• Download App
    मेंदूचा शोध व बोध : शिकत असताना शाळेत किंवा व्यवहार्य जगण्यात डाव्या मेंदूवरच अधिक भरMore emphasis on the left brain in school or in practical life while learning

    मेंदूचा शोध व बोध : शिकत असताना शाळेत किंवा व्यवहार्य जगण्यात डाव्या मेंदूवरच अधिक भर

    मेंदूचे डावा मेंदू आणि उजवा मेंदू असे भाग असतात हे सर्वांनाच माहीत आहे. या दोन्ही भागाचे कार्य वेगवेगळे असते. आपण शिकत असताना शाळेत किंवा व्यवहार्य जगण्यात अधिक भर डाव्या मेंदूवर दिला जातो.More emphasis on the left brain in school or in practical life while learning

    डावा मेंदू हा भाषा, गणित, व्यवहार, संशोधन आणि अचूकपणासाठी जवाबदार असतो त्या उलट उजवा मेंदू सृजनशिलता, कल्पकता, भावना, नेटकेपणा आणि विविध कलांशी निगडीत असतो. दोन्ही भागांच्या मेंदूचे कार्य विरुध्द परंतु परस्परपूरक आहे.

    डावा मेंदू माहिती हळूहळू आणि सातत्याने घेतो तर उजवा मेंदू ही माहिती काही क्षणात घेतो व त्याला सातत्याची आवश्यकता नसते. जेव्हा गरज पडेल तेव्हा उजव्या मेंदूला ही माहिती काही सेकंदात आठवते ह्याला फोटोग्राफीक मेमरी म्हणतात. जे लेखक किंवा कवि, चित्रकार किंवा कलाकार बनतात त्यांचा उजवा मेंदू अधिक सक्षम व कार्यरत असतो. त्या तुलनेत जे गणिती बनतात किंवा संशोधक व प्रध्यापक बनतात त्यांचा डावा मेदू खूप चांगला असतो. अर्थात असे थेट विष्लेषण करणे अयोग्य आहे.

    कारण आपण जो पेशा स्वाकीरलेला असतो त्यावेळी मेंदूचा अभ्यास न करताच तो स्वीकारलेला असतो. केवळ आपल्या आवडीनिवडीवरुन असा अंदाज बांधता येतो हे मात्र नक्की. त्यामुळे आपल्या आवडीनिवडी जपायला सांगितले जाते. अशा आवडीनिवडी किंवा छंद जोपासले की मेंदूला तत्पर व कार्यरत ठेवण्यासाठी त्याचा मोलाचा उपयोग होतो.

    त्याचप्रमाणे मेंदूला तल्लख राहण्यासाठी चांगले पोषण मिळते. त्याच्या जोडीला जर चांगला व सात्विक आहार घेतला तसेच पुरेशी झोप घेतली तर अधिक लाभ होतो हे मात्र नक्की. त्यामुळे मेंदू नावाचे यंत्र जपण्यासाठी तसेच त्याचा पुपूर वापर होण्यासाठी प्रत्येकाने शक्य तितके प्रयत्न करण्याची गरज आहे.

    More emphasis on the left brain in school or in practical life while learning

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!