• Download App
    के. सुरेंद्रन यांना वायनाडचे "स्मृती इराणी" होण्याची संधी; कमळावर बसून राहुल गांधींविरुद्ध स्वारी!!K. Surendran will give tough fight against rahul gandhi in Waynad

    के. सुरेंद्रन यांना वायनाडचे “स्मृती इराणी” होण्याची संधी; कमळावर बसून राहुल गांधींविरुद्ध स्वारी!!

    नाशिक : भाजपने आपल्या पाचव्या यादीत भरपूर हाय प्रोफाईल नावे लोकसभेच्या मैदानात आणली आहेत. यापैकी केरळ मधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना पक्षाने वायनाडचे “स्मृती इराणी” होण्याची संधी दिली आहे. के. सुरेंद्रन वायनाड मध्ये आता राहुल गांधी यांच्याशी टक्कर घेणार आहेत. K. Surendran will give tough fight against rahul gandhi in Waynad

    राहुल गांधी यांना वायनाड मध्ये 2024 ची लढत बिलकुलच 2019 सारखी सोपी राहिलेली नाही. कारण 2019 मध्ये त्यांना तिथे प्रबळ असणाऱ्या कम्युनिस्ट पार्टीने देखील पाठिंबा दिला होता. त्या उलट 2024 मध्ये वायनाड मधूनच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ए. राजा यांची पत्नी एनी राजा यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे वायनाड मध्ये राहुल गांधी विरुद्ध एनी राजा विरुद्ध के. सुरेंद्रन अशी तिरंगी लढत रंगणार आहे.

    2019 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी यांनी भाजपच्या तिकिटावर राहुल गांधींना आस्मान दाखवले होते. परंतु, त्यावर्षीच्या निवडणुकीत राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने हुशारी दाखवत अमेठी बरोबरच त्यांना वायनाड मधूनही तिकीट दिले होते. वायनाडची निवडणूक त्यांना त्यावेळी सोपी गेली. कारण वायनाड मध्ये देशातले अल्पसंख्यांक तिथे बहुसंख्यांक आहेत. म्हणजे तिथे मुस्लिमांची संख्या हिंदूंपेक्षा जास्त आहे. त्यामुळे राहुल गांधींना तिथली निवडणूक सोपी गेली. पण यावेळी भाजपने दक्षिण भारतातील सगळ्या राज्यांवर कॉन्सन्ट्रेट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नियमितपणे केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांच्या भेटीगाठी वाढवून तिथे संघटनात्मक पातळीवर मजबूती आणली आहे.

    राहुल गांधींच्या विरुद्ध मैदानात उतरवलेले के. सुरेंद्रन हे भाजपचे तिथले दिग्गज नेते आहेत. त्यांच्याकडे सध्या केरळ प्रदेश भाजपची धुरा असून ते प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत. त्यामुळे केरळ राज्याच्या दृष्टीने भाजपने आपला सगळ्यात महत्त्वाचा मोहरा राहुल गांधींविरुद्ध उतरवल्याने वायानाडची लढत हाय प्रोफाईल आणि प्रतिष्ठेची झाली आहे. इतकेच नाही, तर के. सुरेंद्रन यांच्या बाजूने भाजपने संघटनात्मक पातळीवर सर्व बाजूंनी जोर लावला, तसेच तिथे कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवार एनी राजा यांनी राहुल गांधींची मते खाल्ली, तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असे घडून येऊन के. सुरेंद्रन यांना वायनाडचे “स्मृती इराणी” होण्याची संधी मिळू शकते. म्हणजेच स्मृती इराणी यांनी अमेठीतून जसा राहुल गांधींचा पराभव केला होता, तसाच के. सुरेंद्रन वायनाड मधूनही त्यांचा पराभव करून शकतात, असा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा होरा आहे.

    – वायनाडची “अमेठी” होणार??

    ज्या अर्थी भाजपने तिथे के. सुरेंद्रन यांच्यासारखा प्रदेशाध्यक्ष म्हणजेच पक्षाचा सर्वोच्च नेता किंबहुना मोहरा राहुल गांधी यांच्याविरुद्ध मैदानात उतरवला आहे, त्याअर्थी भाजपने राहुल गांधी यांच्याविरुद्धची लढत अमेठी इतकीच “सिरीयस” घेतल्याचे ते निदर्शक आहे. त्यामुळे भाजप वायनाड मध्ये जोर लावणार आणि राहुल गांधींना जास्तीत जास्त जेरीस आणण्याचा प्रयत्न करणार हे उघड दिसणारे तिथले राजकीय चित्र आहे.

    – के. सुरेंद्रन झळाळती कारकीर्द

    54 वर्षांच्या के. सुरेंद्रन यांनी आपली राजकीय कारकीर्द इतर भाजपच्या नेत्यांप्रमाणेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतूनच केली. केरळ सारख्या संघ परिवारासाठी कायमच “अवघड” राहिलेला राज्यात के. सुरेंद्रन यांनी अभाविप मध्ये संघटनात्मक पातळीवर आपली छाप पाडली. नेहरू युवा केंद्र, डिसा संस्कारिका केंद्र यांचेही ते अध्यक्ष राहिले. गुरुवायूर मधून त्यांनी रसायनशास्त्रात पदवी मिळवली. गेली 30 वर्षे ते संघ परिवाराशी संबंधित कुठल्या ना कुठल्या संघटनेत जबाबदारीच्या पदावर काम करत होते. आता भाजपने त्यांना केरळ प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच थेट राहुल गांधी यांच्याविरुद्ध मैदानात उतरवून त्यांची लोकसभेतली पहिलीच लढत राष्ट्रीय पातळीवरची सर्वांत महत्त्वाची लढत ठरवली आहे.

    K. Surendran will give tough fight against rahul gandhi in Waynad

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Tejashwi Yadav : आता तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र!

    Ganga Expressway : हवाई दलाने रचला विक्रम : गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचे रात्रीचे लँडिंग

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??