निसर्गाने आपणाला दोन कान व एक तोंड दिले आहे. त्यातून प्रत्येकाने काही तरी बोध घेतला पाहिजे. तो म्हणजे आपण जास्त ऐकावे व कमी बोलावे. हा याचा खरा अर्थ आहे. खूपशा वेळी आपण व्यवस्थित न ऐकल्यामुळे समजत नाही. गैरसमज निर्माण होतात. यातून निर्णय घेण्यात एक जरी चूक झाली की पुन्हा चुकांची मालिकाच सुरु होते. ती काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. Listen carefully and avoid mistakes
त्यामुळे सुरुवातील समोरची व्यक्ती काय म्हणत आहे, तिला काय सांगायचे आहे हे जाणून घ्या. दुसर्यातचे म्हणणे ऐकताना आपण रस घेऊन ऐकतोय असे दाखवा. असे केल्याने त्या व्यक्तीलादेखील सन्मान दिल्यासारखे होते. शेवटी प्रत्येक व्यक्तीला सन्मान आवश्यकच असतो. आपले म्हणणे कोमी तरी ऐकून घेत आहे ही कल्पना व अनुभूती फार सुखद असते. मात्र अनेकांना ती माहितीचे नसते. कारण असा लोकांना दुसऱ्याचे ऐकून घेणे कमीपणाचे वाटते. शिवाय ते नेहमी स्वतःचेच म्हणणे पुढे रेटत राहण्याचा प्रयत्न करतात. यातून काही साध्य होत नसते. पण अशा लोकांचा हे कदीच लक्षात यते नाही. त्यामुळे त्यांचा स्वभावच तसा बनत जातो. त्यामुळे अशा लोकांनी आधि स्वतःच्या स्वभामात मुलभूत सुधारणा करण्याची गरज आहे. ती म्हणजे प्रथ्म दुसऱ्या व्यक्तीचे म्हणणे नीटपणाने ऐकून घ्यावे. शिवाय ऐकताना योग्य प्रकारे त्याला प्रतिसाददेखील द्यावा. म्हणजे समोरच्या व्यक्तीचे म्हणणे थोडे पुढे झुकून ऐकावे.
तसेच समोरची व्यक्ती बोलत असताना म्हणजे आपण ऐकताना पूर्वग्रह मनात ठेवू नये. तसेच त्या व्यक्तीचे ऐकताना त्याची तुलना दुसऱ्या कोणाशी करू नये. ऐकताना निसर्ग आपणाला काही निरोप देतोय ही भावना ठेवावी. तसेच बोलणाऱ्याला मध्येच थांबवू नये. वक्त्याचा काही भाग आपणाला समजला नसेल तर पुन्हा सांगण्याची विनंती करावी. अर्धवट ऐकून पटकन अनुमान लावू नये. बोलणाऱ्याच्या डोळ्यात पाहून ऐकावे. ऐकताना शरीर संतुलित ठेवावे. अशा प्रकारे ऐकले तर त्याचे अनेक लाभ होतात. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आत्मसंयमन प्राप्त होते. संबंध सुधारतात, तसेच दुसऱ्याचे अनुभव ऐकल्याने आपलाही दृष्टिकोन विशाल होतो.