भूवनेश्वरी
असं म्हणतात कलाकार असणं हा त्या नटराजाचा आणि सरस्वतीचा आशीर्वाद आहे. डॉक्टर होणं, इंजिनीयर होणं, किंवा कोणत्याही बाकी क्षेत्रात काम करणं हे शिकूनही करता येते असे आहे. पण कला मात्र जन्मजात अवगत असावी लागते. आणि कलाकार होणं म्हणजे ईश्वराची मर्जी असणं. हे लतादीदींच्या बाबतीत तितकचं खर होतं…!! कारण त्यांच्या गळ्यात गंधार वसायचा. आणि गंधार वसलेला हा गळा ‘मेरी आवाजही मेरी पहचान है’ असं म्हणत गेली कित्येक वर्षे अखंड भारताची ओळख ठरतो आहे…!! lata mangeshakar passed away
पु. ल. देशपांडे यांच्या एका भाषणात ते म्हणाले होते, “मला जर विचारलं आकाशात देव आहेत का? तर मी म्हणेन मला ते माहिती नाही. मला एकच माहिती आहे, आकाशात सूर्य आहे. चंद्र आहे आणि लताचा सूर आहे.” दिवस असो, रात्र असो, असा कोणताही क्षण नाही की लताचा सूर इथून तिथे जात नाही…!!
खरंच आभाळ व्यापून टाकणारा तो सूर गेले 60 वर्षे प्रत्येकाच्या घरात ऐकू येतोय. अगदी रस्त्याच्या सिग्नलवर उभे असलेल्या BMW मध्ये relax होण्यासाठी वाजत असणारा आणि त्याच सिग्नलवर पोटाची खळगी भरण्यासाठी हात पसरणार्या त्या आजीच्या गळ्यात देखील तोच सूर असतो…!!
प्रत्येकालाच आपलंसं करणारा तो सूर ईश्वराच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नाही असं कसं होईल..? ‘बाई मी विकत घेतला शाम’ हे गाताना तो वर बसलेला शाम खरंच या गान सरस्वतीच्या सुराचा इतका प्रेमात पडला की…!!
गंधर्व म्हणजे स्वर्गात देवांसमोर गाणारे गायक. मास्टर दीनानाथ म्हणायचे, गंधार बालगंधर्वांच्या गळ्यात आणि नंतर लताच्या गळ्यात वसतो. आणि या गंधाराची खरी जागा स्वर्गातच. तेव्हा या गान सरस्वतीचे तिथे स्वागत तेवढेच सुर-मयी होईल आणि त्या ईश्वराचे नशीब थोर की बालगंधर्व आणि त्यांच्या साथीला बसलेल्या या गानसरस्वतीचे ते सूर त्याच्या कानी दुमदुमतील आणि अखंडतेने देवांच्या मनावर अधिराज्य गाजवतील आणि म्हणायला लावतील “गाता रहे मेरा दिल”…!!
lata mangeshakar passed away
महत्त्वाच्या बातम्या
- Lata Mangeshkar : वयाच्या 92व्या वर्षी लता मंगेशकर यांचे निधनाने बॉलीवूडवर शोककळा, सर्व कलाकारांकडून शोक व्यक्त
- पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा, ३६ किलो ड्रग जप्त; सीमा सुरक्षा दलाची जम्मू – काश्मीरमध्ये कारवाई
- गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, संध्याकाळी साडेसहाला शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- लतादीदींचे निधन : राष्ट्रपती कोविंद आणि पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुख, दिग्गज राजकारण्यांनी वाहिली श्रद्धांजली