• Download App
    लाईफ स्किल्स : प्रथिने घ्या आणि स्नायूंची सुदृढता जपा। Life Skills: Eat protein and maintain muscle strength

    लाईफ स्किल्स : प्रथिने घ्या आणि स्नायूंची सुदृढता जपा

    वयाच्या पन्नाशीनंतर मनुष्याच्या शरीरातील स्नायूंचे वजन कमी होण्यास सुरवात होते. काही जुने आजार, चुकीचे डाएट आणि बसून राहण्यामुळे ही स्थिती अधिक गंभीर बनते. दररोजच्या आहारात आवश्यक प्रथिनांचा समावेश केल्यास स्नायूंचे वजन आणि ताकद कायम ठेवता येते. तुमची चालत राहण्याची क्षमता कायम ठेवण्यासाठी व पडल्यानंतर होणाऱ्या इजांची तीव्रता कमी करण्यासाठी स्नायू सुदृढ असणे आवश्यक ठरते. यासाठी वयोवृद्ध लोकांनी आहारात प्रथिनांचा परिणामकारक वापर करणे आवश्यक ठरते. उच्च दर्जाच्या प्रथिनांचा आहार, म्हणजेच मांसाहाराचा आहारात समावेश अवश्य करावा. Life Skills: Eat protein and maintain muscle strength

    प्रथिने आपल्या हेल्दी डाएटमधील एक महत्त्वाचा भाग आहेत. ते आपल्या शरीरातील बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, ज्यांना अमिनो अॅसिड्स म्हणून ओळखले जाते. तुमचे शरीर अमिनो अॅसिड्सचा उपयोग करून स्नायू व हाडे विकसित आणि दुरुस्त करते. त्याप्रमाणे हार्मोन्स (संप्रेरके) आणि एन्झाइम्सचे (विकर) कार्य सुधारते. प्रथिनांचा उपयोग शरीरातील ऊर्जेचा स्रोत म्हणूनही केला जातो. प्राणीजन्य उत्पादनांमध्ये जसे की, चिकन किंवा मासे आणि इतर डेअरी उत्पादने सर्वप्रकारचे आवश्यक अमिनो अॅसिड असतात आणि त्यांना संपूर्ण प्रथिने किंवा उच्च प्रतीची प्रथिने म्हणून ओळखले जाते. सोया उत्पादने, राजगिरा आणि राजगिऱ्याच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात अमिनो अॅसिड्स असतात. वनस्पतींपासून मिळणाऱ्या प्रथिनांमध्ये जसे की, बिन्स, मसूर, शेंगदाणे आणि न दळलेली धान्ये शरीरासाठी आवश्यक एखाद्या अमिनो अॅसिडचा अभाव असतो व त्यामुळे त्यांना अपूर्ण प्रथिने म्हणतात. पुरवणी आहारातून प्रथिने कसे मिळवाल.

    एक चमचा पीनट बटर व एक सफरचंद आहारात घ्या. कोणत्याही प्रकारचे मीठ, साखर किंवा इतर घटक पदार्थांशिवायचे पीनट बटर घेणे योग्य. लो-फॅट पनीरमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात. ते अंडी, राजगिरा किंवा दह्यासोबत घ्यावे. शेंगदाणे आणि विविध बियांचा सलाड, भाज्या आणि विविध प्रकारच्या करींमध्ये केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. हिरव्या सलाडवर भाजलेले बदाम घालून घ्या, खूप फायदा होतो. सोयाबीनचा उपयोग सूप, करी आणि पास्ता सॉसमध्ये फायद्याचा ठरतो. तुमच्या व्हेजिटेबल सूपमध्ये कॅनिलिनी बिन्सचा वापर करा. दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात आणि त्याचा वापर दिवसभर कधीही करावा. अंड्यांचा उपयोग आहारात विविध प्रकारे करता येतो.

    Life Skills : Eat protein and maintain muscle strength

    Related posts

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!

    Operation Sindoor : फेक न्यूज पसरवायला, पाकिस्तान पाठोपाठ चीन देखील सरसावला!!

    Operation sindoor : भारतीय सैन्य दले आणि भारतीय नेतृत्वाचे संघाकडून अभिनंदन आणि देशवासीयांना आवाहन!!