समाजात तुम्ही कसे वावरता यालाही व्यक्तीमत्वाच्या दृष्टीने फार महत्व असते. आपण जेव्हा समोरच्याचे ऐकत असता त्यावेळी ते नीट ऐका. तसेच त्यालाही ते तुमच्या शारिरीक हालचालींमधून ते जाणवू द्या. समोरची व्यक्ती कशी बसली आहे. अथवा उभी आहे, त्याप्रमाणे तुम्ही कृती करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून संवादामध्ये आपलेपणाची भावना निर्माण होण्यास मदत होईल. आपला अभिप्रायदेखील योग्य असू द्या. नेहमी सकारात्मक अभिप्राय ठेवा. एखादा मुद्दा पटला अथवा नाही तर त्यावर हो किंवा नाही असे मत मांडा. Life Skills: Always keep positive feedback, how you behave in society is also very important
एखाद्या मुद्द्याबद्दल मनात शंका असतील तर बोलणे पूर्ण झाल्यावर त्यासंदर्भात प्रश्न विचारा. ऐकण्याबरोबरच माहिती संपादन करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आपल्या अडचणी, एखादी निर्णय प्रक्रिया, समस्या निराकरण करण्यासाठी आपण आपल्याजवळील माहितीचा उपयोग करून घेत असतो. अधिकाधिक माहिती मिळविण्यासाठी प्रश्न विचारणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. योग्यवेळी योग्य प्रश्न विचारून आपल्याला हवे तसे समर्पक उत्तर मिळवायाचे कौशल्य अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुळात प्रश्न का विचारावेत हे आधी जाणून घ्या.
उगाच समोरच्याला आडवे लावण्यासाठी किंवा त्रास देण्याच्या हेतूने कधीही प्रश्न विचारत बसू नका. माहिती प्राप्त करण्यासाठी प्रश्न विचारा. तसेच संभाषणावर नियंत्रण राखण्यासाठी, स्पष्टीकरण करण्यासाठी, व्यक्तिमत्व अन्वेषण करण्यासाठी, ज्ञान चाचणी करण्यासाठी किंवा पुढील विचाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रश्न विचारावेत. त्यासाठी नेहमी रचनात्मक प्रश्न विचारा. अनेकदा आपल्या नोकरी अथवा शिक्षणात अशी परिस्थिती निर्माण होते की त्यावेळी आपल्यावर अत्यंत दबाव निर्माण होतो.
काहीवेळा त्या दबावाखाली काम करताना आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अशावेळी योग्य संवादातून त्यातून मार्ग निघू शकतो. आपल्याला जे विचारायचे आहे त्यासाठी योग्यपद्धतीने प्रश्नाची मांडणी करा. जेणेकरून अर्थाचा अनर्थ होणार नाही. कधी कधी प्रश्न विचारण्याऐवजी त्या परिस्थितीत शांत राहणे उपयुक्त ठरते. समोरच्या व्यक्तीला प्रोत्साहन मिळेल अश्यापद्धतीने प्रश्न योजा.या पद्धतीचा अवलंब केल्यास संवाद अधिकाधिक मजबूत व सक्षम करण्यास मदत होते.
Life Skills: Always keep positive feedback, how you behave in society is also very important