• Download App
    लाईफ स्किल्स : विनम्र माणूस हा संयम आणि समतोल राखूनच वागताना आपल्याला आढळतो । Life Skills: We find a humble person behaving in moderation and balance

    लाईफ स्किल्स : विनम्र माणूस हा संयम आणि समतोल राखूनच वागताना आपल्याला आढळतो

    खरे तर नम्र कोणीही असावे, चांगले कोणीही बोलावे. तरी शिक्षणाचा या नम्र भाव किंवा या मनोभूमिकेशी अधिक संबंध जोडला जातो. शिक्षण घेणे म्हणजे फक्त पदवी घेणे नाही. शिक्षण म्हणजे खरे शिक्षण, स्वतःमधील वाढ, विकास, ज्ञान, आजूबाजूच्या परिस्थितीचे भान, आपल्या भोवतालच्या समाजाचे भान या अर्थाने बघूया. जेव्हा काही शिकता शिकता आपल्यालाही असे वाटते, की या अध्ययनातून नवी दृष्टी मिळाली, एक भान आले, तेव्हा काय बदल होतो आपल्यात असा कधी विचार करून पाहा. Life Skills: We find a humble person behaving in moderation and balance

    तेव्हा लक्षात येईल की एरवी आपल्याला जे प्रश्न पडतात, की हे जग असे का आहे, लोक असे का वागतात, सामाजिक मानसिकता कशी बदलते आहे आणि यात आपण कसे वागावे, याची सर्व उत्तरे नाही मिळाली तरी याबद्दलची स्पष्टता आपल्या मनात येऊ लागते. आत्ताच्या कोरोनाच्या आक्रमणात पूर्ण समाजाची मानसिकता बदलून गेली आहे. अशावेळी एरवी अनेकांच्या वागण्याने नाराज होणारे आपण नकळत एकमेकांना सहकार्य करायला लागलो आहोत.

    आज प्रसारमाध्यमांमुळे या संकटाची कल्पना प्रत्येकाला आली आहे, संकटाला तोंड कसे द्यायचे हे शिकवले जात आहे म्हणून हे सहकार्य दिसते आहे. या शिक्षणामुळेच एका प्रकारे ही सहकार्याची भावना निर्माण झाली आहे. जे आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे. जे काम करायला नाही म्हणत आहेत, त्यांची भीती समजून घेतली जात आहे.

    हीच भूमिका मनाने घेतलेल्या विनम्रतेमध्ये आहे. पण महत्त्वाचा फरक संकट आल्यानंतर झालेल्या या बदलात आणि विनम्रतेमध्ये असा, की हा विनम्र भाव कोणत्याही अशा भयानक संकटाची वाट पाहत नाही. ती मनोभूमिका कशाला तरी प्रतिक्रिया नसते. तर ती एकुणातच जगण्याच्या अभ्यासातून येणारी गाढ समजूत असते. कोणी कसाही वागो पण विनम्र माणूस हा संयत आणि समतोल राखूनच बोलताना किंवा वागताना आपल्याला दिसतो. याचे कारण, या अशा विनम्र वागण्यामुळे किती काही चांगले घडू शकेल आणि बहुतेक लोकांनी जर नम्रता सोडून वागायचे ठरवले तर काय अनर्थ होतील याचा पुरेपूर अंदाज त्याला आलेला असतो.

    Life Skills: We find a humble person behaving in moderation and balance

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!

    Operation Sindoor मधून भारताचा नूर खान + किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का, पाकिस्तानात रेडिएशनचा धोका, अमेरिकेसकट चीनला हादरा!!