशिष्ट महत्त्व आहे.
हिंदू धर्मातील सणवार अतिशय डोळसपणे वैज्ञानिक विचाराने, आध्यत्मिक प्रगतीस सहाय्यभूत होत शरीरशास्त्र लक्षात घेत आखले गेले आहेत.. त्याला सबळ पुरावे उपलब्ध आहेत. नवरात्रात त्याचे कारण देखील विशिष्ट आहे.
शारदीय नवरात्र वैभव आणि आनंद देणारे आहे. गुप्त नवरात्र तंत्रसिद्धीसाठी खास आहे, तर चैत्र नवरात्र आत्मशुद्धी आणि मुक्तीसाठी मानले आहे.
आध्यात्मिक दृष्टीने हा काल शुभ मानला गेला आहे. पृथ्वी द्वारे सूर्याच्या क्रांतिकाळात चार संधी असतात. ही अशी वेळ असते ज्या वेळी पृथ्वीवर सगळ्यात जास्त जंतुसंसर्ग होण्याची भीती आणि शक्यता असते. शरीराच्या बचावासाठी नवरात्र हे आध्यत्मिक, वैज्ञानिक आणि शरीरशास्त्र या शास्त्रांचा मिळून एक अभ्यासपूर्ण सुंदर रचना या सणाच्या निमित्ताने रुजवली गेली आहे.
आध्यत्मिक दृष्टीने हा काळ निसर्ग आणि मानव यांच्या मिलनाचा काळ असतो. दोन ऋतूंच्या वातावरण बदलानुसार शाररिक दोष जसे वात, कफ ,पित्त हे निर्माण होतात त्याचे परिमार्जन होण्यासाठी नवरात्र हा उत्तम कालावधी मानला गेला आहे.
आध्यत्मिक प्रगती साठी लोक नियम, व्रताचरण, जप, होम हवन, कायिक, वाचिक, मानसिक शुद्धी करून घेतात. उपवासाद्वारे शरीर शुद्धी आहारावर नियंत्रण हे शरीर व्याधी बरी करतात. नियम पाळले जातात. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपोआपच मनुष्याला प्रेरणा होते. ईश्वराच्या सानिध्यात सकारात्मक स्पंदने असतात ती आपोआपच ग्रहण केली जातात. निसर्ग ही मातृशक्ती आहे. .सृजनाची जननी आहे म्हणून तर आपण स्त्रीतत्व म्हणून या मातृशक्तीची आराधना करतो. तिला माता, आई म्हणतो.
कोणत्याही नवरात्राकडे फक्त कर्मकांड म्हणून न बघता सगळ्याच दृष्टीने सुंदर असलेला हा प्रगतीचा कालावधी आहे. हा नीट समजून घेत या मातृशक्तीची आराधना करू या
नवरात्रीच्या खुप शुभेच्छा. वाचकांना मनोनमन!!
navratri special shardiya navratra articles
महत्वाच्या बातम्या
- फ्रेंच कंपनीला भारतात राफेल निर्मितीची इच्छा; नागपूरजवळ मिहानला राफेल असेंब्ली लाइनवर झाली चर्चा
- मीरवाइज उमर फारूक बदलले; पॅलेस्टिनी हक्कांसह इस्रायली हक्कांच्या जपणुकीचीही भाषा बोलू लागले!!
- संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये संघकार्य विस्तारावर सरसंघचालकांचा भर!!
- ‘पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांना विजय समर्पित करू शकला नाही’, भारताच्या विजयानंतर इस्रायलच्या राजदूताचा टोमणा!