वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात कोरोनाविरोधी लसीची टंचाई जाणवत असताना अनेक राष्ट्रांनी गरजेपेक्षा जास्त कोरोनाविरोधी लसीचा साठा करून ठेवला आहे. त्यामध्ये कॅनडाने लोकसंख्येच्या पाचपट साठा करून ठेवल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी जागतिक आरोग्य संघटनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. Many countries, including Canada, have Large stocks of Corona vaccines
लोकसंख्येपेक्षा जास्त पटीनं लसींचा साठा करणाऱ्या देशात कॅनडाचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर, युरोपियन संघ, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका यांचा समावेश आहे. तर, ड्यूक ग्लोबल हेल्थ इनोव्हेशन सेंटरच्या आकडेवारीनुसार कॅनडाने 33 कोटी 80 लाख कोरोना लसींची खरेदी केली आहे. जी तिथल्या लोकसंख्येच्या 5 पट आहे.
कॅनडामधल्या प्रत्येक नागरीकाला दोन डोस दिल्यानंतरही कोट्यवधी लसीचा साठा शिल्लक राहतो. तर, इंग्लंडमध्ये 3.6 पट लसींचा साठा आहे. युरोपीयन संघानं लोकसंख्येच्या 2.7 पट लस मागवल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडे लोकसंख्येच्या 2.5 पट लस शिल्लक आहेत. अमेरिकेकडे लोकसंख्येच्या दुप्पट लसींचा साठा आहे.
सध्या भारताकडं लोकसंख्येच्या 4 टक्के लसींचा साठा आहे. इंडोनेशियाकडे लोकसंख्येच्या 38 टक्के, ब्राझीलकडे 55 टक्के, अफ्रिकन संघाकडं 38 टक्के लसी आहेत. तसेच, सौदी अरबयाकडे ‘भारताच्या लोकसंख्येच्या 4 टक्के’ लस आहे.
जागतिक आरोग्य संघटनेची नाराजी
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं या साठेबाजीबाबत नाराजी व्यक्त केली.ज्या देशांकडे पुरेसा साठा नाही त्या नागरीकांच्या लसीकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर जास्त लसींचा साठा असल्यास गरीब देशांना पुरवठा करावा, असे आवाहन केले. त्याला फ्रान्स आणि बेल्जियमने प्रतिसाद दिला.
Many countries, including Canada, have Large stocks of Corona vaccines
महत्त्वाच्या बातम्या
- नव्या व्हेरिएंटवरील केजरीवालांच्या ट्वीटने वादाचे मोहोळ, सिंगापूर सरकारने भारतीय उच्चायुक्तांसमोर नोंदवला आक्षेप
- Covid 19 Vaccine : कोरोना लस तयार करण्याचा परवाना एकाऐवजी 10 कंपन्यांना द्या, नितीन गडकरींची मौलिक सूचना
- Coronavirus Cases in India : भारतात सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांहून कमी रुग्ण, पहिल्यांदाच एका दिवसात 4529 मृत्यू
- आणखी एक लस : Sanofi GSK च्या कोरोनावरील लसीच्या तिसऱ्या क्लिनिकल ट्रायलला लवकरच सुरुवात
- यूपी सरकारमधील मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनाने निधन, PM मोदी आणि CM योगी आदित्यनाथंनी व्यक्त केला शोक