मोदींचा हाच “प्रॉब्लेम” आहे. ते जिथे जातील तिथे Divide करतात. मोदींच्या लोकप्रियतेपुढे आपण टिकणार नाही याची विरोधकांना खात्री आहे. त्यांच्या आधिमान्यतेशिवाय आपली कामे होणार नाहीत हे विरोधकांना मनोमन पटले आहे. पण हे उघडपणे बोलून कसे दाखवायचे…?? किंवा व्यक्त कसे करायचे…?? हा त्यांच्यापुढे यक्षप्रश्न आहे…!! आणि हा प्रश्न त्यांना सुटता सुटत नाही. विरोधकांच्या फक्त राजकीय धोरणात ही विसंगती उरलेली नसून त्यांच्या व्यक्तिमत्वात देखील ही विसंगती पुरती शिरल्याचे यातून दिसून येत आहे…!!
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी आतिष तासीर या लेखक – पत्रकाराने पंतप्रधान मोदींवर लिहिलेल्या कव्हर स्टोरीचे टायटल होते Divider In Chief…!! खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे Divider In Chief आहेत बुवा…!! अर्थात आतिष तासीर यांच्या म्हणण्यानुसार नाहीत, तर पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विरोधकांमधल्या ज्या विसंगती बाहेर येताहेत ना, त्यानुसार हे म्हणावे लागत आहे…!! Modi is really a Divider In Chief,
मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपने काही सकारात्मक उपक्रम देशभर राबवावेत. त्याची व्यापकता वाढवावी यात विशेष काही नाही. पण विरोधकांची मात्र मोदींना शुभेच्छा देताना जी धावपळ उडाली आहे आणि टीका करताना जी तारांबळ उडाली आहे त्यावरून हे अधिक स्पष्ट होईल.
एकीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पंतप्रधान मोदींना भरभरून शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देश कसा प्रगतीपथावर चालला आहे, त्यांचे नेतृत्व कसे अजोड आहे, जनतेने त्यांच्यावर कसा विश्वास दाखवला आहे, पंतप्रधानपदी त्यांची निवड पुन्हा होणे यातून जनतेचा विश्वास आणि अपेक्षा कशा वाढल्या आहेत, याचे रसभरीत वर्णन अजित पवारांनी केले आहे.
त्याच वेळी युवक काँग्रेस मात्र संपूर्ण देशभर (आपली ताकद उरलेली नसली तरी) राष्ट्रीय बेरोजगार दिवस,जुमला दिवस म्हणून साजरा करत आहे. त्यातही काही काँग्रेस नेत्यांनी “सेफ पॅसेज” म्हणून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देऊन घेतल्या आहेत. नेमकी इथेच काँग्रेस नेत्यांच्या मोदीविषयक धोरणाची राजकीय विसंगती दिसून येते आणि इथेच मोदी हे एक प्रकारे Divider In Chief ठरतात…!! त्यांनी विरोधी पक्षातच एक प्रकारे फूट पाङून ठेवली आहे. हे फक्त काँग्रेस अंतर्गत किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातच नाही, तर ते शिवसेनेतही दिसून येते आहे.
सामनाच्या अग्रलेखातून दररोज सकाळी भाजपवर नेहमीच भडीमार होत असतो. तसाच आजही भडीमार झाला आहे, पण शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र मोदींचे नेतृत्व देशात कसे अजोड आहे, त्यांना देशात कोणाचीही जोड कशी नाही, असे वर्णन करून मोदींना 71 व्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला स्थैर्य आल्याचेही “सर्टिफिकेट” राऊतांनी देऊन टाकले आहे. यातून शिवसेनेतल्या दोन नेत्यांमधील नव्हे, तर खुद्द संजय राऊतांमधलीच विसंगती समोर आली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत वेगळे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत वेगळे असे या निमित्ताने उघड्यावर आले आहे. इथे देखील मोदी हे Divider In Chief ठरले आहेत. कारण त्यांच्यामुळे फक्त शिवसेनेतली विसंगती दिसली आहे, असे नाही तर संजय राऊतांच्याच व्यक्तिमत्वामधील विसंगती उघड झाली आहे.
मोदींचा हाच “प्रॉब्लेम” आहे. ते जिथे जातील तिथे Divide करतात. मोदींच्या लोकप्रियतेपुढे आपण टिकणार नाही याची विरोधकांना खात्री आहे. त्यांच्या आधिमान्यतेशिवाय आपली कामे होणार नाहीत हे विरोधकांना मनोमन पटले आहे. पण हे उघडपणे बोलून कसे दाखवायचे…?? किंवा व्यक्त कसे करायचे…?? हा त्यांच्यापुढे यक्षप्रश्न आहे…!! आणि हा प्रश्न त्यांना सुटता सुटत नाही. विरोधकांच्या फक्त राजकीय धोरणात ही विसंगती उरलेली नसून त्यांच्या व्यक्तिमत्वात देखील ही विसंगती पुरती शिरल्याचे यातून दिसून येत आहे…!!
Modi is really a Divider In Chief,
महत्त्वाच्या बातम्या
- जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदी, आदर पूनावाला, ममता बॅनर्जी यांचेही नाव
- अनिल देशमुख यांचे तत्कालिन खासगी सचिव संजीव पलांडे निलंबित, शंभर कोटींच्या प्रकरणात होते कोठडीत
- मोठी बातमी : भारताचे स्टॉक मार्केट जगातील 5वे सर्वात मोठे, BSE लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 260 लाख कोटी रुपयांवर
- Aukus : अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाची नवीन ‘सुरक्षा युती’ची घोषणा, फ्रान्सला धक्का, तर चीनची तिन्ही देशांवर आगपाखड