यासाठी त्याने सोळा मोटारचा वापर केला आहे. या मोटारी त्याने अल्युमिनियमच्या फ्रेमवर बसविलेल्या आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी क्रिंज्न्स याने मल्टिवि अटोपायलटचे तंत्र वापरले आहे. त्यामुळे सर्व मोटारींवर नियंत्रण मिळवता येते. त्याने बनविलेल्या या यंत्राचे वजन ११० पौंड इतके आहे. क्रिंज्न्सचे वजन १३० पौंड आहे. म्हणजेच हे यंत्र साधारणपणे १४२ पौंडाचे वजन घेवून सहज हवेत उडू शकते. त्याने या यंत्रासह उडण्याची चाचणी यशस्वी रित्या केली आहे. त्याचे व्हीडीओदेखील इंटरनेटवर पहायला मिळतात. अर्थात हे यंत्र अजून खूपच प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे ते पार उंच उडू शकले नाही. केवळ काही फूटच ते हवेत उडाले. मात्र व्हीडीओमध्ये हे पाहतानादेखील खूप गंमत वाटते. त्यातून क्रिंज्न्स पुढे काय करणार याची कोणाला माहिती नाही तसेच खात्रीदेखील नाही. पण उडणारी कार बनविण्याच्या प्रयत्नातील हा पहिला टप्पा आहे असे मानले जाते. त्याने बनविलेले हे माडेल तसेच त्याचे प्रयोग मात्र खूपच आश्वासक आहेत याबाबत सध्या तरी कोणाच्या मनात शंका नाहीत. अर्थात हे झाले म्हणजे येत्या काही वर्षांत उडणारी कार अवतरेल असे मानणे सध्या तरी धाडसाचे ठरले असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. मात्र क्रिंज्न्स हा जिद्दीने एक एक पाउल पुढे टाकत आहे.
मल्टीकाप्टर म्हणजे उद्याची उडणारी कार
