• Download App
    मदर तेरेसा अग्रलेख संदर्भात त्वरीत माफी मागणारे कुबेर संभाजीराजांच्या अवमानावर माफी का मागत नाहीत ? Loksatta's Editor Girish Kuber apologized quickly when he wrote Mother Teresa's editorial, then why is he not after insulting Sambhaji Raje?

    मदर तेरेसा अग्रलेख संदर्भात त्वरीत माफी मागणारे कुबेर संभाजीराजांच्या अवमानावर माफी का मागत नाहीत ?

    दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी झाल्याचा आरोप महाराष्ट्रातून होत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात कुबेर यांनी केलेले उल्लेख अनऐतिहासीक आहेत, या लेखनाला सत्याचा आधार नाही असा आरोप आहे. त्यामुळे कुबेर यांचे पुस्तक बाजारातून हटवावे तसेच त्यांच्याकडून माफीनामा घ्यावा अशी मागणी सर्व थरातून होत आहे. Loksatta’s Editor Girish Kuber apologized quickly when he wrote Mother Teresa’s editorial, then why is he not after insulting Sambhaji Raje?


    प्रतिनिधी

    मुंबई : ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातल्या वादग्रस्त मजकुरावरून शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला आहे. कोल्हापूर येथील छत्रपती गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनीही कुबेर यांच्या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारकडे केली आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही कारवाई का केली जात नाही, याचे आश्‍चर्य वाटत आहे. सरकारने योग्य त्या कारवाईसाठी या पुस्तकातील अवमानकारक मजकुरा संदर्भात इतिहास अभ्यासकांची समिती नेमून योग्य ती कारवाई करावी, तसेच तोपर्यंत पुस्तकाच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.



    पत्रकार कुबेर हे सतत वादग्रस्त लिखाण करत असतात. छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांचा हिंदवी स्वराज्यातील कालखंड, तसेच तत्कालिन भिन्न राजकीय परिस्थिती लक्षात न घेताच, या दोघा नरवीरांची तुलना करणे अनुचितच आहे. त्यातही छत्रपती संभाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांप्रमाणे सहनशीलता आणि परराष्ट्र धोरण नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर येण्यासाठी संभाजीने रक्तपात घडवला, असे थेट आरोप करणे, म्हणजे या महापुरुषांना लांछन लावणे आहे, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.

    बाबर-औरंगजेबादी क्रूर शासकांचे अत्याचार लपवून त्यांच्या जीवनातील केवळ सहिष्णुता दाखवणार्‍या प्रसंगांचीच चर्चा करणार्‍या या सेक्युलर पत्रकारांना अचानक छत्रपती संभाजीराजे यांच्या असहिष्णुतेची जाणीव होण्यामागे निश्‍चितच काही तरी हेतु आहे. त्यातही ‘इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारे कोणी व्यक्तिमत्त्व असेल तर बाजीराव पेशवे आहेत’, असा उल्लेख करून पुन्हा मराठा-ब्राह्मण वाद उकरून काढण्याचा तर प्रयत्न केला जात नाही ना, हेही सरकारने तातडीने पहायला हवे, अशीही मागणी समितीने केली आहे.

    गिरीश कुबेरांनी लोकसत्ताचे संपादक म्हणून काही वर्षांपुर्वी ‘असंतांचे संत’ हा अग्रलेख लिहिला होता. त्यात मदर तेरेसा यांच्याविषयी लिखाण केल्यावर ख्रिस्ती समाजाने विरोध करताच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर जाहीर माफी मागून कुबेर मोकळे झाले. मग हिंदु समाजातून, लाखो शिवप्रेमींकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयीच्या लिखाणा संदर्भात आपली भूमिका ते का स्पष्ट करत नाहीत ? असाही प्रश्न समितीने केला आहे.

    Loksatta’s Editor Girish Kuber apologized quickly when he wrote Mother Teresa’s editorial, then why is he not after insulting Sambhaji Raje?

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!

    Sangram thopte संग्राम थोपटेंना काँग्रेसने दिले तोकडे बळ, पवारांनी नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!!