निसर्ग हा मानवाच्या समजण्याच्या पलीकडचा असतो असे म्हटले जाते. त्यात बऱ्याच अंशी तथ्यदेखील आहे. मात्र तरीदेखील मानवाचा त्याला समजूव घेण्याची तहान काही केल्या भागत नाही. निसर्गाची वेगवेगली रुपे जेव्हा आपण पहात असतो त्यावेळी थक्क होण्यापलीकडे आपल्या हातात काही रहात नाही. Nature is the Great Salt Desert beyond human comprehension
आता इराणमधील हे विचीत्र वाळवंट पाहिले की आपल्याला ते सहज पटते. ग्रेट साल्ट डेझर्ट नावाने जगात प्रसिद्ध असलेले हे वाळवंट इराणाची राजधानी असलेल्या तेहरानपासून अवघ्या तीनशे किलोमीटरवर आहे. वाळवंट म्हटले की आपल्या समोर नजर जाईल इथपर्यंत वाळूच वाळू असे समोर येते.
मात्र इराणमधील हे वाळवंट त्याला छेद देणारे आहे. तब्ब्ल आठशे किलोमीटर लांब आणि तीनशे विस किलोमीटर रुंद इतक्या भव्य व विस्तीर्ण पसरलेल्या या ग्रेट साल्ट डेझर्ट निसर्गाचे वेगळेच रुप पहायला मिळते. येथे ठिकठिकाणी मिठाची लहान मोठे डोंगर आहेत. आणि मध्ये मध्ये ग्रीस किंवा वंगणासारखा चिखल आहे. लाखो वर्षापूर्वी या ठिकाणी मोठा महासागर होता. काळाच्या ओघात तो अटला असे मानले जाते. सामगर आटून त्या ठिकाणीच आजची इराणची भूमी तयार झालेली आहे. त्यातही जेथे सागर होता त्याच ठिकामी सध्या हे ग्रेट साल्ट डेझर्ट आहे.
अथांग महासागरच अटल्याने त्यामध्ये असलेल्या मिठाचे जाडच्या जाड थर येथे आहेत. या थरांची जाडी चक्क सात ते आठ किलोमीटर असल्याचे मानले जाते. काळाच्या ओघात हे मिठाचे थर आणखी खाली खाली व चिखल मातीच्या खाली दबले गेले. त्यामुळे येथे सध्या चिखल व खडकाच्या खाली मिठ आहे. कडक उन्हामुळे अनेकदा जमिनीकाली दबलेले हे मीठ बाहेर येण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे अनेक ठिकाणी मिठाचे लहान लहान टेकड्या तयार झालेल्या आहेत. या टेकड्या म्हणजे भूगर्भशास्त्राचा अनोखा नमुनाच मानल्या जातात.
येथे अशा प्रकारच्या पन्नासहून अधिक टेकड्या आहेत. येथील जमिनीवर काही इंच मीठ असून ते खोदले की त्याखाली वंगणासारखा चिखल आढळतो. यामध्ये समजा पाय अडकला तर तेथील सुटका करणे अशक्य बनते. त्यामुळे हा सारा परिसर धोकादायक परिसर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. येथील या अतिक्षारपड जमिनीमुळे येथे कोणतेही पिक सोडा गवताचे साधे पातेहे येथे उगवत नाही. येथे काही ठिकाणी ओअसिस आहेत मात्र तरीही तेतए लोकांना जाण्यास पूर्ण मज्जाव आहे. या वाळवंटाच्या बाजूला असलेल्या टेकड्यांवर मात्र विरळ वस्ती आहे. तसेच येथे उंट, चित्ते व शेळ्याही आढळतात.
Nature is the Great Salt Desert beyond human comprehension
महत्त्वाच्या बातम्या
- Sputnik V Vaccine : सीरम इन्स्टिट्यूटने स्पुतनिक व्ही लस निर्मितीसाठी DCGI ला मागितली परवानगी
- सोशल मीडियावर तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती : युजर्सच्या सांगण्यावरून व्हॉट्सअॅप, फेसबुकला आक्षेपार्ह पोस्ट हटवावी लागणार; अशी करा तक्रार
- महाराष्ट्र सरकारची घोषणा, आपले गाव ‘कोरोना मुक्त’ करा आणि 50 लाखांचे बक्षीस मिळवा
- बुलडाण्यात आठ वर्षीय बालकाला कोरोना रुग्णांचे टॉयलेट स्वच्छ करायला लावले, व्हायरल झाला व्हिडिओ