कोविडने आपल्या शरीरावर, मनावर आणि आत्म्यावर एक विचित्र छाप सोडली आहे. अशा गोष्टी अनपेक्षित आणि त्रासदायक असल्याने आापले मन त्या झेलायला तयार नसते. जग आधुनिक झाले आहे. आपण तांत्रिक जगातल्या ऐहिक गोष्टींचा जबरदस्त मनस्वी लाभ घेत असतो. हे जरी सत्य आपण मानले तरी महामारीच्या उपस्थितीत आपण इतके नक्कीच जाणून घेतले की, आधुनिक युगाच्या गुंतागुंतीत आपण अनेक प्रकारची अनिश्चितता आणि संकटांच्या मालिकेतूनसुद्धा जात असतो. कोरोनाने आपले दिवसाचे गणितच बदलून गेले. यातून आयुष्याची बेरीज-वजाबाकी बिघडली. बुद्धाच्या तत्वज्ञानात प्रत्येक गोष्टीत एक बंधन असते. Life Skills: You need each other’s help to get out of the crisis
या महामारीत विश्वाचे हे अतूट बंधन आपण अनुभवतोच आहोत. आपल्या स्वतःच्या बाबतीतही आपण जी स्वच्छता बाळगणार आहोत, भौगोलिक दूरी बाळगणार आहोत. बुद्धाचे तत्वज्ञान मूलभूत आहेच. पण, त्यात दयाभाव आणि परानुभूती आहे. आपलं ऐहिक अस्तित्व एकमेकांच्या अस्तिवावर अवलंबून आहे. आपण जेव्हा एकमेकांबद्दल आपली जबाबदारीची जाणीव प्रामाणिकपणे समजतो, तेव्हा आपल्याला जगातल्या एकमेकांबरोबरच्या या अतूट बंधनाची संकल्पना हे एक गंभीर आणि ज्ञानी सत्य आहे हे पटतं.
प्रेमाने ओथंबलेले दयाळूपण, परानुभूती, आनंद आणि समताभाव या महत्त्वाच्या गोष्टींमुळे आज आपल्या मनात जी अनामिक चिंता आणि मृत्यूची अविरत भीती दाटली आहे, ती नक्कीच निघून जाईल. आपल्या मनात भीतीदायक आणि निराशेच्या विचारांचे ढग दाटले आहेत, पण जेव्हा परानुभूतीचा व दुसर्यांाबद्दल वात्सल्याची जाणीव आपल्या मनात प्रकाशित होईल, तेव्हाच आपल्या मनाचे आकाश निरभ्र होईल, हे खरे. आपण सोशल डिस्टन्सिंग आज कोविडच्या विळख्यात सापडलो असल्याने पाळत आहोत. पण, तरीही सहृदयता या काळात खूप मोलाची आहे, हे निश्चितच! या काळात खरे तर आपण आपल्या नात्यांची खूप काळजी घ्यायला हवी. आपण कोरोनानंतरचे जे जीवन जगणार आहोत, त्या प्रवासात आपल्या सर्व जुन्या नात्यांचे संगोपन आणि संवर्धन हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. या धकाधकीच्या अस्वस्थ आणि अनिश्चिततेच्या प्रवासात आपण एकमेकांची साथ दिली, तर या निबर संकटातून आपण एकजुटीने आणि समर्थपणे बाहेर पडू!