• Download App
    Malegaon sugar factory election बारामती नाही उरली एकतर्फी, हा खरा माळेगावच्या निवडणुकीचा संदेश!!

    Malegaon sugar factory election बारामती नाही उरली एकतर्फी, हा खरा माळेगावच्या निवडणुकीचा संदेश!!

    नाशिक : 19500 पेक्षा जास्त मतदार असलेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचे पॅनल जिंकले. चंद्रराव तावरे यांचे पॅनल हरले. खुद्द अजित पवार या निवडणुकीत निवडून आले आणि ते माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन बनतील, ही काही “खरी बातमी” नाही.

    या निवडणुकीतली “खरी बातमी” ही, की सहा वेळा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीत तळ ठोकून बसावे लागले. मतदारांची मनधरणी करावी लागली. आपल्याच काकांनी आपल्या सख्ख्या पुतण्याच्या नेतृत्वाखाली उभ्या केलेल्या पॅनलचा पराभव करावा लागला आणि तो पराभव करताना सुद्धा तो सहज करता आला नाही, तर पवारांनीच “संस्कारित” केलेल्या ज्येष्ठ नेत्याने आपल्याला जोरदार टक्कर दिली हे अजित पवारांना पाहावे लागले ही “खरी बातमी” आहे.

    पवारांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव

    बारामती आता पवारांसाठी एकतर्फी उरली नाही, हा माळेगावच्या निवडणुकीने खरा राजकीय “संदेश” दिला.

    बारामतीतील निवडणूक जिंकायची असेल, तर तिथे तळ ठोकून बसावे लागेल, हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनी पवार काका – पुतण्यांना दाखवून दिले होते. पण काही झाले तरी ती पवारांच्या घरातली लढाई होती, पण माळेगावची लढत पवारांच्या घराबरोबरच बाहेरची देखील होती. पवारांच्या घराबाहेरच्या असलेल्या बारामतीच्या नेत्यांनी अजित पवारांना चांगली टक्कर दिली. शरद पवारांच्या पॅनलचा तर पूर्ण पराभव केला. लोकसभा निवडणुकीत ठीक आहे, पण स्थानिक निवडणुकीत तुमचे ऐकणार नाही, हे बारामतीच्या मतदारांनी शरद पवारांना आधी विधानसभा निवडणुकीत सांगितले. आता माळेगावच्या निवडणुकीत दाखवून दिले.

    भाजपने काका – पुतण्यांमध्ये लांबून मारली पाचर

    भाजपने दोन्ही निवडणुकांची मजा लांबून बघितली. बारामती वरची पवारांची पकड कमळ चिन्हामार्गे ढिल्ली करता येत नाही ना, मग हरकत नाही, ती अन्य मार्गाने ढिल्ली करू, असे मानून भाजपने “पवार संस्कारित” चंद्रराव तावरे यांना “बळ” दिले. त्यांचा चांगला उपयोग करवून घेतला. तावरे + भाजपच्या बळाने पवार काकांच्या पॅनेलला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले. काका आणि पुतण्या यांच्यात मोठी राजकीय पाचर मारून ठेवली. माळेगाव कारखान्याची निवडणूक पुतण्या जिंकला, पण काकांचे “स्थानिक” बळ संपले. बारामतीची एकतर्फी होणारी निवडणूक आधी दुरंगी झाली. आता तर ती तिरंगी झाली. “पवार बोले आणि बारामती डोले” ही अवस्था शिल्लक राहिली नाही. भाजपने लांबून मजा बघत हे घडवून आणले.

    Malegaon sugar factory election proved that Baramati has not remained unilateral bastion of Pawar family!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य